शुटींगदरम्यान रवीना दररोज रात्री हॉटेलची रुम बदलायची, कारण….; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा
बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींना कास्टिंग काऊच आणि असुरक्षिततेचा सामना कसा करावा लागत होता, हे रेणुका शहाणे यांनी धक्कादायक खुलाश्याने सांगितले आहे. तसेच त्यांनी रवीना टंडनबद्दलही एक गोष्ट सांगितली कि ती शूटिंगदरम्यान दररोज रात्री हॉटेलची खोली बदलत असे. त्यामागचं धक्कादायक कारणही त्यांनी सांगितलं आहे.

इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकारांना कास्टींग काऊचचा अनुभव आला. विशेषत: अभिनेत्रींसोबत असे प्रसंग अनेकदा घडताना दिसतात. आणि हे प्रसंग अगदी 80s,पण 90sच्या दशकातही घडलेले आहेत. तसेच आता जशी अभिनेत्रींसोबत बॉडीगार्डची फौज असते तसेच अभिनेत्रींच्या राहण्यापासून ते व्हॅनिटीपर्यंत सर्व काही उत्तम सोय असते तसं त्या वेळी अभिनेत्रींच्या सुरक्षेचा प्रश्न बऱ्याचदा समोर आला आहे. तसेच अनेक अभिनेत्रींनी विचित्र अनुभवही आले आहेत.
इंडस्ट्रीत आलेला धक्कादायक अनुभव
अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी अलीकडेच इंडस्ट्रीत त्यांना आलेला एक धक्कादायक अनुभव शेअर केला. एका विवाहित निर्मात्याने त्यांना विचित्र डिमांड केली होती, ज्यामुळे त्यांना धक्का बसला होता. तसेच जेव्हा त्यांनी त्या प्रोड्यूसरची डिमांड नाकारली तेव्हा त्यांना काय अनुभव आला तेही त्यांनी सांगितलं आहे. तसेच त्यांनी त्यावेळी अभिनेत्रींकडे पाहण्याचा दृष्टीकोण कधीकधी कसा असायचा हे देखील त्यांनी सांगितले.
अभिनेत्रीने अयोग्य ऑफर नाकारली की सूड घेण्याचा प्रयत्न करतात
“त्या काळात चित्रपटसृष्टीत महिलांचा आदर नव्हता आणि अभिनेत्रींना अनेकदा अडचणी येत असत. चित्रपटसृष्टीतील अनेक लोकांनी अशा गैरवर्तनाचे अनुभव घेतले आहेत. परंतु भीती आणि असुरक्षिततेमुळे बहुतेक लोक बोलू शकत नाहीत. तसेच अनेकदा, जेव्हा कोणी अयोग्य ऑफर नाकारतो तेव्हा ते सूड घेण्याचा प्रयत्न करतात. ते इतरांना सांगतात की त्या कलाकाराला प्रोजेक्टमध्ये घेऊ नका किंवा प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतात. ही एक अतिशय धोकादायक परिस्थिती आहे.” हे देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.
View this post on Instagram
रवीना दररोज रात्री हॉटेलची रुम का बदलत असे?
दरम्यान त्यांनी रवीना टंडनचा एका अनुभव सांगून त्यावेळी परिस्थीती अभिनेत्रींना कशापद्धतीने हाताळायला लागायची असंही त्यांनी सांगितलं आहे. त्यांनी सांगितले की,
“रवीना दररोज रात्री हॉटेलची रुम बदलत असे. ती एक मोठी बॉलीवूड स्टार असतानाही तिला तिच्या सुरक्षेसाठी अत्यंत खबरदारी घ्यावी लागत असे. रवीना एकदा मला म्हणाली होती की जेव्हा जेव्हा ती बाहेरच्या शूटिंगला जायची तेव्हा तिला आणि तिच्या टीमला दररोज हॉटेलच्या खोल्या बदलाव्या लागत होत्या जेणेकरून ती कोणत्या रुममध्ये राहत आहे हे कोणालाही कळू नये. रात्रीच्या वेळी कोणत्याही व्यक्तींनी त्रास देऊ नये म्हणून हे केले गेले. कारण त्या काळातील अभिनेत्रींसाठी ते खूप भयावह वातावरण होते. बऱ्याचदा पुरुष कलाकार किंवा निर्माते रात्रीच्या वेळी घराचे दरवाजे ठोठावत असत आणि सर्व सुरक्षा खबरदारी घेतल्यानंतरही समस्या बऱ्याचदा संपत नव्हत्या.” असं म्हणत त्यांनी रवीनासारख्या सुपरस्टार अभिनेत्रीलाही हा संघर्ष करावा लागल्याचं सांगितलं.
परिस्थिती अजूनही पूर्णपणे सुरक्षित नाही
आज इंडस्ट्रीमध्ये जागरूकता वाढली असून महिलांच्या आदराबद्दल चर्चा होते पण अनेक ठिकाणी परिस्थिती अजूनही पूर्णपणे सुरक्षित नाही.असं मतही त्यांनी स्पष्टपणे मांडलं.
