AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Don 3 : ज्या ‘डॉन 3’ वरून एवढा वाद सुरू, त्यात रणवीरला कोण करणार रिप्लेस ? या 2 अभिनेत्यांची नावं चर्चेत

Don 3 : ‘डॉन 3’ मधून बाहेर पडणं अभिनेता रणवीर सिंहला खूप महागात पडला आहे. FWICE नुकतेच त्याच्याविरुद्ध नॉन-कोऑपरेशनचे आदेश दिले. त्यामुळे आता कोणीही त्याच्यासोबत काम करू शकत नाही. ज्या पिक्चरवरून एवढा वाद सुरू आहे, फरहान अख्तरच्या त्या 'डॉन 3' चित्रपटात आता कोणता अभिनेता झळकणार ?

Don 3 :  ज्या ‘डॉन 3’ वरून एवढा वाद सुरू, त्यात रणवीरला कोण करणार रिप्लेस ? या 2 अभिनेत्यांची नावं चर्चेत
डॉन 3 मध्ये रणवीर नाही, तर आता कोण दिसणार ?
| Updated on: May 27, 2026 | 1:13 PM
Share

‘धुरंधर’ चित्रपटाचे दोन्ही भाग रणवी सिंहसाठी अत्यंत यशस्वी ठरले, बॉक्स ऑपीसवर मोठा गल्ला कमावल्याने रणवीरचं खूप नावं झालं. या चित्रपटाच्या दोन्ही भागांनी त्याला जितका आनंदल दिला, तितकीच समस्या त्याला DON 3 मुळे झाली. हा पिक्चर बऱ्याच काळापासून त्याच्या हातात होता. जानेवारीत तर पिक्चरचं कामही सुरू होणार होतं. पण शूटिंग सुरू होण्याच्या काही दिवस आधीच रणवीरने काम करण्यास नकार देत चित्रपट सोडला. यामुळे आपल्याला 45 कोटींचं नुकसान झाल्याचं फरहान अख्चरचं म्हणणं आहे. त्याने एफडब्ल्यूआयसीईची (FWICE) मदत घेऊन या नुकसानीची भरपाई मागितली. त्यानंतर आता रणवीर सिंह संकटात असून त्याच्याविरुद्ध चित्रपटसृष्टीत नॉन-कोऑपरेशनचे निर्देश देण्यात आले आहेत. हा प्र्शन सुटेपर्यंत, त्यावर तोडगा निघेपर्यंत कोणीही रणवीरसोबत काम करू नये असं सांगण्यात आलं आहे, त्यामुळे त्याच्या पुढल्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत.

मात्र ‘डॉन 3’ मधून रणवीर सिंग बाहेर पडल्यानंतर, त्याच्या जागी आता कोणता अभिनेता चित्रपटात दिसणार असा प्रश्न असून सध्या शाहरुख खान आणि हृतिक रोशन या दोन नावांची चर्चा सुरू आहे. शाहरुख खानने या चित्रपटाला आधीच नकार दिला असताना, हृतिक रोशननेही या चित्रपटातील त्याच्या सहभागाच्या अफवा फेटाळून लावल्या होत्या. मग ही चर्चा सुरू का झाली?

खरं तर, जेव्हा रणवीर सिंगने चित्रपट सोडला आणि फरहान अख्तरने त्याला झालेल्या तोट्याबद्दल भाष्य केले, तेव्हा रणवीर सिंगने निर्मात्यांवर आरोप केल्याची बातमीही समोर आली होती. रणवीरने असा दावा केला होता की, त्याला बदलण्याची योजना होती आणि शाहरुख खान व हृतिक रोशन यांच्याशी चर्चा सुरू होती. मात्र, ही बातमी केवळ अफवा असल्याचे सांगून हृतिकने चर्चा फेटाळून लावली. आपल्याला ही भूमिका कधीच ऑफर झाली नव्हती, असंही त्याने स्पष्ट केलं. पण आता त्याच्यासाठी गोष्टी जुळून येतील का?

रणवीरच्या जागी ‘डॉन 3’ मध्ये कोण दिसणार ?

सध्या सर्वात मोठा प्रश्न हा आहे की अभिनेता शाहरुख खान हा ‘डॉन’ फ्रँचायझीमध्ये परत येणार का ? पण या प्रश्नाचे उत्तर निर्मात्यांकडेही नाही असे दिसते. सुरुवातीला असं म्हटलं जात होतं की तो (शाहरुख) चित्रपटा एक छोटी भूमिका (कॅमिओ) करेल. पण नंतर अशीही चर्चा सुरू झाली की जर ॲटली हा चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणून सामील झाला तरच शाहरूख चित्रपटात सामील होईल, मात्र ॲटलीने हे वृत्त फेटाळून लावले. आता, फरहान अख्तरला त्याच्या कठीण काळात शाहरुख साथ देतो की नाही , हे पाहण्यासाठी चाहत्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. पण तो काम करण्याची शक्यता कमी आहे, कारण तो आधीच इतर पिक्चरच्या कामात बिझी आहे.

शाहरुखनंतर दुसरं नाव आहे हृतिक रोशचनं. त्याचे नाव आधीच या प्रोजेक्टशी जोडलं गेलं होतं. पण मला हा पिक्चर कधीच ऑफर झाला न्वहता, असं म्हत हृतिकने सर्व अफवांना पूर्णविराम दिला होता. मात्र, आता निर्मात्यांची इच्छा असल्यास, ते हृतिकला चित्रपटात त्याला घेऊ शकतात. जर हृतिकही काम करण्यास तयार झाला तो चित्रपटासाठी एक उत्तम पर्याय ठरेल. पण आधी झालेले नुकसान भरून काढावं लागेल, तरंच पुढचं काम सुरू होऊ शकतं.

Follow Us
आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं...
Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क...
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालक..
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट...
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत,
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट
तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange : तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत...
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत मोठी अपडेट समोर
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला..
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन,
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक? आज...
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक... अगामी सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... लक्ष्मण हाके Video
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... पुन्हा लक्ष्मण हाकेच्या घरातील व्हिडीओ व्हायरल
शिंदेंकडून गणेशोत्सव तर ठाकरेंकडून ईदच्या शुभेच्छा,'मातोश्री' बाहेर...
शिंदे गटाकडून गणेशोत्सव तर ठाकरे गटाकडून ईदच्या शुभेच्छा, 'मातोश्री' बाहेरील त्या बॅनरर्सची तुफान चर्चा