मी हॉस्पिटलला पोहोचण्याच्या 12 मिनिटांआधी आईने प्राण सोडला, अभिनेता अमन वर्माची खंत

अभिनेता अमन यतन वर्मा याच्या मातोश्री कैलाश वर्मा यांचे 18 एप्रिल रोजी निधन झाले. (Aman Yatan Verma mother death)

मी हॉस्पिटलला पोहोचण्याच्या 12 मिनिटांआधी आईने प्राण सोडला, अभिनेता अमन वर्माची खंत
अभिनेता अमन यतन वर्मा आणि मातोश्री कैलाश वर्मा

मुंबई : प्रख्यात अभिनेता अमन यतन वर्मा (Aman Yatan Verma) याला मातृशोक झाला. घरात घसरुन पडल्यानंतर उपचारादरम्यान कैलाश वर्मा (Kailash Verma) यांचे निधन झाले. आपण रुग्णालयात पोहोचण्याच्या अवघ्या 12 मिनिटांआधी आईने अखेरचा श्वास घेतला होता, अशी खंत अमनने इन्स्टाग्राम पोस्टवर लिहिली आहे. (Famous Actor Aman Yatan Verma shares emotional post after Mother Kailash Verma Death)

“बोचणी आयुष्यभर राहील”

अभिनेता अमन यतन वर्मा याच्या मातोश्री कैलाश वर्मा यांचे 18 एप्रिल रोजी निधन झाले. कोरोना संसर्गाच्या काळात आपली आईशी नीट भेटही होऊ शकली नव्हती. मी चित्रिकरणात व्यस्त असल्यामुळे आईची भेट घेणं टाळत होतो. माझ्यामुळे तिला कोरोना संसर्ग होऊ नये असं वाटत होतं. आता ती गेली. मी हॉस्पिटलला पोहोचण्याच्या 12 मिनिटांआधी आईने प्राण सोडला, या गोष्टीची बोचणी आयुष्यभर राहील, अशा शब्दात अमन यतन वर्माने आपल्या भावनांना सोशल मीडियाच्या माध्यमातून वाट मोकळी करुन दिली. क्योंकि सास भी कभी बहु थी, कहता है दिल, ना आना इस देस लाडो, देवी यासारख्या टीव्ही मालिका, खुलजा सिम सिम, जादू यासारख्या शोंमुळे अमन लोकप्रिय झाला आहे.

आणि अघटित घडलं…

79 वर्षीय कैलाश वर्मा 11 एप्रिल रोजी घरात घसरुन पडल्या होत्या. दोन दिवसांनी त्यांना नोएडातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. “आईची कोरोना चाचणी निगेटिव्ह होती. हायपरटेंशन आणि स्थूलता यासारखे आजार तिला होते. पाच दिवसांनी शरीरातील प्राणवायू धोक्याच्या पातळीवर आला आणि अघटित घडलं.” असं अमन लिहितो.

स्मशानभूमीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीषणता जाणवली

“नोएडातील स्मशानभूमीत मला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीषणता जाणवली. रुग्णवाहिकांच्या रांगा पाहणं हृदयद्रावक आणि तितकंच भीतीदायकही होतं. अंत्यसंस्कार हा पवित्र विधी आहे. मात्र विद्युतदाहिनीला इतकी गर्दी झाली, की त्यांना कोरोनाग्रस्त आणि नॉन कोव्हिड अशा दोन्ही मृतदेहांवर एकत्र अंत्यसंस्कार करावे लागले. हे घाबरवणारं होतं” असंही अमन लिहितो.

“आपल्या देशात काय चाललंय, त्याबद्दल कोणीच बोलत नाहीये. गोष्टी हाताबाहेर जात आहेत. वेळेत वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे तरुणही कोरोनामुळे बळी पडत आहेत. रोजच सहकारी आणि समवयस्क लोकांच्या मृत्यूच्या वार्ता कानावर पडत आहेत. सर्वांसाठीच हा कठीण काळ आहे. हा एक असा कालखंड आहे, जो संपूर्ण जग एकत्रित लक्षात ठेवेल” अशा भावना अमन वर्माने व्यक्त केल्या आहेत. (Aman Yatan Verma mother death)

 

View this post on Instagram

 

A post shared by aman yatan verma (@amanyatanverma)

संबंधित बातम्या 

केस आता खुद्द डॅाक्टर धन्वंतरींच्या हातात… आईच्या निधनानंतर डॉ. गिरीश ओक यांची डोळे ओलावणारी कविता

कोरोनाने माझा धडधाकट मित्र 15 दिवसात खाल्ला; अभिनेता अमोल धावडेंच्या निधनावर प्रवीण तरडेंची भावूक पोस्ट

(Famous Actor Aman Yatan Verma shares emotional post after Mother Kailash Verma Death)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI