Special Story | मनोरंजन विश्वात ‘चला हवा येऊ द्या’ची हवा!

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’(Chala Hawa Yeu Dya) ही कथाबाह्य मालिका सुरुवातीपासूनच लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.

Special Story | मनोरंजन विश्वात 'चला हवा येऊ द्या'ची हवा!

मुंबई : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’(Chala Hawa Yeu Dya) ही कथाबाह्य मालिका सुरुवातीपासूनच लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. भाऊ कदम असो वा सागर कारंडे, श्रेया बुगडे असो किंवा नव्याने आलेली स्नेहल शिदम कार्यक्रमातले सर्वच विनोदवीर एकापेक्षा एक आहेत, ‘चला हवा येऊ द्या‘च्या सेटवर नेहमी मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांची लगबग असते. बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांनाही डॉ. निलेश साबळेंनी (Dr Nilesh Sable) वसवलेल्या थुकरटवाडीत हजेरी लावल्याशिवाय चैन पडत नाहीत. ऐवढेच नाहीतर आता ‘चला हवा येऊ द्या’मध्ये राजकीय वारे वाहताना दिसले आहे. (Fans love Chala Hawa Yeu Dya on Zee Marathi)

झी मराठी या वाहिनीवर हा कार्यक्रम दर सोमवार ते बुधवार रात्री 9.30 वाजता प्रक्षेपित केला जातो. या मालिकेत प्रमुख भूमिकेत भालचंद्र कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे आणि श्रेया बुगडे आहेत. 2020 च्या दिवाळीपासून स्वप्निल जोशीने या कार्यक्रमात परीक्षक म्हणून उपस्थित राहण्यास सुरुवात केली आहे.

ह्या मालिकेत मराठी रंगभूमी, मराठी मालिका आणि मराठी चित्रपट यातील कलाकार येतात आणि त्यांच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करतात त्या संबंधित चित्रपटाची माहिती प्रेक्षकांना देतात. आता चला हवा येऊ द्या’च्या मंचवर राजकिय नेते देखील येत आहेत. बऱ्याच वेळा चला हवा येऊ द्या’च्या मंचावर हिंदी चित्रपटातील कलाकारांना देखील बोलावले जाते. अत्यंत कमी कालावधीत या मालिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे.

‘हवा येऊ द्या’मध्ये राजकीय वारे
पंकजा मुंडे, रोहित पवार आणि सुजय विखे पाटील या राजकीय नेत्यांसोबत ‘चला हवा येऊ द्या’चा एक विशेष भाग रंगला होता. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पती अमित पालवे यांच्यासोबत हजेरी लावली होती. तर खासदार सुजय विखे पाटीलही पत्नी धनश्री विखे यांच्यासह हजर होते. नेहमी हसऱ्या-खेळत्या सेटवर नेते मंडळींच्या हजेरीमुळे राजकीय वातावरण तापणार की काय, अशी शंका होती. मात्र मिश्की ‘ ल टोलेबाजीत हा भाग चांगलाच रंगला आणि या भागाला प्रेक्षकांनी उदंड प्रेम दिला होता.

(Fans love Chala Hawa Yeu Dya on Zee Marathi)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI