लॉकअपमध्ये प्रेग्नेंट झाली आकांक्षा चमोला! कोण आहे बाळाचा बाप? ऐकून राम कपूर हैराण
मूल नको म्हणून अभिनेता आणि बिग बॉस विजेता गौरव खन्ना यांच्यापासून घटस्फोट घेणारी आकांक्षा चमोला हिने प्रेग्नेंट असल्याचा खुलासा केला आहे. यावेळी तिने बाळाच्या बापाचं नाव देखील जाहिर केलं... जे ऐकून अभिनेता राम कपूर देखील हैराण झाला आहे.

अभिनेता आणि बिग बॉस विजेता गौरव खन्ना याची पत्नी आकांक्षा चमोला गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. ‘लॉक अप 2’ मध्ये एन्ट्री घेताल आकांक्षा हिने घटस्फाटोबद्दल मोठा खुलासा केला. ज्यामुळे गौरव आणि तिच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला आहे… सांगायचं झालं तर, आकांक्षा हिला मूल नकोय, तिचं स्वतःचं आयुष्य स्वतःच्या इच्छेने जगायचं आहे. तर गौरव एका सुखी कुटुंबाचे स्वप्न रंगवत असताना, दोघे घटस्फोट घेत असल्याची माहिती समोर आली. एवढंच नाही तर, आकांक्षा शोमध्ये अनेक खुलासे करत आहे. नुकताच झालेल्या एका एपिसोडमध्ये तिने ‘मी प्रेग्नेंट आहे…’ असं सांगितलं… यामुळे अनेकांनी तिला ट्रेल देखील केलं.
सांगायचं झालं तर, शोच्या एका एपिसोडमध्ये आकांक्षा चमोला आरशात आपलं पोट पाहत असते, तेव्हा राम कपूर तिच्याजवळ येतो आणि तिला विचारतो… तेव्हा आकांशा प्रेग्नेंट असल्याचं सांगते… अशाता बाळाचा बाप कोण आहे? असं राम कपूर विचारतो. त्यावर आकांक्षा जे उत्तर देते त्यामुळे त्यालाही धक्का बसतो.
बाळाच्या बापाचं नाव सांगत आकांक्षा चक्क लैलाचं नाव घेते. राम कपूर लगेच लैलाकडे जातो आणि त्याला सांगतो की “आकांक्षा प्रेग्नंट आहे आणि सांगतेय बाळाचा बाप तू आहेस….” त्यावेळी तिथं असलेला धीरज धूपरही म्हणतो, “हो मला ही गोष्टी आधीपासूनच माहिती आहे.”
पुढे राम, आकांक्षा हिला लैला समोर विचारतो की, ‘बाळाचा बाप कोण आहे.?’ तेव्हा आकांक्षा पुन्हा लैलाचं नाव घेते. यावर लैला म्हणतो, ‘असं सर्वांना सांगत फिरु नकोस…’, सांगायचं झालं तर, शोमध्ये आकांक्षा आणि लैला दोघंही शोमध्ये सतत एकमेकांशी फ्लर्ट करताना दिसतात. ज्यामुळे अभिनेत्रीला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो.
गौरव – आकांक्षा यांचा घटस्फोट
आधीच्या एपिसोडमध्ये तिने प्रसिद्ध अभिनेता आणि पती गौरव खन्ना याच्यासोबत होणाऱ्या घटस्फोटावर मोठं वक्तव्य केलं होतं. आकांशा म्हणालेली, मुलांच्या जन्मावरुन त्यांचे दोघांचे विचार पूर्णपणे वेगळे आहेत. घटस्फोटाच्या चर्चांनंतर गौरव आणि आकांक्षा यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
