Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्यावर उपचार यशस्वी ठरत असल्याची चिन्हं! सनी देओलनी दिली हेल्थ अपडेट
Dharmendra Health Update: सनी देओलच्या टीमने पुन्हा एकदा धर्मेंद्र यांची ताजी आरोग्य अपडेट जारी केली आहे. याचवेळी सनी, हेमा यांच्यासह कुटुंबातील अनेक सदस्य ब्रीच कँडी रुग्णालयात उपस्थित आहेत.

दिग्गज अभिनेते धर्मेंद्र सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असून चाहते ते बरे व्हावे यासाठी प्रार्थना करत आहेत. गोविंदा, शाहरुख खान, अमिषा पटेल आणि इतर काही कलाकार येऊन धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमध्ये पाहून गेले. आता त्यांचा मुलगा सनी देओल देखील हॉस्पिटलमध्ये पोहोचला आहे. त्यानंतर त्याच्या टीमने धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे.
31 ऑक्टोबर पाहून धर्मेंद्र हे ब्रीचकँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. आता त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता त्यांचा मुलगा सनी देओलने वडिलांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. सनीच्या टीमने सांगितले की धर्मेंद्र यांच्यावर उपचाराचा परिणाम होत आहे आणि त्यांची प्रकृती सुधारत आहे. सध्या, त्यांच्या कुटुंबातील सदस्य सनी देओल, बॉबी देओल, हेमा मालिनी आणि ईशा देओल रुग्णालयात उपस्थित आहेत.
सनी देओलने दिली धर्मेंद्र यांची आरोग्य अपडेट
मंगळवारी दुपारी, सनी देओलच्या टीमने एक नवे निवेदन जारी करून धर्मेंद्र यांच्या आरोग्यात सुधार झाल्याची पुष्टी केली. निवेदनात म्हटले आहे, “सर बरे होत आहेत आणि उपचाराचा परिणाम होत आहे. चला आपण सर्वजण त्यांच्या चांगल्या आरोग्याची आणि दीर्घायुष्याची कामना करू.”
कालपासून धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवा सुरु होत्या. त्यावर मुलगी ईशा देओलने प्रतिक्रिया देत पूर्णविराम दिला. तसेच धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी हेमा मालिनी यांनी देखील हल्थे अपडेट शेअर केली. तसेच या सर्व अफवा असल्याचे म्हटले.
काय होती ईशाची पोस्ट?
मंगळवारी सकाळी, ईशा देओलने धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातम्यांचा निषेध करत सांगितले की तिचे वडील बरे होत आहेत. तिने लिहिले, “असे वाटते की मीडिया अतिसक्रिय आहे आणि खोट्या बातम्या पसरवत आहे. माझ्या वडिलांची स्थिती स्थिर आहे आणि ते बरे होत आहेत, आम्ही सर्वांना विनंती करतो की आमच्या कुटुंबाला प्रायव्हसी द्या, पप्पांच्या लवकर बरे होण्याच्या प्रार्थनांसाठी धन्यवाद.”
