हे अत्यंत भीतीदायक..; कॅन्सरवरील उपचारांच्या साइड इफेक्ट्सने घाबरली दीपिका
दीपिकाला मे महिन्यात कॅन्सरचं निदान झालं होतं. तिच्यावर सर्जरीही करण्यात आली होती. या उपचारानंतर तिला साइड इफेक्ट्स जाणवू लागले आहेत. याविषयीची माहिती तिने व्लॉगद्वारे दिली आहे. हे अत्यंत भीतीदायक असल्याचं तिने म्हटलंय.

‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्करला मे महिन्यात दुसऱ्या स्टेजच्या लिव्हर कॅन्सरचं निदान झालं होतं. तिच्यावर सर्जरीसुद्धा करण्यात आली आणि त्यानंतरचे रिपोर्ट्स नॉर्मल आले. दीपिका तिच्या युट्यूब चॅनलवरील व्लॉग्सद्वारे चाहत्यांना तब्येतीचे अपडेट्स देत असते. आता नुकत्याच एका व्लॉगमध्ये तिने साइड इफेक्ट्सचा खुलासा केला. उपचारानंतर केसांची गळती मोठ्या प्रमाणात होत असल्याचं तिने सांगितलं आहे. दररोज अधिकाधिक होत असलेल्या केसगळतीमुळे तिला चिंता वाटू लागली आहे.
याविषयी दीपिका तिच्या व्लॉगमध्ये म्हणाली, “मी आज दिवसभर आराम केला, कारण मला बरं वाटत नव्हतं. मला साइड इफेक्ट्स अजूनही जाणवत आहेत, परंतु त्यांची आता सवय झाली आहे. फक्त केस गळण्याच्या समस्येमुळे मी चिंतेत आहे. कारण खूप जास्त प्रमाणात केस गळत आहेत. अंघोळ करून आल्यानंतर मी दहा-पंधरा मिनिटं फक्त शांत बसते, कोणाशीच काही बोलत नाही. इतके माझे केस गळत आहेत. मला आता त्या गोष्टीची भीती वाटू लागली आहे.”
या व्लॉगमध्ये दीपिकाने तिच्या रिपोर्ट्सविषयीही माहिती दिली. नुकत्याच झालेल्या मेडिकल टेस्टचे रिपोर्ट्स चांगले असल्याचं तिने म्हटलंय. “मी शोएबच्या व्लॉगमध्ये आधीच माझे रिपोर्ट्स शेअर केले आहेत. तीन महिन्यांनंतर आम्ही ट्युमर मार्करचे टेस्ट आणि LFT वगैरे केले, त्या सर्वांचे रिपोर्ट्स नॉर्मल आले. ट्युमर मार्कर नॉर्मल असल्याने डॉक्टरांनी सध्या FAPI स्कॅन करू नका असा सल्ला दिला आहे. परंतु दोन महिन्यांनंतर तो स्कॅन करावा लागेल”, अशी माहिती दीपिकाने दिली.
View this post on Instagram
दीपिकाच्या पोटात सतत वेदना होत असल्याने डॉक्टरांनी तिच्या सर्व चाचण्या केल्या. तेव्हा तिच्या लिव्हरमध्ये टेनिस बॉलच्या आकाराचा ट्युमर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर तो ट्युमर स्टेज 2 कॅन्सरचा असल्याचं निदान झालं. दीपिकाच्या लिव्हरमधील ट्युमर काढण्यासाठी तिच्यावर 14 तासांची सर्जरी करण्यात आली होती. या सर्जरीनंतर दीपिकाच्या शरीरात कॅन्सरच्या कोणत्याही पेशी नसल्याचं शोएबने स्पष्ट केलं.
कॅन्सरचं निदान झाल्यानंतर शोएब आणि दीपिकाने त्यांच्या युट्यूब चॅनलवर एक व्लॉग पोस्ट केला होता. त्यामध्ये ती म्हणाली होती, “कॅन्सर हा शब्द प्रत्येकासाठी खूप भीतीदायक, घाबरवणारा असतो. हा आजार मानसिकदृष्ट्या खूप घाबरवतो. परंतु डॉक्टरांनी सांगितलं आहे की मी पूर्णपणे बरी होऊ शकते. मला गॉल ब्लॅडरमधील स्टोनमुळे पोटात सतत दुखायचं. जेव्हा उपचारांनीही हे दुखणं बरं झालं नाही तेव्हा आम्ही सिटी स्कॅन केलं. त्यात ट्युमर असल्याचं निदान झालं होतं. नंतर समजलं की तो कॅन्सरचा ट्युमर आहे. ही देवाच्या परीक्षेची वेळ आहे, पण यातूनही आम्ही लवकरच बाहेर पडू.”
