AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्मेंद्र यांच्या फोटोला हार, समोर दिवा…, हेमा मालिनी यांच्या घरातील पहिला फोटो अखेर समोर

Hema Malini House: धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सर्वत्र शोककळा... कसं आहे हेमा मालिनी यांच्या घरातील पहिला फोटो अखेर समोर... पतीच्या फोटोला हार... फोटोसमोर दिवा आणि...

धर्मेंद्र यांच्या फोटोला हार, समोर दिवा..., हेमा मालिनी यांच्या घरातील पहिला फोटो अखेर समोर
अभिनेत्री हेमा मालिनी
| Updated on: Nov 28, 2025 | 11:19 AM
Share

Hema Malini House: बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाला जवळपास 72 तास झाले आहे… धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सर्वत्र शोककळा पसरली आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर कुटुंबियांनी अधिकृत घोषणा केली नाही. पण 27 नोव्हेंबर रोजी शोक सभा आयोजित करण्यात आली होती… दरम्यान, हेमा मालिनी, पती धर्मेंद्र यांच्यासाठी भावूक पोस्ट देखील केली आहे. आता हेमा मालिनी यांच्या घरातील पहिला फोटो पोस्ट समोर आला आहे. यामध्ये धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांची अवस्था कशी झाली आहे… स्पष्ट दिसत आहे..

हेमा मालिनी यांच्या घरातील पहिला फोटो समोर…

भाजप नेते जगदंबिका पाल यांनी हेमा मालिनी यांच्या घरी भेट दिली. त्यांना भेटल्यानंतर, जगदंबिका पाल यांनी काही फोटो शेअर केले ज्यात ते धर्मेंद्र यांच्यासाठी हेमा मालिनी यांच्यासमोर प्रार्थना करताना दिसले, फोटोमध्ये ते हात जोडून उभे आहेत. धर्मेंद्र यांच्या फोटोवर हार आणि फोटोसमोर दिवा देखील दिसत आहे.

हेमा मालिनी यांची पोस्ट..

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांनी पोस्ट शेअर केली. दुःख व्यक्त करत त्या म्हणाल्या, ‘‘धरमजी.. माझ्यासाठी ते बरंच काही होते. प्रेमळ पती… आमच्या मुली ईशा आणि अहाना यांचे प्रेमळ वडील… मित्र… मार्गदर्शक… कवी… गरजेच्या वेळी ज्यांच्याकडे हक्काने जाता येईल अशी व्यक्ती.. किंबहुना ते माझ्यासाठी सर्वस्व होते. चांगल्या आणि वाईट काळात त्यांनी कायम माझी साथ दिली… असं हेमा मालिनी यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.

धर्मेंद्र यांची शोकसभा

27  नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांच्यासाठी शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबई येथील ताज लँड्स एन्डमध्ये शोक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. शोक सभेत धर्मेंद्र यांना श्रद्धांजवी वाहण्यासाठी अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते… पण हेमा मालिनी आणि तिच्या मुली ईशा देओल, अहाना दिसल्या नाहीत..  हेमा मालिनी यांनी त्यांच्या घरी धर्मेंद्र यांच्यासाठी पूजा केली.

धर्मेंद्र – हेमा मालिनी यांच्या लग्नाचे 45 वर्ष

समाजाच्या विरोधात जात धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी 1980 मध्ये लग्न केलं. दोघांच्या लग्नाला 45 वर्ष झाली… हेमा मालिनी यांच्यासोबत धर्मेंद्र कधीच राहिले नाहीत. ते पहिली पत्नी प्रकाश कौर आणि मुलांसोबत कायम राहिले… लग्नाला 45 वर्ष झाल्यानंतर देखील हेमा मालिनी कधीच धर्मेंद्र यांच्या मुख्य घराची पायरी चढल्या नाहीत.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.