AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्मेंद्र यांच्या अस्थी या ठिकाणी करण्यात आल्या विसर्जित; कुटुंबातील कोण कोण उपस्थित होते?

प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांना आता खऱ्या अर्थाने अंतिम निरोप देण्यात आला. कुटुंबियाकडून धर्मेंद्र यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर नऊ दिवसांनी, कुटुंबाने हा पवित्र विधी गोपनीय पद्धतीने पार पाडला. दरम्यान धर्मेंद्र यांच्या अस्थींचे विसर्जन कुठे करण्यात आले तसेच यावेळी त्यांच्या कुटुंबातील कोण सदस्य उपस्थित होते जाणून घेऊयात.

धर्मेंद्र यांच्या अस्थी या ठिकाणी करण्यात आल्या विसर्जित; कुटुंबातील कोण कोण उपस्थित होते?
dharmendra ashes were immersed in the gangesImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 03, 2025 | 2:58 PM
Share

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी 24 नोव्हेंबर रोजी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने नक्कीच बॉलिवूडमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबाने त्यांचे अंतिम संस्कार शांततेत केले. तर आता धर्मेंद्र यांना खऱ्या अर्थाने अंतिम निरोप देण्यात आला. त्यांच्या मृत्यूच्या नऊ दिवसांनी, बुधवारी म्हणजे 3 डिसेंबर 2025 रोजी त्यांच्या कुटुंबाने त्यांचे अस्थिकलश हरिद्वारला नेण्यात आले होते. धर्मेंद्र यांच्या अस्थींचे गंगेत विसर्जन करून त्यांना अंतिम निरोप देण्यात आला. यावेळी विधीवेळी धर्मेंद्र यांचे दोन्ही मुले सनी आणि बॉबी उपस्थित होते.

धर्मेंद्र यांच्या अस्थी कुठे विसर्जित करण्यात आल्या

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या अस्थी बुधवारी सकाळी 11 वाजता वैदिक विधीनुसार हरिद्वार येथील गंगेत विसर्जित करण्यात आल्या. कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. अंत्यसंस्काराप्रमाणे, हा पवित्र समारंभ अत्यंत गुप्ततेने पार पडला, ज्यामध्ये फक्त कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

पुजाऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधीनुसार अस्थींचे विसर्जन 

सनी देओल आणि बॉबी देओल, त्यांच्या कुटुंबियांसह हरिद्वारला गेले होते. कुटुंबाने शहरातील विधीसाठी एका खाजगी हॉटेलचा घाट निवडला होता. जिथे अस्थींचे विसर्जन करण्यात आले. हा सर्व अंतिम विधी माध्यमांपासून दूर ठेवण्यासाठी देओल कुटुंबाने विशेष दखल घेतली होती. बुधवारी सकाळी11 वाजताच्या सुमारास कुटुंब हरिद्वारच्या श्रवणनाथ नगर परिसरातील पिलीभीत हाऊस घाटावर पोहोचले आणि पुजाऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधीनुसार अस्थींचे गंगेत विसर्जन करण्यात आले.

माध्यमांना कोणतीही पूर्व माहिती कळू न देण्याची खबरदारी 

खरं तर, कुटुंबाला तो एक खाजगी आणि शांतपद्धतीने तो विधी करावा अशी इच्छा होती, म्हणून माध्यमांना कोणतीही पूर्व माहिती कळू न देता हा अंतिम विधी करण्यात आला होता. तसेच घाटाच्या सभोवतालची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती.

विधीनंतर कुटुंब मुंबईकडे रवाना 

विसर्जनानंतर,दओल कुटुंब लगेच मुंबईकडे यायला रवाना झाले आहेत. पण हा सर्व विधी होईपर्यंत समाज माध्यमांना नक्कीच न कळू देण्याची खबरदारी घेण्यात आली होती.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.