Tusshar Kapoor | मी कधीच लग्न करणार नाही, कारण माझा… तुषार कपूरने उलगडलं गुपित

मला स्वतःला कोणासोबत शेअर करायचं नाही. लग्न करण्याचा माझा विचार असता, तर मी सिंगल पेरेंट झालोच नसतो" असं तुषार म्हणतो. (Tusshar Kapoor no plan to get married)

Tusshar Kapoor | मी कधीच लग्न करणार नाही, कारण माझा... तुषार कपूरने उलगडलं गुपित
तुषार कपूर
Follow us
| Updated on: Jun 02, 2021 | 12:35 PM

मुंबई : बॉलिवूडमध्ये मोजके अभिनेते आहेत, ज्यांनी कधी लग्न केलं नाही. सलमान खान, अक्षय खन्ना यासारख्या आधीच्या पिढीतील अभिनेत्यांसह उदय चोप्रा, अभय देओल, रणदीप हुडा हे कलाकारही अद्याप विवाहबंधनात अडकलेले नाहीत. दुसरीकडे, लग्नाच्या बेडीत न अडकताच काही कलाकारांनी पितृत्वसुख अनुभवलं आहे. अभिनेता तुषार कपूर (Tusshar Kapoor) हा त्यापैकीच एक. नुकतचं तुषारने आपण कधीच लग्न करणार नसल्याचं सांगितलं. (Bollywood Actor Tusshar Kapoor says he has no plan to get married)

“स्वतःला कोणासोबत शेअर करायचं नाही”

नुकतंच एका मुलाखतीत तुषार कपूरला लग्नावरुन छेडण्यात आलं. लग्नाचं प्लॅनिंग करत आहेस का, असा प्रश्न तुषारला विचारला. “मी कधीच लग्न करणार नाही, कारण माझा विचार ठाम आहे. मला स्वतःला कोणासोबत शेअर करायचं नाही. लग्न करण्याचा माझा विचार असता, तर मी सिंगल पेरेंट झालोच नसतो” असं तुषार म्हणतो.

“पेरेंटिंग म्हणजे डायपर बदलणं नाही”

“मी प्रत्येक दिवशी माझ्या मुलासोबत नवीन काहीतरी शिकत असतो. याशिवाय कुठला पर्याय मला निवडायचा नाही. मी स्वतःला इतरांसोबत शेअर करु शकत नाही. त्यामुळे भविष्यातही मी तसं करणार नाही. जर शेवट चांगला, तर सगळंच चांगलं” असं तुषार म्हणतो. “पेरेंटिंग म्हणजे फक्त डायपर बदलणं नाही, तर निस्वार्थ प्रेम, पालनपोषण आणि मुलांना बिनशर्त पाठिंबा देणं असतं” असं तुषार याआधीही म्हणाला होता.

तुषार कपूर सिंगल पेरेंट

44 वर्षांच्या तुषार कपूरने जून 2016 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून पिता होण्याचं सुख अनुभवलं. त्याचा मुलगा लक्ष्य आता पाच वर्षांचा होईल. ज्येष्ठ दिग्दर्शक प्रकाश झा यांनी सरोगसीचा पर्याय सुचवल्याचं तुषारने सांगितलं होतं.

तुषार कपूर हा दिग्गज अभिनेते जितेंद्र आणि निर्मात्या शोभा कपूर यांचा धाकटा मुलगा. त्याची मोठी बहीण एकता कपूर प्रख्यात चित्रपट निर्माती आहे. एकताही अविवाहित आहे. भावाच्या पावलावर पाऊल ठेवत एकतानेही 2019 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून मुलीला जन्म दिला.

बॉलिवूडमध्ये वीस वर्षांची कारकीर्द

तुषारने बॉलिवूडमध्ये पदार्पण करुन नुकतीच वीस वर्ष झाली. 2001 मध्ये मुझे कुछ कहना है चित्रपटातून त्याने मनोरंजन विश्वात पाय ठेवलं. कुछ तो है, गायब, खाकी असा काही सिनेमात झळकल्यानंतर क्या कूल है हम या चित्रपटामुळे त्याला विनोदी अभिनेता म्हणून ओळख मिळाली. त्यानंतर गोलमाल सिरीजमधील मूक लकीच्या रोलमुळे तो प्रेक्षकांच्या मनात बसला.

संबंधित बातम्या :

श्रीदेवीने निधनापूर्वी लेकीला दिला खास सल्ला, आईच्या आठवणी सांगताना जान्हवी कपूर म्हणते…

नितीश भारद्वाज यांच्या स्मितहास्यावर भाळले ‘महाभारत’चे निर्माते, दिग्गजांना मागे टाकत मिळाली ‘श्रीकृष्णा’ची भूमिका!   

(Bollywood Actor Tusshar Kapoor says he has no plan to get married)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.