Happy Birthday Mr. Bean | वाढदिनीच मि. बिन यांची मोठी घोषणा

प्रसिद्ध कॉमेडियन, लेखक, रोवन एटकिन्सन (Rowan Atkinson) अर्थात मिस्टर बिन (Mr. Bean) यांचा आज वाढदिवस.

Happy Birthday Mr. Bean | वाढदिनीच मि. बिन यांची मोठी घोषणा
मिस्टर बिन
Follow us
| Updated on: Jan 06, 2021 | 1:51 PM

मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन, लेखक, रोवन एटकिन्सन (Rowan Atkinson) अर्थात मिस्टर बिन (Mr. Bean) यांचा आज वाढदिवस. जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. जगभरात रोवन यांची ओळख मिस्टर बिन (Mister Bean) अशीच आहे. त्यांच्या विनोदी पात्रामुळे रोवन हे प्रसिद्ध आहेत. रोवन यांनी अनेक सिनेमे, नाटकात भूमिका साकारली आहे. मिस्टर बिन अशी ओळख असलेल्या रोवन एटकिन्सन यांनी मोठी घोषणा केली आहे. यापुढे मिस्टर बिन ही भूमिका साकारणार नाही, असं रोवन यांनी जाहीर केलं. वाढदिवशीच मिस्टर बिन यांनी आपल्या पात्राला अलविदा केल्याने, चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. 65 वर्षीय रोवन यांनी आता मिस्टर बिन हे पात्र साकारण्यास मजा नाही, असं म्हटलं आहे. (Rowan Atkinson will never do the role of Mister Bean again)

हे पात्र तणावपूर्ण आणि थकवणारं आहे. त्यामुळे ते अधिक जबाबदारीने साकारावं लागतं. आता त्या पात्रात तेवढी मजा राहिली नाही. त्यामुळे यापुढे मिस्टर बिन हे पात्र साकारणार नाही, हे पात्र आता थांबायला हवं, असं रोवन एटकिन्सन यांनी म्हटलं.

जगभरात मिस्टर बिनची क्रेझ

मिस्टर बिन हे पात्र पहिल्यांदा टीव्हीवर 1990 मध्ये झळकलं होतं. परदेशात प्रसिद्ध असलेले मिस्टर बिन भारतातही तितकेच लोकप्रिय ठरले. हे पात्र किती लोकप्रिय आहे, त्याचा अंदाज फेसबकवरुनही येऊ शकतो. कारण जगभरातील प्रसिद्ध फेसबुक पेजमध्ये मिस्टर बिन हे पेज सर्वाधिक लाईक्स मिळवणाऱ्यांच्या यादीत दहाव्या क्रमांकावर आहे.

रोवन हे मिस्टर बिन म्हणून प्रसिद्ध असले तरी त्यांनी अनेक भूमिका गाजवल्या आहेत. ब्लॅकेडर, नाईन ओ क्लॉक न्यूज, द सिक्रेट पोलीसमॅन्स बॉल्स आणि द थिन ब्लू लाईन या लोकप्रिय मालिकांमध्ये रोवन यांनी भूमिका साकारल्या आहेत. असं असलं तरी रोवन यांना मिस्टर बिननेच ओळख मिळवून दिली.

(Rowan Atkinson will never do the role of Mister Bean again)

संबंधित बातम्या

Adipurush | ‘त्याबाबतीत सैफचा गैरसमज झाला’, वादग्रस्त वक्तव्यावर ‘आदिपुरुष’च्या लेखकाची प्रतिक्रिया…

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.