AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farah Khan : ‘जास्त उडू नकोस..’ फराहने पापाराझींसमोरच कुक दिलीपला सुनावलं, वागणूक पाहून चाहते…

कोरिओग्राफर- दिग्दर्शिका फराह खान आणि तिच्या कूकचा, दिलीपचा एक व्हिडिओ समोर आला आहे, मात्र त्यामध्ये पराहने दिलीपला जशी वागणूक दिली , त्याची सगळीकडे चर्चा सुरू आहे. त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.

Farah Khan : 'जास्त उडू नकोस..' फराहने पापाराझींसमोरच कुक दिलीपला सुनावलं, वागणूक पाहून चाहते...
फराह खान- कूक दिलीप
| Updated on: Oct 03, 2025 | 12:26 PM
Share

चित्रपट निर्माती आणि कोरिओग्राफर फराह खान आणि तिचा कूक, दिीप यांचे व्हिडीो, त्यांची नोकझोक ही सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. त्यांचे व्हीलॉग अलिकडे चर्चेचा विषय बनले आहेत. मात्र याच फराहने कॅमेऱ्यांसमोपर, पापाराझींसमोरच कूक दिलीप याला जी वागणूक दिली, त्याची सध्या बरीच चर्चा होत आहे. फराहचा एक व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये तिची वागणूक पाहून खरी फराह कोण, असा प्रश्न काही चाहत्यांना पडला आहे. कारण त्या व्हिडीओमध्ये ती कूक दिलीप याला ढकलताना, त्याच्या रूडली बोसताना दिसली.

व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये फराह खान ही आशिष चंचलानी आणि मुनावर फारुकी यांच्यासोबत एका पापाराझी स्पॉटिंग दरम्यान पोज देत होती, तेव्हा दिलीपने त्यांच्यासोबत उभं राहण्याचा प्रयत्न केला. मात्र ते पाहून फराह त्याला म्हणाली, मध्ये येऊ नको, मध्ये येऊ नको, जास्त उडू नकोस.” अशा शब्दांत तिने फटकारलं. मात्र ते पाहून सोशल मीडियावरच्या काही यूजर्सना फराहचे ते वागणं आवडलं नाही आणि कमेंट सेक्शनमध्ये विविध प्रतिक्रिया देत तिला फटकारलं आहे. मात्र त्यावर फराहने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.

जेव्हा हा व्हिडिओ समोर आला तेव्हा फराहला ट्रोल करण्यात आले. रीलच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते, “रील विरुद्ध रिअ‍ॅलिटी.” रीलमध्ये, मुनावर फारुकी आणि आशिष चचलानी फराहसोबत आहेत आणि फराह दिलीपला सांगते, “मध्ये येऊ नकोस… खूप उंच उडू नकोस.” नंतर जेव्हा फराहने रील पाहिली तेव्हा तिने स्पष्टीकरण देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला की मी मुलाशी देखील असं बोलतं. कमेंट सेक्शनमध्ये तिने लिहिले, “जाणं गजेचं हे. मी माझ्या मुलालाही तेच सांगेन. पाहुणा नेहमीच सर्वात महत्वाचा असतो.” असं तिने म्हटलं.

नक्की काय झालं ?

फराह खानने अलीकडेच तिच्या यूट्यूब चॅनलवर ‘आंटी किसको बोला?’ हा एक नवीन शो लाँच केला आहे. अलिकडच्याच एका एपिसोडच्या शूटिंगनंतर, ती विनोदी कलाकार मुनावर फारुकी आणि आशिष चंचलानी यांच्यासोबत दिसली, जे तिच्यासोबत जज म्हणून सामील झाले. ते तिघेही पोज देत असताना, दिलीप हा फ्रेममध्ये आला आणि ते पाहून पापाराझी मजेत ओरडले की, ” (आता) खरा स्टार आला आहे.” त्यानंतर दिलीपने त्यांच्यासोबत पोज देण्याचा प्रयत्न केला. मात्र तेव्हाच फराहची कमेंट आली आणि तिने त्याला फटकारलं. त्यावर विविध कमेंट्स येत आहेत.

खरंतर फराह खान हिने 2024 साली तिचा कूक दिलीपसोबत स्वयंपाकाचे व्लॉग बनवण्यास सुरुवात केली. व्हिडिओंमध्ये, ती वेगवेगळ्या सेलिब्रिटींच्या घरी जाते, त्यांच्या स्वयंपाकघरात त्यांच्यासोबत पदार्थ बनवते आणि मनोरंजक गप्पा मारते. त्यांचे व्लॉग्स खूप लोकप्रिय झाले आहेत आणि फराह आणि दिलीपच्या मजेदार संभाषणांमुळे त्यांना सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. त्याच्या मुलांना चांगल्या शाळांमध्ये शिक्षण दिल्याबद्दल आणि त्याच्या गावात एक मोठे घर बांधण्यास मदत केल्याबद्दल दिलीप अनेकदा फराहचे आभार मानतो.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.