AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध कॉमेडियनला 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, अल्पवयीन मुलीवर बलात्कार

काम देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीची फसवणूक आणि बलात्कार, प्रसिद्ध कॉमेडियनला 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, 2020 पीडित तरुणीच्या आईने नोंदवला गुन्हा..., कॉमेडियनला बसला मोठा धक्का...

प्रसिद्ध कॉमेडियनला 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, अल्पवयीन मुलीवर बलात्कार
| Updated on: Mar 19, 2025 | 8:23 AM
Share

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रमाणात दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. ज्यामुळे देश खरंच महिलांसाठी सुरक्षित आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होतो. दरम्यान, 2020 मध्ये पीडित मुलीच्या आईने कॉमेडियनवर बलात्काराचे आरोप केले. 2020 मध्ये कॉमेडियन विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर 2025 मध्ये आरोपीला 20 वर्षांचा तुरुंगवास आणि 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ज्या कॉमेडियनने काम देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीची फसवणूक आणि बलात्कार केला त्याचं नाव दर्शन असं आहे. यूट्यूबवर दर्शन प्रसिद्ध आणि लोकप्रिय कॉमेडियन आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कॉमेडियन दर्शन हा 11 मार्च रोजी दोषी आढळला होता आणि तेव्हापासून तो पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला 20 वर्षांच्या तुरुंगवासासह POCSO कायद्यांतर्गत 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

हे प्रकरण सप्टेंबर 2020 मधील आहे. जेव्हा आग्रोहा भागातील एका गावातील अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली होती. कॉमेडियन दर्शनने मुलीला त्याच्या एका प्रॉडक्शनमध्ये भूमिका देण्याचे आश्वासन देऊन फसवल्याचा आरोप तिने केला.

दर्शनने शूट केला व्हिडीओ

रिपोर्टनुसार, पीडितेचे वकील रेखा मित्तल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 सप्टेंबर 2020 मध्ये दर्शन याने पीडित मुलीसोबत संपर्क साधला आणि तिला व्हिडीओ शूट करण्यासाठी बोलावलं. व्हिडिओ शूट केल्यानंतर दर्शनने अल्पवयीन मुलीला त्याच्यासोबत चंदीगडला जाण्याचा आग्रह केला. तिने नकार दिल्यावर त्यांनी धमकावून तिला घाबरवलं.

त्यानंतर तो, त्याच्या भावासह, तिला जबरदस्तीने त्याच्या दुचाकीवर चंदीगडला घेऊन गेला, जिथे त्याने हॉटेलच्या खोलीत तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती पीडितेच्या वकिलांनी दिी आहे. कॉमेडियनने तिला प्रौढ दाखवण्यासाठी खोटी कागदपत्रे तयार केली आणि एका संस्थेच्या मदतीने तिच्याशी लग्न करण्यास भाग पाडले.

घरी परतल्यानंतर मुलीने आईला घडलेली घटना सांगितली. त्यानंतर दर्शन याला पोलिसांनी अटक केली. सुरुवातीला दर्शनला जामीन मिळाला असला तरी दोषी ठरल्यानंतर त्याला पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतलं. तुरुंगवासाची शिक्षा आणि दंडासोबतच न्यायालयाने पीडितेला 2 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे निर्देशही कॉमेडियनला दिले आहेत.

निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.