ज्या अभिनेत्याला विलासरावांनी घर दिलं, ज्यानं गोविंदासोबत काम केलं, त्याची कोरोनाने एक्झिट

नांदलस्कर यांनी आतापर्यंत 40 नाटके, 30 हून अधिक मराठी आणि हिंदी सिनेमे तसेच 20 हून अधिक मालिकांमध्ये काम केले आहे.

ज्या अभिनेत्याला विलासरावांनी घर दिलं, ज्यानं गोविंदासोबत काम केलं, त्याची कोरोनाने एक्झिट
अभिनेते किशोर नांदलस्कर
Follow us
| Updated on: Apr 20, 2021 | 4:04 PM

मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेते किशोर नांदलस्कर (Kishore Nandlaskar died) यांचं कोरोनाने निधन झालं. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी आपल्या विनोदी पात्रांनी गाजवलेल्या या अभिनेत्याला कोरोनाने ग्रासलं होतं. दोन आठवड्यापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर किशोर नांदलस्कर यांनी दुपारी 12.30 च्या सुमारास ठाणे इथे अखेरचा श्वास घेतला. (Marathi and Hindi actor Kishore Nandlaskar died due to coronavirsu covid19 at Thane Maharashtra)

किशोर नांदलस्कर यांनी वास्तव सिनेमात दीड फुट्याच्या बापाची साकरलेली भूमिका असो, वा गोविंदाच्या जिस देश में गंगा रहता है मधील ‘सन्नाटा’ असो, या भूमिका गाजवल्या.किशोर नांदलस्कर हे पूर्वी मुंबईतील भोईवाडा-परळ इथे राहात होते. मुंबईतील घर छोटं असल्यामुळे ते मंदिरात झोपायचे. याबाबतचं वृत्त दैनिक सकाळमध्ये आल्यानंतर, तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्यांना घर मंजूर केलं होतं. त्यांना बोरिवलीत चांगलं घर मिळालं होतं.

बालपणापासून अभिनयाची आवड

किशोर नांदलस्कर यांचा जन्म मुंबईचाच. मुंबईत लॅमिंग्टन रस्ता, नागपाडा, घाटकोपर आणि अन्य काही भागात त्यांचे बालपणपण गेले. ‘न्यू इरा हायस्कूल’ आणि ‘युनियन हायस्कूल’ येथे त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. किशोर नांदलस्कर यांना अभिनयाचा वारसा त्यांचे वडील खंडेराव यांच्याकडून मिळाला होता. त्या काळात त्यांनी नाटकांमधून स्त्री भूमिका केल्या होत्या. केशवराव दाते यांच्या नाटक कंपनीत तसेच अन्य काही नाटकांमधून देखील त्यांनी काम केले होते. पुढे अभिनयाला रामराम करून खंडेराव यांनी काही काळ ‘ज्युपीटर’ गिरणीत नोकरी केली. गिरणीत काम करत असतानाच ते आंतरगिरणी तसेच कामगार नाटय़स्पर्धेतही नाटके बसवायचे. त्या वातावरणातच नांदलस्कर लहानाचे मोठे झाले. त्यामुळे अभिनयाची आवड त्यांना बालपणापासूनच होती (Marathi and Hindi actor Kishore Nandlaskar died due to coronavirsu covid19 at Thane Maharashtra).

एका शब्दाची भूमिका

‘आमराई’ या नाटकातून त्यांनी मनोरंजन विश्वात पदार्पण केले. खरं तर या नाटकात त्यांची भूमिका ‘बाप्पा’ अशी हाक मारण्यापूरतीच होती. मात्र, हीच त्यांची खरी सुरुवात होती. एका नामांकित वृत्तपत्राला मुलाखत देताना त्यांनी यासंदर्भात अनेक आठवणी सांगितल्या होत्या. पहिल्याच नाटकात भीती वाटल्यामुळे एक शब्द देखील तोंडून निघाला नाही आणि त्यावेळी प्रेक्षकांनी त्यांचे हसे केले होते. हा माझ्यासाठी पहिला धडा होता असे ते नेहमी म्हणत.

हिंदी चित्रपटातही उमठवला ठसा

नांदलस्कर यांनी सुमारे 40 नाटके, 30हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपट आणि तर, 20हून अधिक मालिकांमधून काम केले होते. महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ चित्रपटातून नांदलस्कर यांचा बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर प्रवेश झाला. ‘जिस देश में गंगा रहता है’ (गोविंदा), ‘तेरा मेरा साथ है’ (अजय देवगण), ‘खाकी’ (अमिताभ बच्चन) यांच्याबरोबर काम करायची संधी त्यांना मिळाली. ‘चाल जाए पर वचन न जाए’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’ या हिंदी चित्रपटांतही त्यांची भूमिका होती.

(Marathi and Hindi actor Kishore Nandlaskar died due to coronavirsu covid19 at Thane Maharashtra)

हेही वाचा :

Vidoe | अभिनेता संदीप पाठकचा चिमुरड्यांसोबत ‘वाथी कमिंग’ डान्स, कोरोना काळात खास संदेश

Babil Khan | …म्हणून इरफान खानच्या आठवणी शेअर करणं सोडून दिलं, लेक बाबिलने सांगितले कारण

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.