‘केवळ मराठी व्यक्तीरेखा म्हणून मराठी कलाकार असं नको’, सचिन पिळगावकरांनी व्यक्त केली खंत

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 12, 2021 | 2:39 PM

हिंदी सीरीज आणि चित्रपटांमध्ये केवळ मराठी व्यक्तिरेखांसाठी मराठी कलाकारांचा विचार केला जातो. मात्र, असं न करता सगळ्याच गोष्टी चौकट ठेवून न विचार करता झाल्या पाहिजेत, असे त्यांनी आपल्या मुलाखतीत म्हटले आहे.    

‘केवळ मराठी व्यक्तीरेखा म्हणून मराठी कलाकार असं नको’, सचिन पिळगावकरांनी व्यक्त केली खंत
सचिन पिळगावकर

मुंबई : नुकताच प्रिया बापट मुख्य अभिनेत्री म्हणून झळकलेल्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा दुसरा सीझन (City Of Dreams 2) प्रदर्शित झाला आहे. या बहुचर्चित वेब सीरीजचा दुसरा सीझन प्रेक्षकांना खूपच आवडला आहे. प्रेक्षक यावर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. यातील अभिनेता सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांनी साकारलेल्या भूमिकेला देखील प्रेक्षकांकडून वाहवा मिळत आहे. याचा दरम्यान अभिनेते सचिन पिळगावकर यांनी एक मुलाखत दिली आहे. या मुलातील त्यांनी आपल्या मनातील अनेक भवनांना वात करून दिली.

हिंदी सीरीज आणि चित्रपटांमध्ये केवळ मराठी व्यक्तिरेखांसाठी मराठी कलाकारांचा विचार केला जातो. मात्र, असं न करता सगळ्याच गोष्टी चौकट ठेवून न विचार करता झाल्या पाहिजेत, असे त्यांनी आपल्या मुलाखतीत म्हटले आहे.

एकाच प्रकारच्या भूमिका करायच्या नाहीत!

एका प्रसिद्ध वेबसाईटला दिलेल्या या मुलाखतीत सचिन पिळगावकर यांनी आपल्या मनातील अनेक गोष्टींना वाट मोकळी करून दिली. ते म्हणाले, माझ्याकडेही अनेक भूमिका आल्या, पण मीच त्यांना नकार दिला. मला सतत एका साच्यातील भूमिका नको वाटत. भूमिका सर्कारताना त्यात वेगळेपणा असावा. जर लोकांना असं वाटत असेल की मराठी अभिनेता आहे, तर ते बरोबर नाही. मी हिंदी विश्वातही खूप काम केलंय. माझी मातृभाषा मराठी आहे आणि मला तिचा खूप अभिमान आहे, पण इतरवेळी लोक मला फक्त सचिन म्हनून ओळखतात.’

ओटीटीने देखील आपले विचार बदलावेत!

पुढे ते म्हणाले की, हिंदी वेब विश्वातही काहीसं असंच आहे. या सीरीजमधील मराठी व्यक्तीरेखांसाठीच फक्त मराठी कलाकारांचा विचार केला जातो. कलाकार हा कलाकार असतो, त्याच्यावर भाषेच बंधन नसतं. त्यामुळे केवळ मराठी व्यक्तीरेखा म्हणून मराठी कलाकार असं व्हायला नको. सगळ्यांना नव्या संधी मिळायला हव्यात, असे ते म्हणाले.

‘सिटी ऑफ ड्रीम्स 2’ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद!

‘सीरिज सिटी ऑफ ड्रीम्स’ सीझन 1च्या शेवटी, या राजकीय पार्टीची भव्य बैठक पहिली होती. जगदीश दिल्लीसाठी योजना आखतो आणि त्याचा मार्ग मोकळा करून घेतो. दरम्यान, पौर्णिमाला हल्ल्याबद्दल माहिती मिळते. त्यामुळे सीझन 1मध्ये शिल्लक राहिलेली ही कहाणी सीझन 2 मध्येही सुरू राहील. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा पहिला सीझन 13 मे 2019 रोजी प्रदर्शित झाला.

या वेब सीरीजमध्ये अभिनेत्री प्रिया बापटसोबतच सिद्धार्थ चांदेकर, अतुल कुलकर्णी, देवस दीक्षित, विकास केणी, संदीप कुलकर्णी असे अनेक दिग्गज मराठी कलाकार झळकले आहेत. मराठी कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे ही सीरीज प्रचंड गाजली होती. तर, नुकताच प्रदर्शित झालेला याचा दुसरा सीझन अर्थात ‘सिटी ऑफ ड्रीम्स 2’ देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

हेही वाचा :

‘आता काळजाचा ठोका चुकणार नाही तर थांबेल…कायमचा…’, ‘शेवंता’च्या पुनरागमनासाठी चाहते उत्सुक!

डोक्यात घाव घातला, बेशुद्धही केलं, जीव घेणार इतक्यात चंदाला जाग आली! आता ‘देवमाणसा’चं काय होणार?

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI