Top 5 News | सलमान खानने घेतली मीराबाई चानूची भेट ते इंडियन आयडॉलमध्ये आशिषकडून पवनदीपला मिळणार सरप्राईज, वाचा मनोरंजन विश्वातील घडामोडी

दररोज मनोरंजन विश्वात काही छोट्या-मोठ्या बातम्या चर्चेत असतातच. चाहते त्यांच्या आवडत्या स्टार्सशी संबंधित बातम्या जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. मनोरंजन विश्वातील बातम्यांच्या दृष्टीनेही गुरुवार खूप महत्त्वाचा होता.

Top 5 News | सलमान खानने घेतली मीराबाई चानूची भेट ते इंडियन आयडॉलमध्ये आशिषकडून पवनदीपला मिळणार सरप्राईज, वाचा मनोरंजन विश्वातील घडामोडी
Top 5 news

मुंबई : दररोज मनोरंजन विश्वात काही छोट्या-मोठ्या बातम्या चर्चेत असतातच. चाहते त्यांच्या आवडत्या स्टार्सशी संबंधित बातम्या जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. मनोरंजन विश्वातील बातम्यांच्या दृष्टीनेही गुरुवार खूप महत्त्वाचा होता. मात्र, जर तुम्ही बुधवार म्हणजेच 12 ऑगस्ट 2021च्या मनोरंजन विश्वाशी संबंधित बातम्या चुकवल्या असतील, तर तुम्ही त्या मनोरंजन टॉप 5 मध्ये वाचू शकता.

इंडियन आयडॉल 12 च्या अंतिम फेरीत आशिषकडून पवनदीपला मिळणार सरप्राईज!

सोनी टेलिव्हिजनचा प्रसिद्ध शो इंडियन आयडॉल (India Idol 12) 12 अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. इंडियन आयडॉल बऱ्याच काळापासून छोट्या पडद्यावर वर्चस्व गाजवत आहे. आता या स्वातंत्र्य दिनला (Independence Day) इंडियन आयडॉल सीझन 12 त्याच्या दर्शकांसाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा शेवट घेऊन आला आहे! या हंगामाचा एक भाग असलेल्या आशिष कुलकर्णीनं त्याचा मित्र पवनदीप राजनला खूप पाठिंबा दिला आणि या खास दिवशी त्याच्या मित्रासाठी त्यानं एक विशेष सरप्राईज दिलं. त्यानं स्वतःसाठी आणि पवनदीपसाठी त्यांच्या नावाची नेम प्लेट बनवली, त्यावर लिहिलं होतं – संगीत दिग्दर्शक ड्युओ (संगीत दिग्दर्शकांची जोडी). मित्र पवनदीपला पाठिंबा देताना आशिष कुलकर्णी म्हणाला, “सर्व स्पर्धक माझ्या कुटुंबासारखे आहेत, मात्र या संपूर्ण प्रवासात पवनदीप माझा पहिला मित्र झाला. म्हणूनच मी त्याच्या जास्त जवळ आहे.”

बादशाह आणि सहदेवचं ‘बचपन का प्यार’ गाणं पाहिलंत?

‘बचपन का प्यार’ (Bachpan Ka Pyaar) या गाण्याच्या माध्यमातून सोशल मीडियावर (Social Media) लोकप्रिय झालेल्या सहदेव दिर्डोचं पहिलं अधिकृत गाणं रिलीज करण्यात आलं आहे. हे गाणं प्रसिद्ध रॅपर बादशाहनं (Badshah) तयार केलं आहे. गाण्याचे शीर्षकही ‘बचपन का प्यार’ असंच ठेवण्यात आलं आहे. या गाण्याबद्दल बराच काळ सोशल मीडियावर चर्चा होती. शेवटी हे गाणं आता रिलीज करण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे स्वत: बादशाहनं हे गाणं आपल्या सोशल मीडियावर सुद्धा शेअर केलं आहे. ‘बचपन का प्यार’ या गाण्यात सहदेवने बादशहासोबत सादरीकरणही केलं आहे. गाणं रिलीज होऊन थोडा वेळ झाला आहे आणि हे गाणं आता यूट्यूबच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये आलं आहे. सहदेव, बादशाह व्यतिरिक्त हे गाणं आस्था गिल आणि रिको यांनी एकत्र गायलं आहे. गाण्याचे बोल बादशाहनं लिहिले आहेत. बादशाहनं त्याच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरही हे गाणं रिलीज केलं आहे.

