AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेग्नेंसीमध्ये नवऱ्याने फसवलं, बॅगेत आढळली अशी गोष्ट अभिनेत्रीला येऊ लागला संशय, अखेर नातं पोहोचलं घटस्फोटापर्यंत

झगमगत्या विश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी खासगी आयुष्यात अनेक मोठ्या संकटांचा सामना केला आहे. एक अभिनेत्री अशी देखील आहे, तिची प्रेग्नेंसीमध्ये नवऱ्याने फसवणूक केली. त्याच्या बॅगेत अशी गोष्ट आढळली ज्यामुळे अभिनेत्रीला संशय येऊ लागला.. अखेर त्यांचं नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलं...

प्रेग्नेंसीमध्ये नवऱ्याने फसवलं, बॅगेत आढळली अशी गोष्ट अभिनेत्रीला येऊ लागला संशय, अखेर नातं पोहोचलं घटस्फोटापर्यंत
| Updated on: Sep 02, 2026 | 2:36 PM
Share

झगमगत्या विश्वातील सेलिब्रिटी त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतात. एक अभिनेत्री तर अशी आहे, जी आज घटस्फोटानंतर मुलीसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. अभिनेत्री कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही चारु असोपा आहे. चारु हिने 2021 मध्ये सुष्मिता सेनच्या भावासोबत लग्न केलं. त्यानंतर 2023 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. सांगायचं झालं तर, एका मुलाखतीत अभिनेत्री पूर्व पतीवर अनेक गंभीर आरोप केले होते.

चारु हिने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, रजीव याच्या बॅगेत अशा काही गोष्टी सापडल्या ज्यामुळे अभिनेत्रीचा संशय आधिक वाढत गेला. चारु जेव्हा प्रेग्नेंट होती, तेव्हा राजीव याने चारुची फसवणूक केली . राजीव अधिक काळ घराबाहेरच राहायचा आणि रात्री उशिरा घरा परतायचा… मुलाखतीत चारु म्हणालेली, ‘राजीव अनेकदा मला खोटी कारणं सांगायचा. कधी म्हणायचा ट्राफिक आहे, तर कधी म्हणायचा कामात आहे. पण तो वांद्रे येथे एका कॅफेमध्ये बसून असायचा…’ एवढंच नाही तर, अनेकदा असा दावा देखील करायचा की, कारमध्येच रात्र घालवली.

चारूने असाही आरोप केला की राजीवने तिला मारहाण केली होती, ज्यामुळे तिला पोलिसांत तक्रार करावी लागली. मात्र, जेव्हा जेव्हा राजीवने माफी मागितली, तेव्हा तिने त्याला माफ केलं. चारू हिने सांगितल्यानुसार, परिस्थिती सुधारेल असं आश्वासन राजीव याने दिल्यानं तिने एकदा घटस्फोटाचा निर्णय मागे घेतला होता. आपली मुलगी झियाना हिच्यासाठी तिने या नात्याला आणखी एक संधी दिली, पण काहीच उपयोग झाला नाही.

राजीव सेन याने चारूचे सर्व आरोप फेटाळून लावले. त्याने चारूवर अभिनेता करण मेहरासोबत अफेअर असल्याचा आरोप केला, मात्र चारूने हा दावा खोटा असल्याचं सांगत फेटाळून लावला. आपली मुलगी झियाना हिच्यासाठी राजीव यांच्याशी संबंध आहे तसे राखण्याची इच्छा चारूने व्यक्त केली. आपल्या मुलीला वडिलांसोबत वेळ घालवण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि तिने आपल्या वादग्रस्त नातेसंबंध पाहू नयेत, असं तिला वाटत होतं. अशात दोघांनी परस्पर सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

चारू असोपा हिच्याबद्दल संगायचं झालं तर, ती एक प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री असून तिने ‘मेरे अंगने में’, ‘देवों के देव… महादेव’, ‘जीजी माँ’, ‘बालवीर’ आणि ‘लाडो 2’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

Follow Us
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरेंचं नाव नाहीच...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णयाक सुनावणी... शिंदेंचे वकिल करणार युक्तिवाद
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?