आलिया भट्टने पोस्ट केला रणबीर अन् राहाचा असा खास फोटो; राहाच्या हातावरील ‘त्या’ जखमेमुळे चाहत्यांना चिंता
रणबीर कपूरने नुकताच त्याचा 43 वा वाढदिवस साजरा केला आहे. त्याच्यासाठी आलियाने काही खास फोटो देखील पोस्ट केले होते. त्यातील एका फोटोत केक कापताना राहा आणि रणबीरचा हाताचा देखील फोटो आहे. पण या फोटोमध्ये राहाच्या हाताचा फोटो पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरने त्याचा 43 वा वाढदिवस साजरा केला आहे. या खास प्रसंगी त्याचे कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईकांनी, तसेच त्याच्या चाहत्यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. रणबीरची आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा कपूर साहनी यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यासोबतच त्याची पत्नी आणि अभिनेत्री आलिया भट्टनेही सोशल मीडियावर रणबीरसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत, तसेच त्याच्यासाठी प्रेमाचा संदेश पाठवला आहे, ज्यामुळे हा प्रसंग आणखी खास झाला आहे. पण आलिया भट्टच्या पोस्टमध्ये दिसणाऱ्या एका फोटोमुळे लोकांची चिंता वाढली आहे. तसेच नेटकऱ्यांनी या फोटोच्या खाली कमेंट्सटा भडीमार केला आहे.
आलिया भट्टची पोस्ट
आलिया भट्टने इंस्टाग्रामवर अनेक फोटो शेअर केले आहेत. त्यापैकी एका फोटोमध्ये रणबीर आणि आलिया एकत्र सूर्यास्त पाहताना दिसत आहेत. त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यावरून त्यांचे प्रेम आणि नाते दिसून येते. तर एका फोटोमध्ये मुलगी राहा रणबीरसोबत केक कापताना दिसत आहे. तसेच अजून एका फोटोमध्ये राहाने तिचे वडील रणबीरसाठी एक गोड सरप्राईज नोट लिहिलेली दिसत आहे. नोटमध्ये लिहिले आहे, “जगातील सर्वोत्तम वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.” आलियाने या पोस्टसोबत एक भावनिक संदेशही लिहिला आहे, “आमच्या संपूर्ण जगाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.” या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटींकडून कमेंट्स चा पाऊस पडला आहे. मात्र या फोटोंपैकी एका फोटोने चाहत्यांचे लक्ष केंद्रित केले आहे. या फोटोमधील राहाचा हात पाहून चाहत्यांना काळजी वाटू लागली आहे.
राहाचा फोटो पाहून चाहचेही चिंतेत
या पोस्टमधील एका फोटोमध्ये रणबीर कपूर आणि राहाच्या हाताची झलक दिसतेय. तिच्या हातावर एक खूण दिसते, जी जखम किंवा भाजल्यासारखी वाटतेय. हे पाहून अनेक चाहते काळजीत पडले आहेत आणि राहाला काय झाले हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. अनेकांना ही ऍलर्जी असल्याचा संशय आहे. एका चाहत्याने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले, “राहाला काय झाले आहे?” दुसऱ्याने लिहिले आहे, “राहाला भाजलं आहे का? ही जखम कशी झाली?” तर दुसऱ्या व्यक्तीने लिहिले, “राहाला ऍलर्जी झाली आहे का?” एकूनच राहाच्या हाताला झालेली जखम पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. पण त्याबद्दल आलिया किंवा रणबीरने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
View this post on Instagram
रणबीरने पापाराझींसोबत वाढदिवस साजरा केला
बॉलिवूड स्टार्ससोबतच रणबीरच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रणबीरने पापाराझींच्या उपस्थितीत देखील त्याचा वाढदिवस साजरा केला. घराबाहेर पडताना त्याने पापाराझींसोबत केक कापला, ज्यामुळे हा प्रसंग आणखी खास झाला. लाल टी-शर्ट आणि निळ्या जीन्समध्ये रणबीर स्टायलिश आणि कूल दिसत होता.