डोक्यात घाव घातला, बेशुद्धही केलं, जीव घेणार इतक्यात चंदाला जाग आली!

‘देवमाणूस’ (Devmanus) ही लोकप्रिय मालिका आता आपल्या शेवटच्या टप्प्यात आली आहे. मालिकेचं कथानक बऱ्याच वेगाने पुढे सरकत आहे. सध्या मालिकेत चंदा नव्याच्या एका पात्राची एंट्री झाली आहे. ही चंदा ‘डॉ अजित कुमार देव’ उर्फ देवी सिंग याला आपल्या तालावर अक्षरशः नाचवत आहे. केवळ पैशाच्या मोहापायी अनेक स्त्रियांचा जीव घेणाऱ्या या देवी सिंगला चंदा आता चांगलाच धडा शिकवत आहे. मात्र, नुकताच देवी सिंगने चंदाला देखील जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. सतत पैशांचा तगादा लावणाऱ्या चंदाकडे डॉ. अजित कुमार देवच देवी सिंग असल्याचा पुरावा आहे. या सोबतच डिम्पल देखील देवी सिंगला सामील असल्याचे चंदाला माहित आहे. त्यामुळे दोघांच्या या रहस्यांवरील पडदा उठून नये, आणि आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून चंदा दोघानाही आपल्या तालावर नाचवत आहे.

‘केवळ मराठी व्यक्तीरेखा म्हणून मराठी कलाकार असं नको’, सचिन पिळगावकरांनी व्यक्त केली खंत

नुकताच प्रिया बापट मुख्य अभिनेत्री म्हणून झळकलेल्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा दुसरा सीझन (City Of Dreams 2) प्रदर्शित झाला आहे. या बहुचर्चित वेब सीरीजचा दुसरा सीझन प्रेक्षकांना खूपच आवडला आहे. प्रेक्षक यावर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. यातील अभिनेता सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांनी साकारलेल्या भूमिकेला देखील प्रेक्षकांकडून वाहवा मिळत आहे. याचा दरम्यान अभिनेते सचिन पिळगावकर यांनी एक मुलाखत दिली आहे. या मुलातील त्यांनी आपल्या मनातील अनेक भवनांना वात करून दिली. हिंदी सीरीज आणि चित्रपटांमध्ये केवळ मराठी व्यक्तिरेखांसाठी मराठी कलाकारांचा विचार केला जातो. मात्र, असं न करता सगळ्याच गोष्टी चौकट ठेवून न विचार करता झाल्या पाहिजेत, असे त्यांनी आपल्या मुलाखतीत म्हटले आहे.

सलमान खानने घेतली मीराबाई चानूची भेट, सोशल मीडियावर फोटो शेअर करताच झाला ट्रोल!

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले पदक जिंकणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानूने (Mirabai Chanu) अलीकडेच बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याची भेट घेतली. मीराबाई चानू यांनी देशासाठी रौप्य पदक जिंकले. सलमान खानने मीराबाई चानूची भेट घेतल्याचा फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. फोटो शेअर केल्यानंतर बॉलिवूडचा हा भाईजान सोशल मीडियावर खूप ट्रोल होऊ लागला आहे. या शेअर केलेल्या फोटोमध्ये लोकांनी असे काहीतरी पाहिले, ज्यासोबत सलमान खानचे खूप जुने नाते आहे.

हेही वाचा :

Rang Majha Vegla : नकळतपणे कार्तिक सांभाळतोय त्याच्या मुलीला…, निर्माण होईल का जिव्हाळा?

बदाम पाडायला गेले अन् बाबासाहेबाचं दर्शन झालं; वाचा, शाहीर यमराज पंडित यांचा अविस्मरणीय किस्सा!

Published On - 10:39 am, Fri, 13 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI