धर्मेंद्र यांची अतिशय मौल्यवान गोष्ट, पण त्याचे अधिकार कोणाकडे सनी देओल की हेमा मालिनी?
Dharmendra Death : धर्मेंद्र यांच्या 450 कोटींच्या संपत्तीची सर्वत्र चर्चा असताना त्यांची आणखी एक मौल्यवान गोष्ट समोर, पण त्यावर कोणाचे अधिकार, सनी देओल की हेमा मालिनी? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त धर्मेंद्र यांच्या मौल्यवान गोष्टीची चर्चा...

Dharmendra Death : दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर कुटुंबियांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सर्वत्र त्यांच्या 450 कोटींच्या संपत्तीची चर्चा सुरु आहे. धर्मेंद्र यांची संपत्तीत अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या दोन मुलींना त्यांचा हक्क मिळेल का? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. संपत्तीवरुन चर्चा सुरु असताना, धर्मेंद्र यांची आणखी एक मौल्यवान गोष्ट समोर आली आहे. पण धर्मेंद्र यांच्या मौल्यवान गोष्टीवर कोणाचा अधिकार आहे… याबद्दल देखील मोठी माहिती समोर आली आहे. सनी देओल की हेमा मालिनी यांचा याबद्दल देखील मोठी माहिती समोर आली आहे.
धर्मेंद्र यांच्या मौल्यवान गोष्टीबद्दल सांगायचं झालं तर, त्यांना कविता लिहिण्याची प्रचंड आवड होता… आयुष्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये धर्मेंद्र यांनी अनेक कविता लिहिल्या… आता कुटुंबियांनी त्यांच्या कविता पब्लिश करण्याचा निर्णय घेतला आहे… अशात त्यांच्या कविता पब्लिश करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत, मुलगा सनी देओल याच्याकडे की दुसऱ्या पत्नी हेमा मालिनी यांच्याकडे…
आयुष्याच्या अखेरीस, धर्मेंद्र यांना स्वतःची लेखन प्रतिभा कळली. त्यांनी त्यांचे शब्द कागदावर उतरवले, अनेकदा कुटुंब आणि जवळच्या मित्रांसोबत त्यांच्या भावना शेअर केल्या. आता त्यांच्या कवितांचा संग्रह प्रकाशित होणार आहे. ही बातमी समोर आल्यानंतर, सनी देओल किंवा हेमा मालिनी संबंधित प्रोजेक्ट पूर्ण करतील की नाही याबद्दल सर्वांनाच गोंधळ आहे.
लता मंगेशकर यांना आवडलेल्या धर्मेंद्र यांच्या कविता…
भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांना देखील धर्मेंद्र यांच्या कविता ऐकल्या होत्या. याबद्दल धर्मेंद्र यांनी एक मुलाखतीत देखील सांगितलं होतं… धर्मेंद्र यांनी स्वतःच्या भावना आणि कल्पना कागदावर उतरवण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर कविता करण्याचं व्यसन लागलं…
धर्मेंद्र यांच्या कवितांचे अधिकार कोणाकडे?
धर्मेंद्र यांनी स्वतः रचलेल्या कविता कुटुंबियांना वाचून दाखवल्या.. तेव्हा तुम्ही कविता प्रदर्शित करायला हव्यात.. असा सल्ला वडिलांना दिला. पण धर्मेंद्र कायम म्हणायते, ओळी अद्याप तयार झालेल्या नाहीत, जशा मला हव्या आहेत… आता धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांनी कविता प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे… रिपोर्टनुसार, देओल कुटुंबियांसोबतच हेमा मालिनी यांच्याकडे देखील धर्मेंद्र यांच्या कवितांचे अधिकार आहेत.
