‘बिग बॉस 19’ मधून बाहेर पडणारा पहिला कोण होता आठवतंय का? तेही एका खास कारणास्तव
बिग बॉस 19 चा आज ग्रँड फिनाले आहे. रात्री 9 वाजता कलर्स टीव्ही आणि ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टारवर लाईव्ह पाहू शकणार आहात. टॉप 5 मधील कोणता स्पर्धक विजेता ठरणार आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. पण जेव्हा बिग बॉस 19 सुरु झालं तेव्हा पहिला स्पर्धक कोण होता ज्याला 24 तासातच घराबाहेर जावं लागलं होतं? चला जाणून घेऊयात.

आज 7 डिसेंबर 2025 रोजी “बिग बॉस 19” चा ग्रँड फिनाले होणार आहे. आज रात्री 9 वाजता कलर्स टीव्ही आणि ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टारवर लाईव्ह पाहू शकणार आहात. गौरव खन्ना, अमाल मलिक, फरहाना भट्ट, प्रणित मोरे आणि तान्या मित्तल हे बिग बॉस 19 चे टॉप पाच स्पर्धक आहेत. ते सर्व ट्रॉफीसाठी जोरदार स्पर्धा करताना दिसत आहेत. आता कोण विजेता होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकांनाही उत्सुकता आहे.
आता पर्यंतच्या प्रवासात स्पर्धकांच्या खेळापासून ते त्यांच्या खऱ्या स्वभावापर्यंत सर्व काही प्रेक्षकांसमोर आलं आहे. आज बिग बॉस 19 चा शेवटचा दिवस असताना पहिल्या दिवसांची आठवणही होते. त्यातील एक गोष्ट म्हणजे बिग बॉस 19 मधून पहिला स्पर्धक कोण बाहेर पडलं होतं? चला पुन्हा एकदा शोतील पहिल्या काही दिवसांची आठवण करूयात.
बिग बॉस 19 डावपेचांनी भरलेला
टीव्ही रिअॅलिटी शो बिग बॉस 19 सुरू होऊन फक्त 24 तासच झाले होते, तेव्हा एका स्पर्धकाचा प्रवास संपला होता. घरातील नाट्य आणि सस्पेन्स पहिल्याच दिवशी शिगेला पोहोचला. तीव्र वादविवाद, परस्पर मतभेद आणि राजकीय डावपेचांनी स्पर्धकांना उत्साहित केले, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने प्रेक्षकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होता. पण आता, बिग बॉसने अखेर खरा खेळ खेळला आहे. बिग बॉसने सर्व अधिकार घरातील सदस्यांना दिले असले तरी, त्याच्या कृतींनी प्रेक्षकांना धक्का बसला.
View this post on Instagram
या स्पर्धकाला बिग बॉस 19 च्या घरातून बाहेर काढण्यात आले होते?
शोच्या पहिल्याच दिवशी कुनिका सदानंद आणि बसीर अली यांच्यात वाद झाला, तर घरातील सदस्यांमध्ये कामावरून भांडणेही सुरू झाली. या सर्वांमध्ये, 25 ऑगस्ट रोजी 24 तासांच्या आत घरातून बाहेर काढलेली पहिली स्पर्धक होती फरहाना भट्ट. हो, फरहाना भट्टचा घरातला प्रवास खूपच कमी होता. घरातील सदस्यांशी ती चांगले नाते निर्माण करू शकली नव्हती असं कारण देत लोकशाही प्रक्रियेद्वारे तिला बाहेर काढण्यात आले. घरातील सदस्यांच्या निर्णयानंतर तिचे नाव घरातून बाहेर जाण्यासाठी देण्यात आले होते.
घरातील सदस्यांनी फरहाना भट्टला नामांकित केले
जेव्हा सर्वांना वाटले की फरहानाचा प्रवास संपला आहे, तेव्हा शोमध्ये एक मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळाला. घराबाहेर पडल्यानंतर फरहानाला एका सिक्रेट रुममध्ये ठेवण्यात आले होते. सिक्रेट रुममध्ये पाठवलेला स्पर्धक घरातील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवू शकतो. त्याबद्दल नक्कीच कोणाला कल्पना नसते. फरहानाने सीक्रेट रूममध्ये राहून घरातील सदस्यांवर लक्ष ठेवतं त्यांचे गॉसिप, त्यांचे खेळाची पद्धत, स्वभाव या काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला. सिक्रेट रुममधून पुन्हा बिग बॉसच्या घरात परतल्यानंतर अनेक वाद-विवादही झाले, पण तेव्हापासून ते आज फिनालेपर्यंत फरहाना पोहोचली आहे. आज ती टॉप 5 मध्ये पोहोचली आहे. ती टॉप 3 पर्यंत जाते का किंवा ट्ऱॉफिपर्यंत पोहोचते का हे पाहणे महत्त्वाचे आहे.
