Aishwarya Rai- Abhishek Bachchan : सासर सोडून ऐश्वर्या राहते माहेरी ? अभिषेकसोबतच्या घटस्फोटाचं सत्य काय ? शेजाऱ्यानेच केली पोलखोल
ऐश्वर्या तिच्या सासरच्या घरातून बाहेर पडून, बच्चन कुटुंबाचे घर सोडून तिच्या आईसोबत राहते. जया बच्चन आणि श्वेता बच्चन यांच्याशी मतभेद असल्याने ऐश्वर्या घटस्फोट घेण्याचा विचार करते आहे, अशा अनेक अफवा बऱ्याच काळापासून सुरू आहेत. काय आहे त्यामागचं सत्य ? ऐश्वर्याच्या जवळच्या व्यक्तीने सगळं सांगितलं..

काही महिन्यांपूर्वी, अभिनेत्रीऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या बातम्या मोठ्या प्रमाणात पसरल्या होत्या. एवढंच नव्हे तर ऐश्वर्या तिच्या सासरच्या घरातून बाहेर पडून, बच्चन कुटुंबाचे घर सोडून तिच्या आईसोबत राहत आहे असेही म्हटले जात होते. अभिषेक- ऐश्वर्या लवकरच कायदेशिररित्या विभक्त होणार आहे, अशाही चर्चा खूप सुरू होत्या. मात्र या सर्व बातम्यांवर ऐश्वर्या किंवा अभिषेकपैकी कोणीची प्रतिक्रिया दिली, मौन सोडलं नाही. मात्र आता त्यांच्या नात्याबद्दल ऐश्वर्याच्या एक जवळच्या व्यक्तीने भाष्य केलं आहे.
प्रसिद्ध ॲडफिल्ममेकर प्रल्हाद कक्कर यांनी या सर्व गोष्टींमागचे कारण सांगितलं आहे. ऐश्वर्या खरंच तिचं सासर सोडून आईच्या घरी राहते का, यावरही त्यांनी मौन सोडलं आहे.
खरं सांगायचं तर ऐश्वर्या जेवहापासून मॉडेलिंग करत होती, प्रल्हाद कक्कर हे तिला त्या काळापासून जवळून ओळखतात, ते तिच्याबद्दल अतिशय प्रोटेक्टिव्ह आहेत. ते आणि ऐश्वर्या एकाच बिल्डींमध्ये राहतात. त्यामुळे त्यांनी ऐश्वर्या-सलमानची प्रेमकहाणी आणि त्या दोघाचं ब्रेकअपही जवळून पाहिलं आहे. अभिषेक बच्चनसोबत घटस्फोट होत असल्याची बातमी समोर आली तेव्हा असे म्हटले जात होते की ऐश्वर्या तिच्या आईच्या घरी राहायला गेली आहे. पण विकी लालवानी यांना दिलेल्या मुलाखतीत प्रल्हाद कक्कर यांनी त्या दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्यांना ‘मूर्खपणा’ म्हटले.
ऐश्वर्या आईच्या घरी राहते ?
याबाबत प्रल्हाद कक्कर म्हणाले, “मी आणि ऐश्वर्या एकाच इमारतीत राहतो. ती तिथे किती वेळ घालवते हे मला माहिती आहे. तिच्या आईची तब्येत बरी नसल्याने ऐश्वर्या आईच्या घरी येते. आधी ती तिची मुलगी आराध्याला शाळेत सोडते आणि नंतर तिला घेऊन जाते. मधल्या काळात वेळ मिळाला की ती तिच्या आईला भेटत असते, तिच्यासोबत वेळ घालवते. ती तिच्या आईच्या किती जवळ आहे आणि ती तिची किती काळजी घेते हे मला माहीत आहे” असं सांगत कक्र यांनी सर्व अफवा फेटाळून लावल्या.
जया बच्चन-श्वेता मुळे वैतागून ऐश्वर्या घेणार होती घटस्फोट ?
मध्यंतरी अशाही अफवा पसरल्या होत्या की जया बच्चन आणि श्वेता बच्चन यांच्याशी मतभेद असल्याने ऐश्वर्या घटस्फोट घेण्याचा विचार करत आहे. त्याबद्दलही प्रल्हाद कक्कर यांना विचारले असता, ते म्हणाले, “मग काय झालं ? ती घराची सून आहे आणि अजूनही घर चालवते. मला माहित होते की त्यात काहीही तथ्य नाही. कारण मला माहित होते की ती तिथे का येत होती.” असंही त्यांनी नमूद केलं.
अभिषेतही घेतो सासूबाईंची काळजी
“लोक म्हणत होते की ती तिच्या लग्नापासून पळून तिच्या आईसोबत राहत आहे. ती तिच्या आईसोबत राहत नव्हती. ती फक्त तिची मुलगी शाळेत असताना भेटायची आणि तिच्यासोबत वेळ घालवायची.आणि ती रविवारी येत नसे. मला माहित होते की तिला (ऐश्वर्या राय) तिच्या आईची किती काळजी होती. कधीकधी अभिषेकही तिच्यासोबत तिच्या आईला भेटायला यायचा.” असंही कक्कर यांनी सांगितलं.
अफवांवर मौन का ?
” जर तुम्ही नीट पाहिलं असेल, तर अभिषेक किंवा ऐश्वर्या दोघांनीही यावर (घटस्फोटाच्या बातम्यांवर) भाष्य केलेले नाही. आणि त्यांनी ते का करावे? तुम्ही भुंकत राहता. ऐश्वर्या नेहमीच तिचा सन्मान राखत आली आहे आणि म्हणूनच पत्रकार तिचा तिरस्कार करतात.” अशी टिपण्णीही प्रल्हाद कक्कर यांनी केली.
अभिषेक-ऐश्वर्याचं नातं
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन या दोघांचे 2007 साली लग्न झाले. त्यांच्या लग्नाला 18 वर्षं झाली असून आराध्या ही मुलगी आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या नुकतेच त्यांच्या मुलीसोबत सुट्टीवरून परतले आणि ते विमानतळावर स्पॉट झाले होते. कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ऐश्वर्या बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर आहे आणि ती 2023 मध्ये आलेल्या “पोन्नियिन सेल्वन २” चित्रपटात ती शेवटची दिसली होती. तर अभिषेक हा “कालिधर लपटा” या चित्रपटामध्ये नुकताच दिसला होता.
