सडपातळ बांधा, कुरुळे केस आणि थक्क करणारा डान्स;या व्हिडीओमध्ये फराह खानला ओळखणं शक्यच नाही
कोरिओग्राफर फराह खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये ती एवढी बारीक दिसत आहे, की तिला ओळखणेही कठीण आहे. तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला असून त्यात ती डान्स स्टेप्स दाखवत आहे. पण या व्हिडीओमध्ये तिला लगेच ओळखणे कठीण होत आहे. ती स्वत: देखील तिचा हा व्हिडीओ पाहून शॉक झालेली दिसली.

बॉलिवूडमधील बेस्ट कोरिओग्राफर, डान्सर, प्रोड्यूसर, दिग्दर्शिका तथा अभिनेत्री या सर्वांचं एक सुंदर मेळ असलेली व्यक्ती म्हणजे फराह खान. फराह खानला बॉलिवूडमध्ये कोण ओळखंत नाही असं कोणीही नाही. तिने फार मेहनतीने आपलं एक स्थान निर्माण केलं आहे. बॉलिवूडमध्ये फराह खानची एक वेगळी ओळख आहे. ती तिच्या कामाने तर प्रसिद्ध आहेच पण सोबतच ती तिच्या व्हीलॉगमुळे प्रसिद्ध आहे.
बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केलं
फराह खान तिच्या शेफ दिलीपसोबत व्हीलॉग बनवत असते. तसेत लोकांनाही ते खूप आवडते आहे. बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक असलेल्या फराहने तिच्या कारकिर्दीची सुरुवात चित्रपट कोरिओग्राफी करून केली होती. तर त्याआधी तिने बॅकग्राउंड डान्सर म्हणूनही काम केलं आहे. फराहचा असाच एक जुना व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. जो पाहून ती सर्व चाहते एवढंच काय तर ती स्वतःही आश्चर्यचकित झाली आहे. तसेच हे सर्वांना माहित आहे की फराह खानच्या कामापासून ते तिच्या दिसण्यापर्यंत सर्वात फार बदल झाला आहे.
शिमरी अन् पांढऱ्या ड्रेसमध्ये असलेली फराह खान अजिबातच ओळखू येत नाही
सध्या तिचा जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये ती खूप बारीक दिसत आहे. या व्हिडीओमध्ये फराह खान शिमरी अन् पांढऱ्या ड्रेसमध्ये सुंदर डान्स करताना दिसत आहे. या डान्समध्ये फराह अनेक वेगवेगळे स्टेप्स दाखवले आहेत. या व्हिडीओमधील फराहला एका नजरेत ओळखणे नक्कीच कठीण आहे. तिच्या व्हिडीओवर खूप कमेंट्स आल्या आहेत.
View this post on Instagram
युजर्सने खूप कमेंट्स केल्या आहेत
एका युजरने कमेंट केली आहे ” ती खूप गोंडस दिसतेय, जरी मला खात्री आहे की तिचा हा व्हिडिओ पाहून फराह स्वतः हसत असेल’ तर एकाने म्हटले ‘मी दिलीपला देखील बॅकग्राउंडमध्ये पाहिले’ , अनेकांनी म्हटले आहे ‘ फराह खानने खूप मेहनत घेतली आहे’, तर दुसऱ्याने म्हटले आहे ‘तिचा डान्स पाहून मला चक्कर आली. तिला पाहून कोण विश्वास ठेवेल की ही फराह आहे.” तर फराहने स्वत: देखील तिच्या व्हिडीओवर कमेंट केली आहे. तिने हा व्हिडीओ पाहून “अरे देवा” अशी मजेशीर कमेंट केली आहे.
फराहने कोरिओग्राफर म्हणून 1992 पासून काम करायला सुरुवात केली आहे.
फराहने कोरिओग्राफर म्हणून 1992 पासून काम करायला सुरुवात केली आहे. तिला पहिल्यांदा आमिर खानच्या “जो जीता वही सिकंदर” चित्रपटासाठी गाणी कोरिओग्राफ करण्याची संधी मिळाली. फराहला जेव्हा ही संधी मिळाली तेव्हा तिने नक्कीच त्याचं सोनं केलं. या चित्रपटाच्या यशाने फराहच्या कारकिर्दीला एक वेगळीच कलाटणी मिळाली. त्यानंतर तिने पुन्हा कधीच मागे वळून पाहिलं नाही.
