AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gashmeer Mahajani | ‘माणूस राख नाही तर…’, रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर सूनेनं सोडलं मौन

सासरे रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर सून गौरी हिची पोस्ट चर्चेत... टोमणे मारणाऱ्यांना सडेतोड उत्तर देत म्हणाली, 'माणूस राख नाही तर...', सध्या सर्वत्र महाजनी कुटुंबाची चर्चा...

Gashmeer Mahajani | 'माणूस राख नाही तर...', रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर सूनेनं सोडलं मौन
| Updated on: Aug 14, 2023 | 1:00 PM
Share

मुंबई | 14 ऑगस्ट 2023 : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आणि चाहत्यांना आणि सेलिब्रिटींना मोठा धक्का बसला. रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. फक्त चाहतेच नाही तर, संपूर्ण सिनेविश्वाला रविंद्र महाजनी यांच्या निधनानंतर मोठा धक्का बसला आहे. रवींद्र महाजनी पुण्यात ऐकटेच राहत होते. रवींद्र महाजनी यांचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त होती. त्यांच्या निधनानंतर पुण्यात रवींद्र महाजनी एकटे का राहत होते, त्यांची काळजी कोणी का घेतली नाही… असे अनेक प्रश्न विचारत लोकांनी महाजनी कुटुंबावर निशाणा साधला.. यावर रवींद्र महाजनी यांचा मुलगा आणि अभिनेता गश्मीर महाजनी यांनी उत्तर दिलं होतं…

वडिलांच्या निधनानंतर सोशल मीडियावर गश्मीर म्हणाला होता की, ‘योग्य वेळ आली की सर्व काही सांगेल…’. गश्मीर याच्यानंतर आता अभिनेत्याच्या पत्नीने देखील सोशल मीडियावर पतीचा एक फोटो पोस्ट करत लक्षवेधी कॅप्शन लिहिलं आहे. सध्या सर्वत्र गश्मीर महाजनी याची पत्नी गौरी हिच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगत आहे..

गश्मीर महाजनी याचा पूजेला बसलेला एक फोटो पोस्ट करत गौरीने हिंदीमध्ये कॅप्शन लिहिलं आहे. गौरी म्हणाली, ‘टोमण्यांच्या भट्टीत तापलेला माणूस राख नाही तर सोनं बनतो…’ शिवाय एका उत्तम व्यक्तीची पत्नी असल्याचा मला गर्व आहे… असं देखील गौरी हिने सोशल मीडियावर पोस्टमध्ये म्हणाली आहे. गौरीच्या पोस्टवर अनेक जण लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

वडिलांच्या निधनानंतर काय म्हणाला होता गश्मीर महाजनी?

अभिनेता पोस्ट शेअर करत म्हणाला, ‘अभिनेता कायम अभिनेता राहतो… मी आणि माझ्या कुटुंबियांनी या प्रकरणावर मौन बाळगणं पसंत केलं. अम्ही शांत आहोत म्हणून अनेक जण द्वेष करत आहेत… आम्हाला वाईट बोलत आहेत… पण आम्ही त्याचं देखील स्वागतच करतो…’

पुढे गश्मीर म्हणाला, ‘आपल्यातून निघून गेलेल्या त्या आत्म्याला शांती लाभो… ओम शांती… ते माझे वडील होते. माझ्या आईचे पती होते… तुमच्या सर्वांपेक्षा जास्त आम्ही त्यांना ओळखतो.. भविष्यात येग्य वेळ आल्यानंतर मी यावर नक्कीच बोलेल..’ असं गश्मीर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाला होता.

मराठी सिनेसृष्टीतील रुबाबदार, देखणा नट म्हणून रवींद्र महाजनी यांची ओळख होती. १९७५ ते १९९० या काळात यांनी मराठी सिनेसृष्टी गाजवून सोडली. त्यांनी केलेले सिनेमेही चांगलेच गाजले. मुंबईचा फौजदार, देवता, झुंज, आराम हराम आहे. लक्ष्मी, लक्ष्मीची पावलं, गोंधळात गोंधळ आदी सिनेमे चांगलेच गाजले. तर बेलभंडार आणि अपराध मीच केला ही त्यांची नाटकेही गाजली.

Follow Us
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा धिंगाणा; मद्यधुंद अवस्थेत... पुढे भयंकर घडलं?
शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राऊतांचा अहिरांवर घणाघात
Sanjay Raut | शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राजकीय प्रवास कलंकित, राऊतांचा सचिन अहिरांवर घणाघात
नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात
Nashik | हरी मुखे म्हणा! नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
मुंबईत मुसळधार पावसाची दमदार हजेरी; मरीन ड्राईव्हवर उसळल्या प्रचंड....
Marine Drive Rain Updates | मुंबईत मुसळधार पावसाची दमदार हजेरी; मरीन ड्राईव्हवर उसळल्या प्रचंड लाटा, पर्यटकांची गर्दी वाढली
24 तास महत्त्वाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी... धो धो पाऊस कोसळणार;
Latest Rain Update | 24 तास महत्त्वाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी... धो धो पाऊस कोसळणार; तुमच्या शहरात कोणता अलर्ट?
मोठी खळबळ! अरे असा पराभव.... ओमराजेंची ती ऑडिओ क्लिप व्हायरल; राजकीय
मोठी खळबळ! अरे असा पराभव.... ओमराजेंची 'ती' ऑडिओ क्लिप व्हायरल; राजकीय वर्तुळात मोठं घडणार?
ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, तातडीने उचलली मोठी पावलं
ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, तातडीने उचलली मोठी पावलं, थेट वरळीतच....
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा फटका; तब्बल 18...
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!