Govardhan Asrani Death : कोण आहे असरानी यांची पत्नी ? रेखा-अमिताभच्या चित्रपटाच्या सेटवर जुळलं सूत आणि…
Who Is Govardhan Asrani Wife: 'शोले' मधील अवघ्या काही क्षणांच्या जेलरच्या भूमिकेने घराघरांत पोहोचलेले, अनेक चित्रपटात आपल्या अभिनयाचा अमिट ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते असरानी यांच निधन झालं. त्यांनी अनेक वर्ष विविध भूमिका साकारत चाहत्यांना हसवलं, त्यांचं योगदान कधीही विस्मरणात जाणार नाही. त्यांच्याप्रमाणेच ट्रम्प यांची पत्नीही अभिनेत्री आहे. कशी झाली त्यांची भेट ?

Who Is Govardhan Asrani Wife : गोवर्धन असरानी, आता हे नाव आणि चेहरा, प्रत्येकाच्या फक्त आठवणीत आहे. नुकतंच त्यांचं निधन झाला. चित्रटात जेव्हा ते एखादी भूमिका साकारायचे, लोकं त्यांना पाहून स्तब्ध होत, कधी खळखळून हसत. हिंदी चित्रपटसृ्ष्टीतील हे नामवंत कलाकार आता काळाच्या पडद्याआड गेले. पण त्यांची आठवण प्रत्येकाच्या मनात आहे. असरानी यांच्या अचूक टायमिंगबद्दल सगळेच बोलतात आणि त्याच्या अभिनय कौशल्याचे अनेकदा कौतुक केले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का असरानी यांची जीवनसाथी कोण ? एका चित्रपटाच्या सेटवर ते त्यांच्या प्रेमात पडले आणि आयुष्यभर एकत्र राहिले. त्या अभिनेत्रीने दिग्दर्शिका म्हणूनही काम केलं.
काल म्हणजेच 20 ऑक्टोबर रोजी असरानी यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. तेव्हापासून त्यांची पत्नी मंजू चर्चेत आहे. सर्वांनाच अभिनेत्याच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्यायचे आहे. त्याची पत्नी माजी अभिनेत्री आहे आणि त्यांनी एकत्र कामही केले आहे. जाणून घेऊया सविस्तर माहिती.
असरानींची पत्नी कोण ?
गोवर्धन असरानी यांची पत्नी मंजू बन्सल या 1970 आणि 80 च्या दशकात चित्रपटसृष्टीचा एक भाग होत्या. आधी त्या मंजू बन्सल म्हणून ओळखल्या जात होत्या आणि नंतर त्या मंजू असरानी झाल्या. 50 वर्षांपेक्षा अधिक त्यांचं नातं होतं. “आज की ताजा खबर” नावाच्या चित्रपटाच्या सेटवर दोघांची भेट झाली. प्रथम त्यांची मैत्री झाली आणि नंतर “नमक हराम” च्या सेटवर प्रेमात पडले. त्यांनी नातं पुढे नेण्याचा निर्णय घेतला आणि विवाहबद्ध झाले.
मंजू असरानी यांनी -‘आज की ताजा खबर’,’नमक हराम’, ‘चोर सिपाही’,’नालायक’, ‘जुरमाना’, ‘सरकारी मेहमान’, ‘चांदी सोना’, ‘कबीला’,’उधार का सिपाही’,’दीवानगी’,’तपस्या’ अशा अनेक चित्रपटात काम केलं.तसेच 1995 साली त्यांनी मां की ममता तसेच अनेक चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं.
असरानी यांच्या करिअरमध्येही दिली साथ
खुद्द असरानी आणि मंजू यांनीही काही चित्रपटांत एकत्र काम केलं. पण लग्नानंतर मंजू यांनी कुटुंबाला प्रथम प्राधान्य दिलं. एवढंच नव्हे तर त्यांनी असरानी यांनाही त्यांच्या करिअरमध्ये साथ दिली. त्या लाईमलाईटपासून दूरच राहिल्या.
