शाहरुख खानच्या घरात काम करणाऱ्यासाठी विशेष सोय, ज्यासाठी गौरी महिन्याला मोजते मोठी रक्कम
Shah Rukh Khan: शाहरुख खानच्या घरात काम करणाऱ्यांसाठी गौरी महिन्याला मोजते मोठी रक्कम, त्यांची आलिशान घरात राहण्याची सोय आणि बरंच काही..., शाहरुख खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतो चर्चेत...

Shah Rukh Khan: बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान कुटुंबासोबत सध्या ‘मन्नत’ बंगल्यात राहत नाही. गेल्या काही दिवसांपासून ‘मन्नत’ बंगल्याच्या नुतनीकरणाचं काम सुरु आहे. त्यामुळे शाहरुख त्याच्या कुटुबासोबत भाड्याच्या घरात राहत आहे. सांगायचं झालं तर, मन्नत बंगल्यात फक्त शाहरुख खान नाही तर, त्याच्या बंगल्यात काम करणारे लोकं देखील राहत होती. अशात गौरी खान हिने घरात काम करणाऱ्यांसाठी विशेष सोय केली आहे. त्यांच्यासाठी देखील गौरीने मुंबईत भाड्याने घर घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गौरी खान हिने मुंबई येथील खार परिसरात दोन खोल्यांचा एक अपार्टमेंट भाड्याने घेतला आहे. हा फ्लॅट पंकज सोसायटीमध्ये भाड्याने खरेदी करण्यात आला आहे आणि त्याचं महिन्याचं भाडं कदाचीत 1.35 कोटी रुपये असेल. खरंतर ही सोसायटी गौरी आणि शाहरुखने राहण्यासाठी जिथे डुप्लेक्स भाड्याने घेतलं आहे त्या ठिकाणापासून फक्त 100 मीटर अंतरावर आहे.
View this post on Instagram
रिपोर्टनुसार, हा फ्लॅट 725 चौरस फूटचा आहे. हा फ्लॅट चौथ्या मजल्यावर आहे आणि तो संजय किशोर रमाणी नावाच्या व्यक्तीकडून भाड्याने घेतला आहे. यासाठी गौरीने 4.05 लाख रुपयांचं सिक्योरिटी डिपॉजिट देखील भरलं आहे. तीन वर्षांचा फ्लॅटचा करार झाला आहे. शाहरुखची पत्नी गौरीने खार येथील पाली हिलमध्ये 8.67 कोटी रुपयांना दोन डुप्लेक्स भाड्याने घेतल्याची माहिती याआधी समोर आली होती.
शाहरुख खान याचे सिनेमे
शाहरुख खान याच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, सध्या किंग खान ‘किंग’ या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहे. सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख लेक सुहाना खान हिच्यासोबत पहिल्यांदा स्क्रिन शेअर करणार आहे. सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिनेमात अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. ‘किंग’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर ‘पठाण 2’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. त्यानंतर सलमान खान याच्यासोबत ‘टायगर वर्सेस पठाण’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.
