AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्या शेतकऱ्यांना मोठा दणका; आधार क्रमांक थेट पाच वर्षांसाठी काळ्या यादीत… पीक विमाच नाही तर कोणत्या योजनेचा नाही मिळणार फायदा

Bogus Crop Insurance: बोगस पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांचे 'आधार' पाच वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. १ जुलैपासून खरीप पीक विम्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. तर गत हंगामातील बोगस पीक विम्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. काय आहे मोठी अपडेट?

त्या शेतकऱ्यांना मोठा दणका; आधार क्रमांक थेट पाच वर्षांसाठी काळ्या यादीत... पीक विमाच नाही तर कोणत्या योजनेचा नाही मिळणार फायदा
त्या शेतकऱ्यांना मोठा दणका; आधार क्रमांक थेट काळ्या यादीत...
| Updated on: Jul 01, 2026 | 11:23 AM
Share

किशोर पाटील, प्रतिनिधी, टीव्ही ९ मराठी: खरीप हंगामासाठी पीक विमा काढण्याची प्रक्रिया १ जुलैपासून सुरू होत असून, शेतकऱ्यांना ३१ जुलैपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. तसेच, हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेअंतर्गत मृग बहारासाठीही योजना राबविण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. मात्र, पीक विमा योजनेत वाढलेले गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. शेतात प्रत्यक्षात पिकाची लागवड न करताच बोगस पीक विमा (Bogus Crop Insurance) काढून रकमेची उचल करणाऱ्यांचे आधार क्रमांक आता थेट पाच वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्यात येणार आहेत.

पाच वर्षांकरीता योजनांचा लाभ बंद

ज्या व्यक्तींचा आधार क्रमांक काळ्या यादीत टाकला जाईल, त्यांना पीक विमा पुढील पाच वर्षे शासनाच्या कोणत्याही कृषी किंवा इतर कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येणार नाही. यासोबतच, प्रत्यक्ष पाहणीत बोगस विमा उतरविल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर थेट फसवणुकीचे गुन्हे दाखल करून कायदेशीर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. नवीन हंगामात अशा बोगस प्रवृत्तींना कायमचा आळा बसावा, या उद्देशाने शासनाने हे कडक आदेश जारी केले आहेत.

गेल्या हंगामातील बोगस विम्याची चौकशी

गेल्या काही वर्षांत केळी आणि खरीप पिकांच्या विम्यात बोगस दावे दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे. एकट्या जळगाव जिल्ह्यात केळी पीक विमा योजनेअंतर्गत तब्बल ४४ हजार हेक्टर क्षेत्रावर बोगस पीक विमा काढण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. कृषी विभागाकडून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. विशेष म्हणजे, शासनाने शेतकऱ्यांच्या विम्याच्या हप्त्यापोटी ३८ कोटी रुपयांची रक्कम यापूर्वीच जमा केली असून, यंदाच्या हंगामात बोगस पीक विम्याचे गैरप्रकार रोखण्यासाठी शासनाने आतापासून विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.

ॲग्रीस्टॅकची नोंदणी आवश्यक

पीक विमा योजनेत धान, भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, कारळे, कापूस आणि कांदा या पिकांसाठी अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना भाग घेता येईल. या योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅकची नोंदणी क्रमांक आणि ई-पीक पाहणी बंधनकारक आहे. अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पिकं घेणारे सर्व शेतकरी या योजनेत आपला सहभाग नोंदवू शकतात. ई-पीक पाहणी व विमा घेतलेले पीक यामध्ये तफावत आढळल्यास विमा अर्ज रद्द होईल आणि भरलेला विमा हप्ता जप्त करण्यात येणार आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना