हेलन यांचं खडतर आयुष्य, पहिल्या नवऱ्याच्या निधनानंतर, खान कुटुंबात एन्ट्री आणि…
Helen First Husband: कोण होते हेलन यांचे पहिले पती? 27 वर्ष मोठ्या दिग्दर्शकासोबत लग्न, कंगाल झालेली अभिनेत्री, पहिल्या नवऱ्याच्या निधनानंतर खान कुटुंबात एन्ट्री आणि..., हेलन कायम खासगी आयुष्यामुळे असतात चर्चेत...
‘ओई मां ओई मां…’, ‘इस दुनिया में जीना है तो…’, ‘पिया तू अब तू अब तो आजा…’, यांसारख्या अनेक गाण्यांवर दमदार डान्स करत चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री हेलन आता खान कुटुंबाचा भाग आहेत. हे अनेकांना माहिती आहे. पण हेलन याच्या पहिल्या पतीबद्दल फार कोणाला माहिती नाही. एक काळ असा होता जेव्हा हेलन यांनी डान्सच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण खासगी आयुष्यात मात्र हेलन यांनी अनेक संकटांचा सामना केली. तेव्हा प्रत्येक दिग्दर्शकासाठी हेलन फार महत्त्वाच्या होत्या.
हेलन यांनी ओळख हिंदी सिनेविश्वातील ‘आयटम नंबर क्वीन’ अशी होती. हेलन यांना आजही कोणत्या ओळखीची गरज नाही. पण हेलन यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार कोणाला माहिती नाही. हेलन यांचं दुसरं लग्न लेखक सलीम खान यांच्यासोबत झालं आहे. पण त्यांच्या पहिल्या पतीबद्दल फार कोणाला माहिती नाही…
बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना हेलन स्वतःपेक्षा 27 वर्ष मोठ्या दिग्दर्शकाच्या प्रेमात पडल्या. दोघांनी लग्न देखील केलं. पण लग्नानंतर हेलन यांना वैवाहिक आयुष्याचं सुख अनुभवता आलं नाही. हेलन यांच्या पहिल्या पतीने त्यांच्यावर अनेक आरोप केले. शिवाय हेलन यांना कंगाल देखी केलं.
सांगायचं झालं तर, हेलन यांचं ‘मेरा नाम चिंचिन चू’ हे गाणं सुपरहिट ठरलं. यानंतर हेलन यांनी एकामागून एक हिट गाणी दिली. त्यावेळी हेलन प्रत्येक चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्याची पसंती बनल्या होत्या. पण दिग्दर्शक प्रेम नारायण अरोरा यांची आयुष्यात एन्ट्री झाल्यानंतर त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला.
प्रेम नारायण अरोरा यांच्यासोबत लग्न झालं तेव्हा हेलन फक्त 19 वर्षांच्या होत्या. दोघांनी 1957 साली लग्न झालं होतं. हेलन यांचं पहिलं लग्न त्यांच्या 35 व्या वाढदिवशी तुटलं. प्रेम नारायण अरोरा आणि हेलन यांचं लग्न फक्त 16 वर्ष टिकलं. रिपोर्टनुसार, प्रेम नारायण अरोरा यांच्यावर आरोप होते की, ते हेलन यांच्या पैशांवर आनंद घ्यायचा. त्यांनी हेलन यांचं सर्व पैसे देखील स्वतःच्या नावावर केले होते. घराचं भाडं भरण्यासाठी देखील हेलन यांच्याकडे पैसे नव्हते. हेलन पूर्णपणे कंगाल झाल्या होत्या.
भाडं भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे हेलन यांच्याकडून अपार्टमेंटही हिसकावून घेतलं. त्यानंतर हेलन यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. तेव्हा सलीम खान यांनी हेलन यांची मदत केली. 1973 मध्ये पीएन अरोरा करीना कपूरचे वडील रणधीर कपूर आणि सुलक्षणा पंडित यांच्यासोबत ‘करिश्मा’ सिनेमा बनवत होते. सिनेमाचं शूटिंग सुरू झाल्यानंतर अवघ्या 3 महिन्यांत पीएन अरोरा यांचे अचानक निधन झालं. त्यानंतर हेलन आणि सलीम खान यांनी 1981 मध्ये लग्न केलं. आता खान कुटुंबासोबत हेलन आनंदी आयुष्य जगत आहेत.