Hema Malini : धर्मेंद्र यांच्या कुटुंबाने हेमा मालिनी यांना एकटं पाडलं… देओल कुटुंबावर गंभीर आरोप… चार भिंतींतील सत्य अखरे समोर

Hema Malini : हेमा मालिनी यांना एकटं पाडलं आणि..., धर्मेंद्र यांच्या दोन कुटुंबातील वाद अखेर चव्हाट्यावर... देओल कुटुंबावर कोणी केलं गंभीर आरोप... धक्कादायक सत्य समोर... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हेमा मालिनी यांची चर्चा

Hema Malini : धर्मेंद्र यांच्या कुटुंबाने हेमा मालिनी यांना एकटं पाडलं... देओल कुटुंबावर गंभीर आरोप... चार भिंतींतील सत्य अखरे समोर
अभिनेत्री हेमा मालिनी
| Updated on: Dec 19, 2025 | 9:06 AM

Hema Malini : दिवंगत अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. धर्मेंद्र यांनी 24 नोव्हेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर 27 नोव्हेंबर रोजी देओल कुटुंबियांनी हेमा मालिनी यांच्याकडे दुर्लक्ष करत शोक सभेचं आयोजन केलं… शोक सभेत हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली देखील दिसल्या नाहीत. एवढंच नाही, अंत्यसंस्कार होत असताना देखील हेमा मालिनी थेट स्मशानभूमीत पोहोचल्या… याच कारणामुळे धर्मेंद्र यांच्या दोन्ही कुटुंबियांमध्ये मतभेद आहेत… हे स्पष्ट झालं… असं असताना देखील हेमा मालिनी यांनी प्रतिष्ठा राखली…

सांगायचं झालं तर, बरखा दत्त यांना दिलेल्या मुलाखतीत शोभा डे यांनी देओल कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत. ‘हा निर्णय खूपच गुंतागुंतीचा आणि कठीण राहिला असेल… धर्मेंद्र यांच्या कुटुंबियांनी हेमा मालिनी यांना सर्वच गोष्टींपासून लांब ठेवलं…आयुष्याचे 45 वर्ष हेमा मालिनी यांच्या ज्या व्यक्तीसोबत घालवली…ज्या व्यक्तीवर प्रेम केलं… ज्या व्यक्तीचं आयुष्य समृद्ध केलं… त्या सर्व गोष्टींपासून हेमा मालिनी यांनी लांब ठेवलं…’

शोभा डे पुढे म्हणाल्या, ‘धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांना दोन मुली आहे… त्यांच्यासाठी सर्व परिस्थिती फार भयानक राहिली असेल… पण त्यांनी सर्व गोष्टी स्वतःच्या खासगी आयुष्यापर्यंत मर्यादित ठेवल्या… त्यांनी ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली आणि जेव्हा जेव्हा त्या कोणताही सार्वजनिक कार्यक्रम करायचा, तेव्हा मला वाटतं की त्यांनी ते अत्यंत सन्मानाने केलं, केवळ स्वतःसाठीच नाही तर त्याने गमावलेल्या व्यक्तीसाठी देखील.’

‘हेमा मालिनी स्वतः एक शक्तिशाली व्यक्तिमत्व आहेत, म्हणून सार्वजनिक प्रदर्शनातून स्वतःचे श्रेष्ठत्व दाखवण्याऐवजी प्रतिष्ठा राखण्याचा त्यांचा निर्णय त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरंच काही सांगतो. धर्मंद्र यांच्या निधनानंतर स्वतःची भावनिक बाजू मांडून हेमा मालिनी यांनी सर्वकाही स्वतःच्या बाजूने करता आलं असतं… माध्यमांना देखील त्यांना कव्हर करायचं होतं… पण त्यांनी कायम सर्व गोष्टी गुपित ठेवल्या… त्यांनी प्रतिष्ठा राखली…’ असं देखली शोभा डे म्हणाल्या.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, 1980 मध्ये समाजाच्या आणि कुटुंबियांच्या विरोधात जात हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी लग्न केलं. दुसरं लग्न केलं तेव्हा धर्मेंद्र आणि पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्या लग्ना 26 वर्ष झालेली होती आणि धर्मेंद्र चार मुलांचे वडील देखील होते…