अरुणिताला जिंकवून भेदभाव? Indian Idol 12च्या मेकर्सवर संतापले पवनदीपचे चाहते, म्हणाले…

गेल्या आठवड्यात झालेल्या बॉईज वर्सेस गर्ल्स भागाबाबत पवनदीपचे चाहते निर्मात्यांवर खूपच चिडले आहेत. या भागात पवनदीपला (Pawandeep Rajan) त्याची खास मैत्रीण अरुणिता (Arunita Kanjilal) हिने खास आव्हान दिले होते.

अरुणिताला जिंकवून भेदभाव? Indian Idol 12च्या मेकर्सवर संतापले पवनदीपचे चाहते, म्हणाले...
पवनदीप-अरुणिता

मुंबई : गायक पवनदीप राजन ‘इंडियन आयडॉल 12’चा (Indian idol 12) असा एक स्पर्धक आहे, ज्याचे सुरुवातीपासूनच या गायन रिअॅलिटी शोमध्ये हजारो चाहते आहेत. सोशल मीडियावर त्याच्या नावाने अनेक फॅन क्लब देखील आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या बॉईज वर्सेस गर्ल्स भागाबाबत पवनदीपचे चाहते निर्मात्यांवर खूपच चिडले आहेत. या भागात पवनदीपला (Pawandeep Rajan) त्याची खास मैत्रीण अरुणिता (Arunita Kanjilal) हिने खास आव्हान दिले होते आणि या आव्हानात पवनदीपचा पराभव झाला होता (Indian Idol 12 pawandeep fans angry on show makers after arunita wins the challenge).

या आव्हानाच्या निकालानंतर पवनदीपच्या चाहत्यांना असे वाटते की, पवनदीपचे सादरीकरण अरुणिता कांजीलालपेक्षा चांगले होते. परंतु तरीही, पक्षपात करत मेकर्सनी अरुणिताला या आव्हानाची विजेता म्हणून घोषित केले. पवनदीपला पराभूत केल्यानंतर न्यायाधीशांनी अरुणिताला विचारले की, तिला त्याला कोणती शिक्षा द्यायची आहे. यावर अरुणिता म्हणाली होती की, तिला पवनदीपला काहीतरी गोड द्यावे असे वाटते आहे. यानंतर स्टेजवर एक केक आणला गेला आणि अचानक अरुणिताने शोचा होस्ट आदित्य नारायण याच्यासमवेत मिळून पवनदीपच्या तोंडावर केक लावला.

केवळ पवनदीपला दिली शिक्षा

अरुणिताचे हे कृत्य चाहत्यांना अजिबात पसंत पडले नाही. उर्वरित कोणत्याही स्पर्धकांना अशी शिक्षा देण्यात आली नव्हती, मग पवनदीपलाच का लक्ष्य केले?, असा प्रश्न पवनदीपचे चाहते विचारत आहेत. जनतेच्या मतांच्या आधारे सुरुवातीपासूनच या रिअॅलिटी शोच्या पहिल्या 2 स्पर्धकांमध्ये स्थान मिळविणारा स्पर्धक आणि संभाव्य विजेता म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते, अशा स्पर्धकाबरोबर या प्रकारचा भेदभाव केला जात आहे. म्हणूनच अनेक चाहते सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त करत आहेत.

चाहते संतप्त

एका चाहत्याने अरुणिताला सल्ला दिला आहे की, ‘गाण्याची स्पर्धा ठीक आहे, पण असं केक लावण्याची अजिबात गरज नव्हती.’ तर, एकाने लिहिले आहे की, ‘पवनदीपला फक्त एकच गाणे गाण्याची संधी देण्यात आली होती, तर अरुणिताने 3 गाणी गायली.’ इतकेच नाही तर काही आयडॉल चाहत्यांना असे वाटते आहे की, निर्माते फक्त अरुणितावरच लक्ष केंद्रित करत आहेत. पण, काही चाहते अरुणिताची बाजूही घेत आहेत. या फेरीत अरुणिताने पवनदीपपेक्षा चांगले गायले, असे त्यांना वाटत आहे (Indian Idol 12 pawandeep fans angry on show makers after arunita wins the challenge).

पाहा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया :

(Indian Idol 12 pawandeep fans angry on show makers after arunita wins the challenge)

 (Indian Idol 12 pawandeep fans angry on show makers after arunita wins the challenge)

हेही वाचा :

Tusshar Kapoor | मी कधीच लग्न करणार नाही, कारण माझा… तुषार कपूरने उलगडलं गुपित

नितीश भारद्वाज यांच्या स्मितहास्यावर भाळले ‘महाभारत’चे निर्माते, दिग्गजांना मागे टाकत मिळाली ‘श्रीकृष्णा’ची भूमिका!   

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI