Birthday Wishes : सुपरस्टार रजनीकांत यांचा वाढदिवस, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

सुपरस्टार रजनीकांत आज त्यांचा 70वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (Happy Birthday Superstar Rajinikanth)

1/5
सुपरस्टार रजनीकांत आज त्यांचा 70वा वाढदिवस साजरा करत आहेत. या निमित्त त्यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पीएम मोदी ते ए आर रहमान यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून रजनीकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
2/5
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर रजनीकांत यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 'डिअर रजनीकांत जी, वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तुम्हाला दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो ही इच्छा.' असं ट्विट मोदींनी केलं आहे.
3/5
ए आर रहमान यांनीसुद्धा रजनीकांत यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये रजनीकांत वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहेत.रजनीकांत यांच्या वाढदिवसानिमित्त सीडीपी रिलीज करण्यात आनंद होत असल्याचं देखिल रहमान यांनी शेअर केलं आहे.
4/5
अभिनेता सुधीर बाबू याने ट्विटरच्या माध्यमातून रजनीकांत यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
5/5
अभिनेत्री हंसिकानंसुद्धा ट्विटरच्या माध्यमातून रजनीकांत यांना शुभेच्छा दिल्या आहेत.