Bigg Boss 14 | ‘बिग बॉस 14’च्या घरात एकता कपूरची धमाकेदार एंट्री, नवा ट्विस्ट खेळ बदलणार!

टीव्ही क्षेत्राचीही राणी लवकरच सलमान खानसह ‘बिग बॉस’च्या (Bigg Boss) घरात झळकणार आहे. एकता कपूर तिचा आगामी वेब शो ‘बिच्छू का खेल’चे प्रमोशन करण्यासाठी ‘बिग बॉस 14’च्या घरात प्रवेश करणार आहे.

Bigg Boss 14 | ‘बिग बॉस 14’च्या घरात एकता कपूरची धमाकेदार एंट्री, नवा ट्विस्ट खेळ बदलणार!

मुंबई : निर्माती एकता कपूर (Ekta Kapoor) अवघ्या मनोरंजन विश्वात प्रसिद्ध आहे. टीव्ही क्षेत्राचीही राणी लवकरच सलमान खानसह ‘बिग बॉस’च्या (Bigg Boss) घरात झळकणार आहे. एकता कपूर तिचा आगामी वेब शो ‘बिच्छू का खेल’चे प्रमोशन करण्यासाठी ‘बिग बॉस 14’च्या घरात प्रवेश करणार आहे. एकता कपूर या घरात एक नवा ट्विस्ट घेऊन येणार आहे. यानंतर घरातील सगळेच डावपेच उलटणार आहेत (Ekta Kapoor entry in Bigg Boss 14 House).

एकता कपूर या घरात प्रवेश करण्यास उत्सुक असल्याचे कळते आहे. दरवेळी ‘बिग बॉस’च्या आवाजाने आणि गाण्याच्या आवाजाने स्पर्धकांच्या दिवसाची सुरुवात होते. मात्र, यावेळचा ‘विकेंड का वार’ थोडा वेगळा असणार आहे. गाण्याऐवजी यावेळी एकता कपूरच्या आवाजाने घरातल्यांच्या दिवसाची सुरुवात होणार आहे.

टीव्ही क्वीन घरात ‘लीप’ आणणार…

एकता कपूर बिग बॉसच्या घरातील सदस्यांना घरी येताच अनेक कामेही देणार आहे. यावेळी बिग बॉसच्या घरातही मोठा लीप दाखवला जाणार आहे. एकता कपूरच्या शोमध्ये असेच लीप येत असतात. म्हणूनच ‘बिग बॉस’ खास एकतासाठी ‘लीप’ फॉर्म्युला वापरणार आहे. इतकेच नाही तर सलमान खानसह एकता कपूरही स्पर्धकांचे पाय खेचताना दिसणार आहे.

(Ekta Kapoor entry in Bigg Boss 14 House)

घराला कर्णधाराची प्रतीक्षा

निक्की आणि जानच्या या वादामुळे चिडलेल्या ‘बिग बॉस’ने जुना ‘कॅप्टन’सी टास्क (Captaincy Task) रद्द करत, नव्या टास्कची घोषणा केली. त्यामुळे या आठवड्यात घराला अद्याप ‘कर्णधार’ मिळालेला नाही. या नव्या कॅप्टन्सी टास्कमध्ये घरातील जुन्या कर्णधारांनाच सहभागी होता येणार आहे. इतर स्पर्धकांना या खेळात सहभागी होता येणार नाही. जास्मीन भसीन, अली गोनी, कविता कौशिक आणि एजाज खान यांच्यादरम्यान हा ‘कर्णधार’पदाचा सामना रंगणार आहे. ‘बिग बॉस’ने राहुल वैद्यला या खेळाचा संचालक बनवले आहे (Ekta Kapoor entry in Bigg Boss 14 House).

घरातल्यांकडून खेळाला सुरुवात

या टास्कदरम्यान घरातील इतर स्पर्धकांनी बॉक्समध्ये बंद असणाऱ्या स्पर्धकांना त्रास देण्यास सुरुवात केली. फोबियामुळे अली गोनी या खेळातून स्वतः आऊट झाला. कविता कौशिकला त्रास देऊ पाहणाऱ्या जान कुमार सानूला निक्कीने रोखले. यावर जान कुमार सानू निक्कीला म्हणाला की, त्याला कविताला या घराची कर्णधार होवू द्यायचे नाही. जान कविताच्या बॉक्समध्ये तेल आणि स्प्रे टाकतो. तर, दुसरीकडे राहुल पवित्राच्या बॉक्समध्ये स्प्रेची फवारतो. यावरून राहुल आणि एजाजमध्ये वाद झाले.

एजाज आणि पवित्रामध्ये वाद

अली खेळातून बाद झाल्यानंतर एजाजने देखील स्वतःहून बॉक्स उडवला आणि पवित्राला खेळाबाहेर केले. पवित्रा बॉक्समधून बाहेर पडल्याने आता ती नॉमिनेट झाली आहे. यावर संतापलेल्या जान कुमार सानूने एजाज खानला बऱ्याच गोष्टी सुनावल्या. ज्या व्यक्तीने कायम तुला साथ दिली, त्याच व्यक्तीसोबत तू असे का करतोस, असा प्रश्न जानने एजाजला केला. जान दुःखी झाल्याने पवित्रा आणि एजाजने एकमेकांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. पण काही वेळाने दोघांनी एकमेकांना दोष द्यायला सुरुवात केली. यानंतर पवित्रा-एजाजमध्ये जोरदार भांडण झाले. या सगळ्या वादात मात्र, अजूनही घराला कर्णधार मिळालेला नाही.

(Ekta Kapoor entry in Bigg Boss 14 House)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *