Dharmendra Health : डिस्चार्जनंतर कशी आहे धर्मेंद्र यांची प्रकृती? रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सोडंल मौन
Dharmendra Health : धर्मेंद्र यांची प्रकृती नाजूक असताना कुटुंबियांनी का घेतला डिस्चार्ज? आता कशी आहे 'ही मॅन'ची प्रकृती? डॉक्टरांकडून मोठी अपडेट समोर

Dharmendra Health : बॉलिवूडचे दिग्गज स्टार धर्मेंद्र यांना 12 नोव्हेंबर रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आलं… 89 वर्षीय धर्मेंद्र यांच्यावर मुंबई येथील ब्रीच काँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. आता रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट दिली आहे. डॉ. प्रतित समदानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांना बुधवारी सकाळी साडे सात वाजता डिस्चार्ज देण्यात आलं आणि त्यांच्यावर घरी उपचार व्हावेत अशी कुटुंबियांची इच्छा आहे… धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल डॉक्टारांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे.
धर्मेंद्र यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने 10 नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर सतत वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आलं. पण जेव्हा त्यांच्या निधनाची बातमी समोर आली तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला. पण ईशा देओल आणि हेमा मालिनी यांनी संताप व्यक्त करत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत असं सांगितलं.
दरम्यान, डॉ. प्रतित समदारी यांनी एका मुलाखतीत धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती दिली आहे.. ‘धर्मेंद्र यांचे दोन मुलं सनी – बॉबी देओल आणि पहिली पत्नी प्रकाश कौर यांनी धर्मेंद्र यांनी घरी घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली. धर्मेंद्र यांनी ज्याठिकाणी आयुष्याची अनेक वर्ष घालवली आहेत, त्या ठिकाणी त्यांनी राहवं अशी कुटुंबियांची इच्छा होती..’
डॉक्टर पुढे म्हणाले, ‘कठीण काळात धर्मेंद्र यांचं संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत खंबीरपणे उभं राहीलं आणि प्रार्थना करत राहिले की, धर्मेद्र यांची प्रकृती लवकर सुधारेल… सनी, बॉबी आणि कुटुंबातील इतर सदस्य त्यांचे वडील धर्मेंद्र यांना उपचारादरम्यान आरामदायी वाटावं यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था करत होते आणि खबरदारी घेत होते.’
धर्मेंद्रच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांना त्यांनी घरी नेण्याबद्दल विचारलं होतं, त्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. कुटुंबियांनी सर्वात आधी डॉक्टरांची परवानगी घेतली आणि त्यानंतर धर्मेंद्र यांनी राहत्या घरी आणण्यात आलं… आता राहत्या घरी धर्मेंद्र यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर डॉक्टर घरी उपचारासाठी वेळेत दाखल होत आहेत… प्रतित समदानी म्हणाले, कुटुंबाने निर्णय घेतला की धर्मेंद्र यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली घरीच उपचार केले जातील.
सांगायचं झालं तर, धर्मेंद्र रुग्णालयात आहेत अशी बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांनी देखील मोठा धक्का बसला… अशा परिस्थितीत अनेकांनी चिंता देखील व्यक्त केली. आज धर्मेंद्र यांचे चाहते फक्त भारतात नाही तर, सातासमुद्रा पार देखील आहेत…
