आमच्या नेत्या सुप्रियाताईच, त्यात बदल होणार नाही. नाही… नाही… नाही… बीडचा खासदार बोलतोय; बड्या नेत्याने थेट सांगितलं
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी 'ऑपरेशन तुतारी' चर्चा फोल ठरवत पक्षाची एकजूटता अधोरेखित केली. सुप्रिया सुळे याच आमच्या नेत्या आहोत, आम्ही आठही खासदार एकसंध आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

ठाकरे गटातील 6 खादासर फुटून शिंदे गटात गेल्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. आमदार , खासदाराचे इनकमिंग-आऊटगोईंग सुरू असून अनेकांनी मोठा धसका घेतला आहे. ठाकरे गटाला धक्का दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाबद्दलही विविध चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादी पक्ष हा इतर पक्षात विलीन करण्यावरून आमदारांमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. ठाकरेंच्या पक्षातील फुटीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही घडामोडींना वेग आल्याची चर्चा आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काहींच मत आहे की, काँग्रेसमध्ये विलीन व्हावं, तर थेट भाजपमध्ये विलीन व्हावं, असं दुसऱ्या गटाचं मत असल्याची चर्चा समोर आली होती.
मात्र आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसमधील बड्या नेत्यानेच, खासदारानेच भाष्य केलं असून राष्ट्रवादीचे आम्ही आठही खासदार एकसंघ आहोत असं स्पष्ट केलं. एवढंच नव्हे तर ऑपरेशन तुतारी म्हणजे बोलाचीच भात आणि बोलाचीच कढी आहे, असा दावाही त्यांनी केला. आमच्या नेत्या सूप्रियाताई आहेत. त्याच्यात बदल होणार नाही. नाही. नाही. नाही… असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार बजरंग सोनावणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून पक्षातील कोणीही फुटणार नाही, असा थेट दावा त्यांनी केला आहे. आठपैकी आठ खासदार एकजीव आणि एकसंघ आहेत. सुप्रिया सुळे याच आम्चाय नेत्या आहेत, त्यात कोणताच बदल होणार नाही असं बजरंग सोनावणे यांनी ठणकावून सांगितलं.
ऑपरेशन तुतारी म्हणजे बोलाचीच भात आणि बोलाचीच कढी.
‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर ‘ऑपरेशन तुतारी’ राबवलं जाणार आहे, अशा चर्चा जोर धरत आहेत. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. ‘हा सर्व प्रकार म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी आहे’ असं सोनावणे स्पष्ट म्हणाले. आम्ही आठपैकी आठही अतिशय एकजीव आणि एकसंघ आहेत. आमच्या नेत्या सूप्रियाताई आहेत. त्याच्यात बदल होणार नाही. नाही. नाही. नाही… बीडचा खासदार बोलतोय, पक्ष आमचा खरा आहे असं म्हणत आम्ही आठच्या आठ खासदार एक आहोत असा पुनरुच्चार खासदार बजरंग सोनवणे यांनी केला.
मला रेल्वे आणि पाण्याचा प्रश्न सोडवायचाय, पण मी विरोधी पक्षात आहे, वनवासात आहे.
मी रेल्वेच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मला जिल्ह्यासाठी रेल्वे आणि पाणी आणायचे आहे. कर्मधर्म संयोगाने मी विरोधी पक्षात आहे, असू द्या, मला काही नाही. माझी तेव्हढी धमक आहे, मला शंभर टक्के यश येईल, असा विश्वास बदरंग सोनावणे यांनी व्यक्त केला. धाराशिव ते संभाजीनगर रेल्वे आणि बीडला पाणी आणण्यासाठी मी धडपडतोय. यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पॉझीटीव्ह आहेत, असंही ते म्हणाले.
