AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्म बदलल्यानंतर गोविंदाच्या भाचीला होतोय पश्चाताप? म्हणाली, ‘आता मी कट्टर…’

Ragini Khanna On Religious Conversion : धर्म बदलल्यानंतर गोविंदाची भाची आणि अभिनेत्री रागिणी खन्ना हिने सोडलं मौन, अभिनेत्री मनातील खंत व्यक्त करत म्हणाली, 'आता मी कट्टर...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गोविंदा यांच्या भाचीची चर्चा...

धर्म बदलल्यानंतर गोविंदाच्या भाचीला होतोय पश्चाताप? म्हणाली, 'आता मी कट्टर...'
| Updated on: May 04, 2024 | 7:59 AM
Share

‘ससुराल गेंदा फूल’ मालिकेच्या माध्यमातून घरा-घरात पोहोचलेली अभिनेत्री रागिणी खन्ना गेल्या अनेक दिवसांपासून झगमगत्या विश्वापासून दूर आहे. नुकताच, रागिणी हिली बहीण आरती सिंह हिच्या लग्नात स्पॉट करण्यात आलं होतं. बहिणीच्या लग्नातील काही व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे रागिणी पुन्हा चर्चेत आली. पण आता रागिणी धर्मांतराबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रागिणी हिची चर्चा रंगली आहे.

रागिणी खन्ना ‘ससुराल गेंदा फूल’ मालिकेमुळे लोकप्रिय झाली. आता तिच्या नावाची एक सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती तिच्या धर्मांतराबद्दल सांगत आहे. अभिनेत्रीच्या या वक्तव्या लोक आश्चर्यचकित झाले आहेत. सांगायचं झालं तर, रागिणी हिच्या खासगी आयुष्याबद्दल फार कोणाला काहीही माहिती नाही, त्यामुळे जेव्हा अभिनेत्रीने धर्मांतराबद्दल वक्तव्य केलं, तेव्हा अभिनेत्री चर्चेत आली.

एका रिपोर्टनुसार, रागिणी हिने हिंदू धर्माचा त्याग करत ख्रिश्चन धर्म स्वीकारला. ज्याचा आता अभिनेत्रीला पश्चाताप बोत आहे. एवढंच नाहीतर, अभिनेत्रीने हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर माफी देखील मागितली. अभिनेत्री म्हणाली, ‘मी पुन्हा हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे.’

‘मी रागिणी खन्ना, माझ्या जुन्या व्हिडीओमुळे सर्वांची माफी मागते… मी हिंदू धर्माचा त्याग करत ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. पण आता मी कट्टर हिंदू झाली आहे. मी हिंदू सनातनी होण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रागिणी हिची चर्चा रंगली आहे.

रागिणी धर्मांतरामुळे चर्चेत आल्यानंतर अनेकांना रागिनी खन्नाचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याचा संशय आहे. मात्र, अनेक लोक अभिनेत्रीच्या पोस्टवर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. रागिणी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनय क्षेत्रात सक्रिय नसली तरी अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र रागिणी आणि तिच्या मालिकांची चर्चा रंगलेली असायची. टीव्ही विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून रागिणी खन्ना हिची ओळख होती. पण आता अभिनेत्री झगमगत्या विश्वापासून दूर आहे. पण गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आली आहे.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.