धर्मेंद्र यांचा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा VIDEO व्हायरल; बग्गीत बसून…
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती सध्या सुधारत असल्याचे अपडेट दिले जात आहेत. कुटुंबीय आणि चाहते त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. त्यांची तब्येत स्थिर असून लवकरच ते पूर्णपणे बरे होतील अशी अपेक्षा आहे.दरम्यान रुग्णालयात जाण्यापूर्वीचा त्यांचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. गेल्या 11 दिवसांपासून ते रुग्णालयात आहेत. त्यांच्या कुटुंबियांकडून आणि तसेच टीमकडून धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल अपडेट देत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल माहिती देत आहेत. तसेच सर्व चाहते देखील त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी प्रार्थना करत आहेत.
अशातच धर्मेंद्र यांचा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धर्मेंद्र यांनी 2 ऑक्टोबर 2025 रोजी सोशल मीडियावर आपली शेवटची पोस्ट शेअर केली होती. त्यांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. धर्मेंद्र यांनी 2 ऑक्टोबर 2025 रोजी व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
धर्मेंद्र यांचा शेवटचा व्हिडीओ
धर्मेंद्र यांनी त्यांच्या या व्हिडीओमध्ये चाहत्यांसोबत संवाद साधला आहे. सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या व्हिडीओमध्ये ते एका बग्गीमध्ये बसलेले दिसत आहेत आणि त्यांच्या आजुबाजूला त्यांचा स्टाफ उभा असलेला पाहायला मिळत आहे. धर्मेंद्र यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे “माझ्या सर्व भावा-बहिणींना, मित्र-मैत्रिणींना, लहान मुला-मुलींना सर्वांना दसऱ्याच्या खूप-खूप शुभेच्छा. देव तुम्हाला भरपूर आयुष्य आणि आनंद देवो”. धर्मेंद्र आणि बॉबी देओल यांनीदेखील धर्मेंद्र यांच्या व्हिडीओवर खास कमेंट केली आहे. तसेच चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनीदेखील धर्मेंद्र यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
View this post on Instagram
धर्मेंद्र यांचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
धर्मेंद्र सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रत्यन करत असतात. धर्मेंद्र यांचा IKKIS हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात घेत आहेत उपचार
धर्मेंद्र यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळं त्यांना सोमवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती हेमा मालिनी यांनी तसेच त्यांच्या इतर टीमकडूनही ही माहिती मिळत आहे.
धर्मेंद्र यांनी आजपर्यंत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘सत्यकाम’, ‘सीता और गीता’ अनेक एकापेक्षा चित्रपटांमधू त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. म्हणूनच चाहते देखील ते लवकर बरे होण्याची प्रार्थना करत आहेत.
