Drishyam 2: अवघ्या 7 दिवसांत ‘दृश्यम 2’ने ‘भुल भुलैय्या 2’ला टाकलं मागे; जाणून घ्या कमाई..

पहिल्या आठवड्यात 'दृश्यम 2'ची जबरदस्त कमाई; विजय साळगावकरने रुह बाबाला दिली मात

Drishyam 2: अवघ्या 7 दिवसांत 'दृश्यम 2'ने 'भुल भुलैय्या 2'ला टाकलं मागे; जाणून घ्या कमाई..
Drishyam 2Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Nov 25, 2022 | 10:01 AM

मुंबई: अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने कमाईचा 100 कोटींचा टप्पा पार केला. अवघ्या सात दिवसांत ‘दृश्यम 2’ने कमाईचा आकडा गाठला आहे. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. पहिल्या चित्रपटाच्या सात वर्षांनंतर हा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

बॉक्स ऑफिस कलेक्शन-

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून अजय देवगणच्या या चित्रपटाने जोरदार कमाई केली आहे. आता पहिल्या आठवड्यात दृश्यम 2 ने 104.74 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. 2022 या वर्षात 100 कोटींचा टप्पा पार करणारा हा पाचवा हिंदी चित्रपट ठरला आहे. इतकंच नव्हे तर दृश्यम 2 हा अजय देवगणच्या करिअरमध्ये 100 कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट होणारा तेरावा चित्रपट आहे.

आतापर्यंतची कमाई-

शुक्रवार- 15.38 कोटी रुपये शनिवार- 21.59 कोटी रुपये रविवार- 27.17 कोटी रुपये सोमवार- 11.87 कोटी रुपये मंगळवार- 10.48 कोटी रुपये बुधवार- 9.55 कोटी रुपये गुरुवार- 8.70 कोटी रुपये एकूण- 104.74 कोटी रुपये

हे सुद्धा वाचा

अजय देवगणच्या या चित्रपटाने कार्तिक आर्यनच्या ‘भुल भुलैय्या 2’ या चित्रपटाला मागे टाकलं आहे. कार्तिक आर्यनच्या भुल भुलैय्या 2 ने पहिल्या आठवड्यात 92.05 कोटी रुपयांची कमाई केली होती. भुल भुलैय्या 2 चं लाइफटाइम बॉक्स ऑफिस कलेक्शन 185.92 कोटी रुपये इतकं होतं. आता या आकड्यालाही ‘दृश्यम 2’ पार करेल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दृश्यम 2 ने 100 कोटींचा टप्पा सहजतेने पार केला. मात्र 25 नोव्हेंबरपासून वरुण धवन आणि क्रिती सनॉनचा ‘भेडिया’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यामुळे दृश्यम 2 च्या कमाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.