AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parineeti Chopra | “मला त्याने काही फरक पडत नाही”; जोडीदाराच्या वयाविषयी असं का म्हणाली परिणीती?

राघव चड्ढा हे आम आदमी पार्टीचे नेते असल्याने या साखरपुड्याला राजकीय वर्तुळातून अनेक नामांकित व्यक्तींनी हजेरी लावली होती. यात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा समावेश होता.

Parineeti Chopra | मला त्याने काही फरक पडत नाही; जोडीदाराच्या वयाविषयी असं का म्हणाली परिणीती?
Parineeti Chopra and Raghav Chaddha Image Credit source: Instagram
| Updated on: May 14, 2023 | 11:07 AM
Share

मुंबई : एअरपोर्ट, रेस्टॉरंट्स आणि आयपीएल मॅचदरम्यान एकत्र पाहिल्यानंतरही अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राजकीय नेते राघव चड्ढा यांनी त्यांच्या रिलेशनशिपबद्दल मौन बाळगणं पसंत केलं. दिल्लीतल्या कपुरथळा इथल्या निवासस्थानी शनिवारी (13 मे) साखरपुडा पार पडल्यानंतरच दोघांनी हे नातं अधिकृतरित्या जगासमोर आणलं. या साखरपुड्यानंतर आता परिणीतीचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. तुझ्या जीवनसाथीमध्ये कोणते गुण असावेत असं तुला वाटतं, असा प्रश्न परिणीतीला या मुलाखतीत विचारण्यात आला होता. 2014 मधील तिची ही मुलाखत आहे. या प्रश्नाचं परिणीतीने जे उत्तर दिलं, त्याचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर होतेय.

काय म्हणाली परिणीती चोप्रा?

“मी एका सक्षम आणि शक्तीशाली पुरुषाच्या प्रेमात पडू शकते. त्याची विनोदबुद्धीही चांगली असावी. तो संवेदनशील आणि समजुतदार असावा. हे सर्व गुण असले आणि तो माझ्यापेक्षा 20 वर्षांनी मोठा असला तरी मला काही फरक पडत नाही”, असं उत्तर परिणीतीने दिलं होतं. याच मुलाखतीत परिणीतीला तिच्या परफेक्ट रोमँटिक डेटबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ती पुढे म्हणाली, “मी कधीच रोमँटिक डेटवर गेले नाही. जर मी प्रेमात पडले, तर मी नक्कीच अशा रोमँटिक डेटवर जाईन. जर मी त्या व्यक्तीच्या प्रेमात पडले, तरच मी त्याच्यासोबत डेटवर जाईन.”

View this post on Instagram

A post shared by @parineetichopra

या मुलाखतीच्या नऊ वर्षांनंतर परिणीतीने राघव चड्ढा यांच्याशी साखरपुडा केला आहे. हे दोघं 34 वर्षांचे आहेत. 1988 या एकाच वर्षी दोघांचा जन्म झाला. परिणीतीचा वाढदिवस 22 ऑक्टोबर रोजी तर राघव यांचा वाढदिवस 11 नोव्हेंबर रोजी असतो.

काही दिवसांपूर्वी परिणीतीची आणखी एक जुनी मुलाखत व्हायरल झाली होती. “मी कधीच राजकारण्याशी लग्न करणार नाही”, असं ती यामध्ये म्हणाली होती. परिणीती चोप्रा आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे ‘हंसी तो फंसी’ या चित्रपटाचं प्रमोशन करत होते, तेव्हाचा हा व्हिडीओ होता. या मुलाखतीतील रॅपिड फायर प्रश्नांदरम्यान परिणीतीला अशा सेलिब्रिटींची नावं विचारली गेली, ज्यांच्याशी ती लग्न करू इच्छिते. या प्रश्नाचं उत्तर देताना परिणीतीने हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पिटचं नाव घेतलं. त्यानंतर तिला राजकारण्यांची नावं विचारली गेली. तेव्हा ती म्हणाली, “समस्या अशी आहे की मला कोणत्याच राजकारण्याशी लग्न करायचं नाही. खरंतर बरेच चांगले पर्याय आहेत पण मला कधीच राजकारण्याशी लग्न करायचं नाही.”

सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....