Shah Rukh Khan | शाहरुखची पहिली कमाई किती होती माहित्ये ? मिळाले होते अवघे..
आज जरी शाहरुख बॉलिवूडचा बादशहा असला तरी एक काळ असा होता, जेव्हा त्यानेही खूप स्ट्रगल केला. प्रचंड मेहनतही केली. किंग खान आज एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपयांची फी आकारतो, पण शाहरुखची पहिली कमाई किती होती माहीत आहे का ?

मुंबई | 28 फेब्रुवारी 2024 : अभिनेता शाहरुख खानचे चाहते फक्त भारतातच नव्हे तर जगभारत पसरले आहे. कोट्यवधी लोक त्याच्यावर वेड्यासारखं प्रेम करतात. आज जरी शाहरुख बॉलिवूडचा बादशहा असला तरी एक काळ असा होता, जेव्हा त्यानेही खूप स्ट्रगल केला. प्रचंड मेहनतही केली. किंग खान नावाने प्रसिद्ध असलेला हा अभिनेता आज एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपयांची फी आकारतो, पण शाहरुखची पहिली कमाई किती होती माहीत आहे का ? त्यानेच याचा खुलासा केला होता. शाहरुखला पहिला पगार हा दिग्गज, दिवंगत गायक पंकज उधास यांच्या कॉन्सर्टमधून मिळाला होता.
गझल्स असो वा चित्रपटगीतं पंकज उधास यांच्या गाण्याचे सर्वच वेडे होते. अशा या श्रेष्ठ कलाकाराच 26 फेब्रुवारीला निधन झालं. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या चाहत्यांसह अनेक स्टार्सनीही सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या अंत्यसस्कारासाठी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज उपस्थित होते. मात्र याच पंकज उधास यांनी अनेक स्टार्सना काम दिलं, संधी दिली त्यामध्ये जॉन अब्राहम, समीरा रेड्डी यांचा समावेश होता. विशेष म्हणजे बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याची पहिली कमाईदेखील पंकज उधास यांच्यामुळेच झाली.
पंकज उधास यांच्या कॉन्सर्टमध्ये शाहरुखने केली मेहनत
शाहरुखचा ‘रईस’ हा चित्रपट 2017 साली रिलीज झाला. त्याच्या प्रमोशनल इव्हेंटदरम्यान शाहरुख त्याच्या ( चित्रपटसृष्टीतील) सुरूवातीच्या काळाचा, स्ट्रगलच्या अनुभवांबद्दल बोलला होता. त्याने सांगितलं की सुरूवातीच्या काळात त्याने पंकज उधास यांच्या एक कॉन्सर्टमध्ये अशरच काम केलं होतं. एखाद्या कॉन्सर्टमध्ये आलेल्या लोकांना मदत करणं हे अशरचं काम असतं. आलेल्या पाहुण्यांना काय हवं ते पाहणं, त्यांना त्यांची बसायची जागा शोधायलं मदत करणं अशा स्वरुपाचं हे काम असतं. सुरूवातीच्या काळात शाहरुखने हेच काम केलं होतं.
पहिल्या कमाईचं शाहरुखने काय केलं ?
या कॉन्सर्टमधील कामासाठी शाहरुखला तेव्हा 50 रुपये मिळाले होते. हीच त्याची पहिली कमाई होती. कमाईच्या या पैशांतून तो आग्रा येथे ताजमहाल पाहण्यासाठी गेला होता, त्यानंतरही त्याच्याकडे काही पैसे उरले, अशी आठवण शाहरुखने शेअर केली होती. बॉलिवूडच्या किंग खानचा हा प्रवास सर्व चाहत्यांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे.
आजही रसिकांच्या हृदयात पंकज उधास यांना अढळ स्थान
पंकज उधास यांनी वयाच्या 72 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. ते अनेक दिवसांपासून आजारी होते अशी माहिती समोर आली आहे. त्यांच्या निधनानंतर अजय देवगण, काजोल, माधुरी दीक्षित, अर्जुन कपूर यांच्यासह अनेक बॉलिवूड स्टार्सनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. पंकज उधास आज आपल्यात नसले, तरी त्यांची गझल आणि गाण्यांच्या रुपाने ते रसिकांच्या हृदयात कायम असतील, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. ‘चिठ्ठी आयी है’, ‘जिए तो जिये कैसे’, ‘चांदी जैसा रंग’, ‘मत कर इतना गुरुर’, ‘ना कजरे की धार’, ‘आहिस्ता आहिस्ता’ ‘और आहिस्ता किजीए बाते..’अशी त्यांची अनेक गाणी आणि गझल्स लोकप्रिय आहेत.
