Date Final | फायनली वरुण आणि साराचा ‘कुली नंबर 1’ चित्रपट या दिवशी होणार प्रदर्शित, चर्चांना पुर्ण विराम!

वरुण धवन (Varun Dhawan) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) चा आगामी 'कुली नंबर 1' (Coolie No. 1) चित्रपट ख्रिसमसलाच प्रदर्शित होणार आहे.

Date Final | फायनली वरुण आणि साराचा 'कुली नंबर 1' चित्रपट या दिवशी होणार प्रदर्शित, चर्चांना पुर्ण विराम!

मुंबई : वरुण धवन (Varun Dhawan) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) चा आगामी ‘कुली नंबर 1’ (Coolie No. 1) चित्रपट ख्रिसमसलाच प्रदर्शित होणार आहे. ‘कुली नंबर 1’ च्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दस विविध चर्चा रंगल्या होत्या. यापूर्वी हा चित्रपट 1 मे रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, कोरोनाच्या परिस्थितीत चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. मध्यंतरी 13 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची बातमी मिळाली. मात्र, आता ख्रिसमसच्या निमित्ताने हा चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार असल्याची बातमी समोर येत आहे. (Finally, Varun Dhawan and Sara Ali Khan’s ‘Coolie No. 1’ will be released on this day)

हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात होती. तरण आदर्श यांनी शनिवारी एक ट्वीट केले, या ख्रिसमसमध्ये अॅमेझॉन प्राइमवर कुली नंबर 1 हॅशटॅग रिलीज अशाप्रकारेचे ट्विट त्यांनी केले आहे. तर दुसरीकडे हा चित्रपट कोणत्याही सिनेमागृहात प्रदर्शित होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आता हे स्पष्ट झाले आहे की, ख्रिसमसच्या दिवशी हा चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे. सारा अली खान आणि वरुण धवनची जोडी पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

सारा अली खान ट्रोल!

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता वरूण धवन यांचा आगामी चित्रपट ‘Coolie No. 1’ हा चित्रपट येत्या 25 डिसेंबर रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. मात्र, त्यावेळी सुशांतच्या चाहत्यांनी सारावर निशाणा साधण्यास सुरुवात केली होती. ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वीच सुशांतच्या चाहत्यांनी ‘डिसलाईक’ करण्यासाठीची मोहीम सुरू केली होती. चित्रपटासह सारा अली खानवर बंदी घालण्याची मागणी केली जात होती.
ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वीच ‘कुली नंबर 1’च्या ट्रेलरवर बहिष्कार टाकण्याची तयारी सुशांतच्या चाहत्यांनी केली होती. ‘साराच्या विरोधात अद्याप ड्रग प्रकरणी केस चालू आहे, तर चित्रपट कसा येऊ शकतो?’, असा प्रश्न काही वापरकर्त्यांनी विचारला आहे. तर, साराने सुशांतचा विश्वासघात केल्याचे काही वापरकर्ते म्हणणे होते..

कोरोना विषाणूच्या प्रभावामुळे डिजिटल प्रदर्शन

डेव्हिड धवन दिग्दर्शित ‘Coolie No 1’ हा चित्रपट 25 डिसेंबरला अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सारा अली खान आणि वरुण धवन चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होते. हा चित्रपट 1 मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार होता. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी अनेक महिने वाट पाहिली, परंतु कोरोनाची परिस्थिती अद्याप सुधारलेली नाही. त्यामुळे अखेर निर्मात्यांनी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

या चित्रपटात वरुण आणि सारासह परेश रावल, जावेद जाफरी, राजपाल यादव, जॉनी लिव्हर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘कुली नंबर 1’ हा चित्रपट डेव्हिड धवन यांच्याच 1995 साली प्रदर्शित झालेल्या ‘कुली नंबर वन’ चित्रपटाचा रिमेक आहे. जुन्या चित्रपटात अभिनेता गोविंदा, अभिनेत्री करिष्मा कपूर, कंचन, कादर खान, शक्ती कपूर आणि हरीश कुमारसारख्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

संबंधित बातम्या : 

Wedding Card : गौहर खान आणि जैद दरबारच्या लग्नाचं क्रिएटिव्ह इन्विटेशन कार्ड, पाहा व्हिडीओ

Welcome Back | रेमो डिसूझाचे घरी जोरदार स्वागत, व्हिडिओ पाहून चाहते मात्र चिंतेत

(Finally, Varun Dhawan and Sara Ali Khan’s ‘Coolie No. 1’ will be released on this day)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI