India Idol 12 : इंडियन आयडॉल 12 च्या अंतिम फेरीत आशिषकडून पवनदीपला मिळणार सरप्राईज, जाणून घ्या काय असेल खास?

या हंगामाचा एक भाग असलेल्या आशिष कुलकर्णीनं त्याचा मित्र पवनदीप राजनला खूप पाठिंबा दिला आणि या खास दिवशी त्याच्या मित्रासाठी त्यानं एक विशेष सरप्राईज दिलं. (Pavandeep will get a surprise from Ashish in the final round of Indian Idol 12, find out what will be special?)

India Idol 12 : इंडियन आयडॉल 12 च्या अंतिम फेरीत आशिषकडून पवनदीपला मिळणार सरप्राईज, जाणून घ्या काय असेल खास?

मुंबई : सोनी टेलिव्हिजनचा प्रसिद्ध शो इंडियन आयडॉल (India Idol 12) 12 अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. इंडियन आयडॉल बऱ्याच काळापासून छोट्या पडद्यावर वर्चस्व गाजवत आहे. आता या स्वातंत्र्य दिनला (Independence Day) इंडियन आयडॉल सीझन 12 त्याच्या दर्शकांसाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा शेवट घेऊन आला आहे! या हंगामाचा एक भाग असलेल्या आशिष कुलकर्णीनं त्याचा मित्र पवनदीप राजनला खूप पाठिंबा दिला आणि या खास दिवशी त्याच्या मित्रासाठी त्यानं एक विशेष सरप्राईज दिलं.

काय आहे पवनदीपसाठी सरप्राईज

त्यानं स्वतःसाठी आणि पवनदीपसाठी त्यांच्या नावाची नेम प्लेट बनवली, त्यावर लिहिलं होतं – संगीत दिग्दर्शक ड्युओ (संगीत दिग्दर्शकांची जोडी). मित्र पवनदीपला पाठिंबा देताना आशिष कुलकर्णी म्हणाला, “सर्व स्पर्धक माझ्या कुटुंबासारखे आहेत, मात्र या संपूर्ण प्रवासात पवनदीप माझा पहिला मित्र झाला. म्हणूनच मी त्याच्या जास्त जवळ आहे.

तो पुढे म्हणाला की मी त्याला सुरुवातीपासूनच पाहातो आहे आणि एक गोष्ट निश्चित आहे की पवनदीप गाण्याच्या बाबतीत खूप समर्पित आहे. तो जेव्हा जेव्हा एखादं गाणं सादर करतो तेव्हा ते आपल्या हृदयाला स्पर्श करतं. त्याच्या आवाजात खूप सखोलता आहे. मी देवाकडे प्रार्थना करत राहिलो की पवनदीपनं पहिल्या 6 मध्ये स्थान मिळवावं आणि तो ही ट्रॉफी जिंकेल. ‘म्युझिक डायरेक्टर डुओ’ ची ही नेम प्लेट एक छोटंसं सरप्राईज असू शकते, मात्र मला माहित आहे की आमचा एक संगीतमय संबंध आहे आणि आम्ही लवकरच एकत्र काम करू. ”

पवनदीप झाला खूश आहे

आशिषच्या या सुंदर सरप्राईजनंतर, पवनदीपनं आपल्या भावना व्यक्त केल्या आणि म्हणाला, “आशिष माझं कुटुंब आहे. सेटवर आणि बाहेर त्यानं दिलेल्या मोठ्या पाठिंब्याबद्दल मी त्याचा आभारी आहे. आम्ही नेहमी एकत्र सराव केला आणि प्रत्येक वेळी प्रक्रियेचा आनंद घेतला, ही भेट मिळाल्याबद्दल मला खूप आनंद झाला. हे खरं आहे की आम्ही एकत्र बरीच गाणी तयार करणार आहोत आणि आमच्या चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहू, मी भाग्यवान आहे की ती माझ्या आयुष्यात आहे. ”

संबंधित बातम्या

Mouni Roy : हिरवा लेहेंगा आणि दिलकश अंदाज, मौनी रॉयचा पारंपारिक अवतार पाहिलात?

‘केवळ मराठी व्यक्तीरेखा म्हणून मराठी कलाकार असं नको’, सचिन पिळगावकरांनी व्यक्त केली खंत

Ratris Khel Chale 3 | ‘आता काळजाचा ठोका चुकणार नाही तर थांबेल…कायमचा…’, ‘शेवंता’च्या पुनरागमनासाठी चाहते उत्सुक!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI