AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Deepika Padukone-Ranveer Singh Daughter Dua : दीपिका-रणवीरची लाडकी लेक इतकी श्रीमंत, ‘दुआ’ची संपत्ती ऐकून व्हाल थक्क !

दिवाळीच्या शुभेच्छा देताना अभिनेत्री दीपिका पडूकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी काल पहिल्यांदाच त्यांची लेक ‘दुआ’ चा चेहरा सर्वांना दाखवला. तिचे फोटो सर्वांसोबत शेअर केले असून ते प्रचंड व्हायरल झालेत. बॉलिवूडच्या या लोकप्रिय कपलची लेक ‘दुआ’ ही अवघ्या वर्षभराची आहे. पण आत्ताच ती कोट्यावधींच्या संपत्तीची मालक आहे.

Deepika Padukone-Ranveer Singh Daughter Dua : दीपिका-रणवीरची लाडकी लेक इतकी श्रीमंत, ‘दुआ’ची संपत्ती ऐकून व्हाल थक्क !
रणवीर-दीपिकाच्या लेकीचे नेटवर्थ ऐकून व्हाल थक्कImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 22, 2025 | 2:59 PM
Share

बॉलिवूडमधीस पॉवरफुल कपल म्हणजे अभिनेत्री दीपिका पडूकोण आणि अभिनेता रणवीर सिंग. सध्या ते दोघं तर चर्चेत आहेत, पण त्याहून जास्त चर्चा होत्ये ती त्यांची लाडकी लेक ‘दुआ’ हिची. काल दिवाळीच्या मुहूर्तावर दीपिका-रणवीरने काही फोटो शे्र करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. ते फोटो पाहून सर्वांनाच सुखद धक्का बसला, कारण त्या फोटोत रणवीर आणि दीपिकासोबत त्यांची वर्षभराची गोड लेक दुआ ही देखील होती. 8 सप्टेंबर 2024 ला जन्माला आलेल्या दुआचा चेहरा पहिल्यांदाच सर्वांसमोर आला असून तिचं गोड हास्य, क्यूटनेस यावर लोकांच्या लाखो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत.

सोशल मीडियावर शेअर केले फोटो

दीपिकाने काल तिच्या इंस्टाग्रामवर काही खास फोटो पोस्ट केले. ज्यामध्ये रणवीर आणि दीपिका त्यांच्या मुलीकडे प्रेमाने पाहत आहेत. फोटोमध्ये रणवीर आपल्या मुलीला कुशीत घेऊन हसतो आणि दीपिका तिच्याकडे प्रेमाने पाहत आहे. दुआच्या निरागस हास्याने अनेक चाहत्यांचे मन जिंकलं. एका फोटोत ती आई दीपिकाच्या मांडीत बसून काहीतरी लक्षपूर्वक पाहतानाही दिसत्ये. या फोटोंवर लाईक्स कमेंट्सचा अगदी वर्षाव झाला आहे. रणवीर-दीपिकाची ही गोड लेख वर्षभराची आहे, पण ती आत्ताच करोडोंची मालकीण आहे. जाणून घेऊया नेटवर्थ

दीपिका-रणवीरची एकूण संपत्ती

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे दोघेही बॉलिवूडमधील सुपरस्टार आहेत. त्यांच्या चित्रपटांव्यतिरिक्त, दोघांनी जाहिराती, ब्रँड एंडोर्समेंट आणि व्यवसाय गुंतवणुकीतून लाखोंची कमाई केली आहे. रणवीर सिंगने 2010 साली ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून पदार्पण केले. त्यानतंर त्याने अनेक हिट चित्रपट दिले. तो त्याची अनोखी फॅशन आणि एनर्जीसाठीही प्रसिद्ध आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रणवीरची एकूण संपत्ती अंदाजे 415 कोटी रुपये आहे.

तर अभिनेत्री दीपिका पदुकोण ही भारतातील सर्वात महागड्या आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. ती केवळ चित्रपटांमधून पैसे कमवतेच असं नव्हे तर एका जाहिरातीसाठी ती 8 कोटींपर्यत फी आकारते. अनेक मोठ्या ब्रँड्सची अँबेसेडर म्हणून काम करणाऱ्या दीपिकाने अनेक फॅशन आणि हेल्थ स्टार्टअप्समध्येही गुंतवणूक केली आहे. रिपोर्ट्सनुसार, तिची एकूण संपत्ती 900 कोटींपेक्षा जास्त आहे.

रणवीर आणि दीपिका यांची एकत्रित संपत्ती अंदाजे 1315 कोटी आहे. त्यांची एक वर्षाची मुलगी, दुआ, या प्रचंड संपत्तीची वारस बनली आहे.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.