Happy Birthday Lara Dutta | मोठमोठे कलाकार सोडून टेनिसपटूवर बसले लाराचे प्रेम, वाचा या फिल्मी प्रेमकथेबद्दल…

‘भागम भाग’ असो वा ‘पार्टनर’, प्रत्येक प्रकारच्या चित्रपटात अभिनेत्रीने आपली वेगळी छाप सोडली. 2000 मध्ये, लारा दत्ताने ‘मिस युनिव्हर्स’ हा मनाचा किताब पटकावला होता.

Happy Birthday Lara Dutta | मोठमोठे कलाकार सोडून टेनिसपटूवर बसले लाराचे प्रेम, वाचा या फिल्मी प्रेमकथेबद्दल...
लारा दत्ता

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स लारा दत्ताचा (Lara Dutta) आज वाढदिवस आहे. लाराने खूप चित्रपटांमध्ये काम केले नाही, परंतु तिने ज्या भूमिका केल्या त्या तिच्या चाहत्यांच्या चांगल्याच पसंतीस पडल्या होत्या. ‘भागम भाग’ असो वा ‘पार्टनर’, प्रत्येक प्रकारच्या चित्रपटात अभिनेत्रीने आपली वेगळी छाप सोडली. 2000 मध्ये, लारा दत्ताने ‘मिस युनिव्हर्स’ हा मनाचा किताब पटकावला होता (Happy Birthday Lara Dutta know abot her love story with Mahesh Bhupati).

लारा दत्ता तिच्या व्यावसायिक आयुष्याव्यतिरिक्त तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आली होती. अभिनेता डीनो मोरियाबरोबरच्या तिच्या प्रेमसंबंधाची चर्चा चांगलीच रंगली होती. मात्र, नंतर तिने टेनिसपटू महेश भूपतीशी लग्न केले. खास वाढदिवसाच्या निमित्ताने आज आपण लारा आणि महेशच्या या गोड लव्हस्टोरीबद्दल जाणून घेणार आहोत…

महेशच्या आधी ‘या’ व्यक्तींसोबत जोडले लाराचे नाव

लारा दत्ताने मूळचा भूटानचा मात्र मुंबईत स्थायिक मॉडेल केली डोरजी याला देखील लारा डेट करत होती. असं म्हणतात की, दोघे बर्‍याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते, पण अचानक ते दोघे वेगळे झाले. यानंतर, डिनो मोरियाने लाराच्या आयुष्यात प्रवेश केला. दोघांच्या रिलेशनशिपची बातमी खूप चर्चेत होती.

महेश भूपतीची एंट्री

डीनोपासून विभक्त झाल्यानंतरच महेश भूपती लाराच्या आयुष्यात दाखल झाला. दोघेही एक प्रसिद्ध सेलिब्रिटी होते आणि प्रत्यक्ष भेटण्यापूर्वी त्यांनी एकमेकांबद्दल ऐकले होते. असे म्हणतात की, लारा आणि महेश पहिल्यांदाच महेशच्या क्रीडा कंपनीच्या व्यवसायिक बैठकीत भेत्लेन होते. या बैठकीतच अर्थात पहिल्या भेटीतच महेश भूपती यांच्या साधेपणावर लारा भाळली होती (Happy Birthday Lara Dutta know abot her love story with Mahesh Bhupati).

लारासाठी पत्नीला दिला घटस्फोट

या भेटीनंतर दोघे एकमेकांचे चांगले मित्र झाले आणि सतत एकमेकांना भेटू लागले. त्यावेळी महेश भूपतीचे आधीच लग्न झाले होते. त्याने मॉडेल श्वेता जयशंकरशी लग्न केले होते. श्वेताचे घर तोडण्यामागे लाराचा हात होता, असा आरोपही अभिनेत्रीवर लावण्यात आला होता. लग्नाच्या 7 वर्षानंतर महेशने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला.

महेशने केला स्पेशल प्रपोज

अमेरिकेत कँडल लाईट डिनर दरम्यान महेशने लारा दत्ताला प्रपोज केला. असे म्हणतात की, त्यावेळी महेशने लाराला घातलेली अंगठी ही त्याने स्वत: डिझाईन केली होती. हाच तोच काळ होता, जेव्हा महेश यूएस ओपन खेळण्यासाठी न्यूयॉर्कला गेला होता.

यानंतर लारा आणि महेशने 2011मध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी मुंबईच्या वांद्रे येथे लग्न केले. दोघांच्या लग्नात घरातीलच काही लोक सहभागी झाले होते. आज अभिनेत्री चित्रपटांपासून दूर आपल्या कुटुंबासमवेत आपले सुखी आयुष्य व्यतीत करत आहे.

(Happy Birthday Lara Dutta know abot her love story with Mahesh Bhupati)

हेही वाचा :

Sonu Sood | विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द झाली म्हणून सोनू सूदने चालवली सायकल, कोरोनाचे नियम विसरल्याने झाला ट्रोल!

Preity Zinta | अंडरवर्ल्डच्या धमक्यांनंतरही न घाबरता प्रिती झिंटाने नोंदवला होता जबाब, वाचा नेमकं काय घडलं…

Published On - 10:58 am, Fri, 16 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI