घटस्फोटाच्या अनेक वर्षांपूर्वीच माही हिला सोडून या व्यक्तीच्या प्रेमात जय भानुशाली, धक्कादायक खुलासा…
जय भानुशाली आणि माही विजने घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर मोठी खळबळ उडाली. थेट गंभीर आरोप करण्यात आली. लग्नाच्या 14 वर्षानंतर दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. मात्र, घटस्फोट नेमका कोणत्या कारणाने घेतला हे कळू शकले नाही.

अभिनेता जय भानुशाली आणि टीव्ही अभिनेत्री माही विज यांचा घटस्फोट झाला. लग्नाच्या 14 वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. माही आणि जय भानुशाली यांच्या घटस्फोटाबद्दल कळताच लोकांना धक्का बसला. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आयुष्यात काय सुरू आहे हे सांगताना कायमच जय भानुशाली आणि माही विज दिसत. विशेष म्हणजे दोघांची लव्हस्टोरीही अत्यंत खास होती. मात्र, अचानक त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. माही आणि जयची एका मुलगी असून तिचे नाव तारा आहे. शिवाय त्यांनी एक मुलगा आणि मुलगीही दत्तक घेतली. एकून तीन मुलांचे आई वडील जय आणि माही आहेत. जय आणि माही दोघेही कायमच एकमेकांसोबत आनंदी दिसत. पण त्यांनी अचानकपणे विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
माही आणि जय भानुशाली यांच्या घटस्फोट झाला असला तरीही नेमके घटस्फोटाचे कारण काय ते अजूनही कळू शकले नाही. मात्र, यादरम्यानच त्यांची एक मुलाखत चांगलीच व्हायरल होताना दिसतंय. त्यावरून कळतंच की, माही आणि जय यांच्या नात्यात गेल्या कित्येक दिवसांपासून तणाव होता. काही महिन्यांपूर्वीच यांच्या घटस्फोटाचे संकेत होते. या मुलाखतीमध्ये जय भानुशाली आणि माही दोघेही उपस्थित होते.
जय म्हणतो की, माझ्याबद्दल हिला इतक्या तक्रारी होत्या तर तिने मला त्यावेळी नाही म्हणायला हवे होते ना. माझी मुलगी तारा फक्त माझ्यावर गेली आहे… कोणत्याच अॅंगलने हिच्यासारखी नाहीये ती… यावेळी जय म्हणाला की, आम्ही एखाद्या पुरस्कार सोहळ्यालाही जात होतो तर वेगवेगळ्या गाड्यांमध्ये जात. लव्ह स्टोरीबद्दल बोलताना जय आणि माहीने म्हटले की, आम्ही न्यू इअरला होतो.. यादरम्यान बस असाच माहाैल तयार झाला. यावर माही काहीतरी वेगळा चेहरा करत म्हणाली, असेच मी हो म्हटले.
त्यावेळी माझे असे काही नव्हते की, मला प्रपोज केला पाहिजे वगैरे काही. यावर जय भानुशाली म्हणाला की, माझ्याकडून ते शक्यही झाले नसते. यादरम्यानच माही म्हणते की, तारा तर आमच्या दोघांवरही गेली नाही. माही पुढे म्हणाली की, आयुष्यात आता असा वेळ आला की, बोलायला साधा वेळही मिळत नाही. कधी मुलेसोबत असतात तर कधी ताराला झोपवायचे असते तर कधी काही करायचे असते. आता वाद घालायला वेळच मिळत नाही. यादरम्यान माही हिने म्हटले की, तो मला प्रपोज वगैरे करत नाही तो त्याच्या मुलीला करतो. यावर जय भानुशाली म्हणाला की, आता माझे प्रेम ती आहे माझी मुलगी.
