AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kangana Ranaut | हिमाचल प्रदेश सरकारकडून कंगनाला सुरक्षा, मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांची माहिती

कंगनाच्या वडिलांनी सरकारकडे विनंती केली होती, त्यामुळे आम्ही कंगनाला सुरक्षा दिली, असंही जयराम ठाकूर यांनी स्पष्ट केलं

Kangana Ranaut | हिमाचल प्रदेश सरकारकडून कंगनाला सुरक्षा, मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांची माहिती
| Edited By: | Updated on: Aug 10, 2022 | 3:57 PM
Share

शिमला : हिमाचल प्रदेश सरकारने अभिनेत्री कंगना रनौतला सुरक्षा दिली आहे (Himachal Pradesh Government Provide Protection To Kangana Ranaut). याबाबत हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी स्वत: माहिती दिली. कंगनाच्या वडिलांनी सरकारकडे विनंती केली होती, त्यामुळे आम्ही कंगनाला सुरक्षा दिली, असंही जयराम ठाकूर यांनी स्पष्ट केलं (Himachal Pradesh Government Provide Protection To Kangana Ranaut).

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर शिवेसना खासदार संजय राऊत यांनी कंगना रनौतला महाराष्ट्रात परत न येण्यास ठणकावलं होतं. त्यानंतर कंगनाने केंद्र आणि हिमाचल प्रदेश सरकारकडे सुरक्षेची मागणी केली होती.

कंगनाच्या घरच्यांनी हिमाचल प्रदेश सरकारकडे कंगनाला सुरक्षा देण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी कंगनाला पूर्णपणे सुरक्षा देण्याचं आश्वासन दिलं. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, “कंगनाच्या वडिलांसोबत त्यांनी फोनवरुन संवाद साधला होता. हिमाचल सरकार कंगनाला पूर्ण सुरक्षा देईल, त्यासाठी प्रदेशच्या पोलिस महासंचालक तसे आदेश देण्यात आले आहेत. 9 सप्टेंबरला कंगना मुंबईला येणार आहे आणि हिमाचलच्या मुलीला सुरक्षा प्रदान करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत” (Himachal Pradesh Government Provide Protection To Kangana Ranaut).

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच कंगना रनौतने सुरुवातीपासून अनेक प्रश्न उपस्थित केले. तिने बॉलिवूड माफ‍िया, नेपोट‍िज्म आणि आता ड्रग्जच्या मुद्या उचलला. या दरम्यान, कंगनाने मुंबई पोलिसांवरही प्रश्न चिन्ह उपस्थित केले. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण आलं.

कंगनाला मुंबई पोलिसांवर विश्वास नसेल तर तिने महाराष्ट्रात येऊ नये, असं संजय राऊतांनी म्हटलं. तर अनेक नेत्यांनी कंगनावर टीका केली. इतकंच नाही तर कंगनाने महाराष्ट्राची तुलना थेट पाक व्याप्त काश्मीरशी केली. त्यामुळे संजय राऊतांसह अनेक राजकीय नेते कंगनावर बरसले. त्यानंतर आता कंगना हिमाचल प्रदेश पोलिसांच्या सुरक्षिततेत मुंबईत येण्याची शक्यता आहे.

Himachal Pradesh Government Provide Protection To Kangana Ranaut

संबंधित बातम्या :

कंगनाने सलमान खानला पटवण्याचा खूप प्रयत्न केला, तेव्हा तो म्हणाला होता… : राखी सावंत

महिला आयोगाच्या आडून भाजप माझ्या अटकेचा खेळ रचतंय : आमदार प्रताप सरनाईक

Kangana Ranaut | मुंबईनं मला यशोदा आईसारखं स्वीकारलं, मुंबई माझी कर्मभूमी, कंगनाला उपरती

सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.