वीरेंद्र सेहवागच्या घटस्फोटाच्या चर्चा, चाहते का घेत आहेत मलायकाचं नाव?
वीरेंद्र सेहवागच्या घटस्फोटाच्या चर्चा आणि मलायाक अरोरा यांचं काय आहे कनेक्शन, चाहत्यांमध्ये का होतेय मलायका आरोरा हिच्या नावाची चर्चा...

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदार वीरेंद्र सहवाग गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. वीरेंद्र सहवाग त्याच्या खासगी आयुष्यात चढ – उतारांचा सामना करत आहे. वीरेंद्र सहवाग आणि पत्नी आरती यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे. दोघांच्या वैवाहिक आयुष्यात वाद सुरु असल्याची माहिती मिळत असून दोघे वेगळे राहतात असं देखील समजत आहे. क्रिकेटपटूच्या खासगी आयुष्याच्या चर्चा सुरु असताना तो ग्रे डिव्हार्स घेईल… असं देखील सांगण्यात येत आहे.
वीरेंद्र सेहवाग याच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगलेल्या असताना अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या नावाची देखील तुफान चर्चा रंगली आहे. त्यामुळे वीरेंद्र सेहवागच्या घटस्फोटाच्या चर्चा आणि मलायाक अरोरा यांचं कनेक्शन आणि ग्रे डिव्हार्स काय असतो? जाणून घेऊ..
काय असतो ग्रे डिव्हार्स?
गेल्या काही वर्षांमध्ये भारतात घटस्फोटाचं प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. ग्रे डिव्हार्स देखील चर्चेत आहे. सध्या शब्दांत सांगायचं झालं कर, जोडप्याने 40 – 50 वयात विभक्त होण्याचा निर्णय घेतल्यास ते ग्रे डिव्हार्सच्या माध्यमातून विभक्त होऊ शकतात…
ग्रे डिव्हार्सला सिल्वर स्प्लिटर्स (Silver Splitters) किंवा डायमंड घटस्फोट असं देखील म्हटलं जातं. आता विवाहित जोडपे 15 ते 20 वर्ष एकत्र राहतात आणि त्यानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतात. सध्या सेहवाग 46 वर्षांचा आहे आणि आरती 43 वर्षांची आहे.
आजच्या काळात पती-पत्नी दोघेही एकत्र काम करत असल्याचं दिसून येतं. अशा परिस्थितीत जेव्हा ग्रे घटस्फोटाचा प्रश्न येतो तेव्हा कोर्ट दोघांची मालमत्ता, पोटगी आणि सेवानिवृत्ती लाभ इत्यादींचाही विचार करते आणि हे लक्षात घेऊन घटस्फोट घेणाऱ्या जोडप्याच्या लग्नाची वेळ, त्यांचे वय आणि त्यांचे आरोग्य इत्यादी गोष्टी तपासल्या जातात.
मलायका अरोरा – अरबाज खान यांचा ग्रे डिव्हार्स
View this post on Instagram
मलायका अरोरा – अरबाज खान देखील ग्रे डिव्हार्सच्या माध्यमातून विभक्त झाले. याच कारणामुळे सेहवाग आणि आरतीच्या ग्रे घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान मलायकाचे नाव चर्चेत आले आहे. मलायकाने 2017 मध्ये घटस्फोट घेतला. याशिवाय चित्रपट निर्माते प्रकाश झा आणि दीप्ती नवल यांनीही ग्रे घटस्फोट घेतला.
