Radhika Apte | अभिनेत्याने असं काय केलं, ज्यामुळे भडकलेल्या राधिकाने त्याला लगावली कानशिलात
Radhika Apte | 'त्या' कृत्यानंतर राधिका आपटे हिने सर्वांसमोर अभिनेत्याच्या लगावली कानशिलात... धक्कादायक घटनेचा खुलासा करत अभिनेत्री म्हणाली...

मुंबई : 7 सप्टेंबर 2023 | बॉलिवूडमध्ये अनेक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत, ज्यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आणि आजही अनेत अभिनेत्री त्यांच्या सौंदर्य आणि अभिनयामुळे बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. पण अभिनेत्री राधिका आपटे हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. कोणत्याही भूमिकेला योग्य न्याय देताना राधिका मागे-पुढे पाहत नाही. राधिका हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये, वेब सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. ‘पार्च्ड’, ‘रक्त चरित्र’, ‘रक्त चरित्र 2’, ‘शोर इन द सिटी’, ‘मांझी द माउंटमॅन’, ‘बदलापूर’ यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं.
राधिका हिने अनेक सिनेमे आणि सीरिजमध्ये काम करत स्वतःची ओळख निर्माण केली. पण झगमगत्या विश्वातील यशाच्या प्रवासात अभिनेत्रीला अनेक संकटांचा सामना करावा लागला. करियरच्या सुरुवातीला तर राधिकाने इंडस्ट्रीमध्ये वाईट गोष्टींचा सामना केला. अनेक मुलाखतींमध्ये आलेल्या अनुभवांचा खुलासा केला.
झगमगत्या विश्वात काम करत असताना राधिका अनेक वेळा वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. सुरुवातीला राधिका हिने दाक्षिणात्य सिनेविश्वातून अभिनयास सुरुवत केली. सिनेमाची शुटिंग सुरु असताना प्रसिद्ध अभिनेता राधिका हिच्या जवळ आला आणि तिच्या पायांना हात लावू लागला. अभिनेत्याची वागणूक राधिक हिला आवडली नाही आणि अभिनेत्रीने त्याला विरोध केला.
शुटिंगच्या सेटवर भयानक परिस्थिती ओढावल्यामुळे अभिनेत्रीने सर्वांसमोर अभिनेत्याच्या कानशिलात लगावली. या धक्कादायक गोष्टीचा खुलासा राधिका हिने एका टॉक शोमध्ये केला होता. आज राधिका हिचा वाढदिवस असल्यामुळे अभिनेत्रीबद्दल अनेक चर्चा रंगत आहेत.
राधिका हिला मिळू लागल्या होत्या एडल्ड सिनेमाच्या ऑफर
राधिका हिने ‘अहल्या’ आणि ‘बदलापूर’ सिनेमांमध्ये अनेक बोल्ड सीन दिले आहे. ज्याचा परिणाम अभिनेत्रीच्या करियरवर झाला. सिनेमात राधिका हिने बोल्ड आणि इंटिमेट सीन दिल्यामुळे तिला एडल्ड सिनेमाच्या ऑफर येवू लागल्या होत्या. सतत बोल्ड सीनसाठी फोन येत असल्यामुळे राधिका हिने फोन बंद करून ठेवला होता.
राधिका आपटे हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्रीला २००५ मध्ये ‘वाह लाईफ हो तो ऐसी’ सिनेमात छोटी भूमिका साकारण्याची संधी देण्यात आली होती. त्याआधी राधिका हिने अभिनेता तुषार कपूर याच्यासोबत ‘ शोर इन द सिटी’, ‘रक्त चरित्र’, ‘रक्त चरित्र-2’, ‘द वेटिंग रूम’ सिनेमांमध्ये काम केलं आहे.
