AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कपिल शर्माची संपत्ती किती आहे माहितीये का? एका एपिसोडसाठी घेतो ‘इतके’ रूपये

छोट्या पडद्यापासून ते चित्रपटांपर्यंत कपिलने आपल्या कॉमिक टायमिंगने लाखो चाहत्यांच्या मनात घर केले आहे. कपिल कॉमेडीसोबतच आता व्यवसायातूनही पैसे कमवत आहे.

कपिल शर्माची संपत्ती किती आहे माहितीये का? एका एपिसोडसाठी घेतो 'इतके' रूपये
kapil sharma
Updated on: Jul 06, 2025 | 11:01 PM
Share

कपिल शर्मा हा भारतातील आघाडीचा कॉमेडियन आहे. त्याने स्टँड-अप कॉमेडियन म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. छोट्या पडद्यापासून ते चित्रपटांपर्यंत कपिलने आपल्या कॉमिक टायमिंगने लाखो चाहत्यांच्या मनात घर केले आहे. आता त्याने कॅनडामध्ये एक कॅफे उघडला आहे. कपिल कॉमेडीसोबतच आता व्यवसायातूनही पैसे कमवत आहे. तसेच तो सलमान खाननंतर दुसऱ्या क्रमांकाचा महागडा सेलिब्रिटी आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

कपिलची एकूण संपत्ती किती?

कपिल शर्माची एकूण संपत्ती सुमारे 300 कोटी रुपये आहे. त्याचे वार्षिक उत्पन्न सुमारे 35-40 कोटी रुपये आहे. याचाच अर्थ तो दरमहा सरासरी 3-4 कोटी रुपये कमावतो. हे पैसे तो त्याचा लोकप्रिय शो द कपिल शर्मा शो, ब्रँड एंडोर्समेंट, लाईव्ह शो आणि चित्रपटांमधून कमावतो

‘द कपिल शर्मा शो’चे मानधन

कपिल शर्मा हा द कपिल शर्मा शोच्या एका एपिसोड 50 लाख रुपयांपर्यंत मानधन घेतो. हा शो आठवड्याच्या शेवटी दोन दिवस असतो. या शोच्या माध्यमातून तो सुमारे 1 कोटी रुपये कमवतो. तसेच कपिल ब्रँड एंडोर्समेंटसाठी 1 कोटी रुपयांपर्यंत पैसे घेतो. कपिलचा शो परदेशातही पाहिला जातो आणि त्याला यूट्यूबवर कोट्यावधी व्ह्यूज मिळतात, त्यामुळे कपिलला यातूनही उत्पन्न मिळते. कपिल शर्मा सलमान खाननंतर सर्वाधिक फी घेणारा कलाकार आहे. बिग बॉस 18 साठी सलमान खान प्रति एपिसोड 7.5 कोटी रुपये घेतो.

चित्रपटातही केले काम

कपिल शर्माने आतापर्यंत किस किस को प्यार करूं आणि झ्विगातो या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो एका चित्रपटासाठी 5-6 कोटींपर्यंत मानधन घेतो. तसेच तो भारतात आणि परदेशात स्टँड-अप कॉमेडी शो करतो, ज्यातून त्याला लाखो रुपये मिळतात. कपिल एका लाईव्ह शोसाठी 50 लाख ते 1 कोटी रुपये घेतो अशी माहितीही समोर आलेली आहे.

आलिशान जीवनशैली

कपिल आपल्या आलिशान जीवनशैलीसाठीही ओळखला जातो. त्याचे मुंबईत समुद्रालगत एक आलिशान अपार्टमेंट आहे, याची किंमत सुमारे 15 कोटी रुपये आहे. तसेच त्याचा पंजाबमध्ये एक आलिशान बंगला आहे. त्याचबरोबर कपिलकडे मर्सिडीज बेंझ एस-क्लास, व्होल्वो एक्ससी90 आणि रॉयल एनफिल्ड असा आलिशान गाड्या आहेत.

मुंडेंच्या बंगल्यावरून कराडचा फोन अन्... ज्ञानेश्वरी मुंडेंकडून आरोप
मुंडेंच्या बंगल्यावरून कराडचा फोन अन्... ज्ञानेश्वरी मुंडेंकडून आरोप.
फडणवीसांच्या ऑफरनंतर आदित्य ठाकरे म्हणाले, ऑफर दिली म्हणून स्वागताला..
फडणवीसांच्या ऑफरनंतर आदित्य ठाकरे म्हणाले, ऑफर दिली म्हणून स्वागताला...
फडणवीसांनी ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर राऊत स्पष्टच बोलले; ते पटाईत अन्...
फडणवीसांनी ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर राऊत स्पष्टच बोलले; ते पटाईत अन्....
लाडकी बहीण, वन पार्टी वन इलेक्शन; बघा ठाकरेंच्या मुलाखतीचा नवा टीझर
लाडकी बहीण, वन पार्टी वन इलेक्शन; बघा ठाकरेंच्या मुलाखतीचा नवा टीझर.
विक्रोळीत मनसैनिकांनी व्यापाऱ्याला धुतलं अन् काढली धिंड; घडलं काय?
विक्रोळीत मनसैनिकांनी व्यापाऱ्याला धुतलं अन् काढली धिंड; घडलं काय?.
टशन... शिंदे-ठाकरेंन एकमेकांना पाहणंही टाळलं, फोटो सेशनवेळी काय घडलं?
टशन... शिंदे-ठाकरेंन एकमेकांना पाहणंही टाळलं, फोटो सेशनवेळी काय घडलं?.
तुझ्या xx किती दम, तुझ्यासारखी कुत्री... पडळकर-आव्हाडांमध्ये बाचाबाची
तुझ्या xx किती दम, तुझ्यासारखी कुत्री... पडळकर-आव्हाडांमध्ये बाचाबाची.
2029 पर्यंत स्कोप नाही, त्यामुळे.. शिंदेंसमोरच फडणवीसांची ठाकरेंना ऑफर
2029 पर्यंत स्कोप नाही, त्यामुळे.. शिंदेंसमोरच फडणवीसांची ठाकरेंना ऑफर.
Saamana : पुणे तिथे गुन्हेच गुन्हे, तो हल्ला पुण्याची इभ्रत घालवणारा
Saamana : पुणे तिथे गुन्हेच गुन्हे, तो हल्ला पुण्याची इभ्रत घालवणारा.
काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार संजय जगतापांचा भाजपात प्रवेश
काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार संजय जगतापांचा भाजपात प्रवेश.