AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | नेटकऱ्यांनी थेट हिना खान हिला म्हटले ढोंगी, ‘तो’ व्हिडीओ शेअर करणे अभिनेत्रीला पडले महागात

टीव्ही अभिनेत्री हिना खान ही नेहमीच चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून हिना सतत नेटकऱ्यांच्या निशाण्यावर दिसत आहे. सोशल मीडियावर हिना खान चांगली सक्रिय असून काही दिवसांपूर्वीच अत्यंत बोल्ड लूकमधील खास फोटोशूट हिना खान हिने शेअर केले होते.

Video | नेटकऱ्यांनी थेट हिना खान हिला म्हटले ढोंगी, 'तो' व्हिडीओ शेअर करणे अभिनेत्रीला पडले महागात
| Updated on: Aug 07, 2023 | 3:58 PM
Share

मुंबई : टीव्ही अभिनेत्री हिना खान (Hina Khan) ही कायमच चर्चेत असते. ऐ रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतून हिना खान हिला खरी ओळख ही मिळालीये. विशेष म्हणजे हिना खान हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही सोशल मीडियावर बघायला मिळते. मात्र, हिना खान ही नेहमीच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. ऐ रिश्ता क्या कहलाता है या मालिकेमधून रामराम घेतल्यानंतर हिना खान ही बिग बाॅसच्या (Bigg Boss) घरात दाखल झाली होती. बिग बाॅसच्या घरात धमाकेदार गेम खेळताना हिना खान ही दिसली. हिना खान ही वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना देखील दिसली. हिना खान ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असते.

काही दिवसांपूर्वीच हिना खान हिने खास फोटोशूट केले होते. या फोटोशूटमध्ये हिना खान हिचा जबरदस्त असा लूक दिसत होता. हिना खान ही काही दिवसांपूर्वीच उमराह करण्यासाठी गेली होती. यावेळी हिना खान ही हिजाबमध्ये दिसली. हिना खान हिने काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये केलेल्या फोटोशूटमध्ये तिचा लूक बोल्ड आणि ग्लॅमरस असा दिसत होता.

नुकताच हिना खान हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमुळेच हिना खान ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलीये. अनेकांनी हिना खान हिला खडेबोल सुनावले आहेत. हिना खान हिचा हा व्हिडीओ जोरदार ट्रोल होताना दिसत आहे. पंजाबी लूकमध्ये या व्हिडीओत हिना खान ही दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Hina Khan (@realhinakhan)

हा व्हिडीओ शेअर करत हिना खान हिने लिहिले की, पहिल्यांदाच चुलीवर चपाती केली. हिना खान हिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ती पंजाबी लूकमध्ये असून ती चपाती करत आहे.विशेष म्हणजे हिना खान ही चपाती चुलीवर भाजताना दिसत आहे. गोल चपाती तयार करता आल्याने हिना खान खूप जास्त आनंदी आहे.

हिना खान हिचा हाच व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे. मात्र, हिना खान हिचा हा व्हिडीओ अनेकांच्या पचनी पडला नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. एकाने या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, 35 वर्षांमध्ये पहिल्यांदाच हिने चपाती तयार केली वाटतं. आता हिला स्वयंपाक जमत असल्याने लग्न करायला हवे. दुसऱ्याने लिहिले की, फार जास्त नाटकी आहे ही हिना खान. एकाने तर हिना हिला ढोंगी असल्याचे म्हटले आहे.

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.