आमिरच्या लेकीचा रोमँटिक व्हॅलेंटाईन, बॉयफ्रेंडसोबत शेअर केला खास व्हिडिओ!

आज प्रत्येकजण व्हॅलेंटाईन डे साजरा करत आहे. प्रत्येकजण आपल्या जोडीदारासह प्रेमाचा हा खास दिवस साजरा करत असतो.

आमिरच्या लेकीचा रोमँटिक व्हॅलेंटाईन, बॉयफ्रेंडसोबत शेअर केला खास व्हिडिओ!
गेल्या वर्षी मानसिक आरोग्य दिनानिमित्त एक व्हिडिओ शेअर करून उदासीनतेशी सामना करावा लागला होता, असेही इराने नमूद केले होते. तिनं सांगितलं होतं की ती चार वर्षांपासून नैराश्याशी लढा देत आहे.

मुंबई : आज प्रत्येकजण व्हॅलेंटाईन डे साजरा करत आहे. प्रत्येकजण आपल्या जोडीदारासह प्रेमाचा हा खास दिवस साजरा करत असतो. आमिर खानची मुलगी इरा खानचा प्रियकर नुपूरने स्वतः कागदाची गुलाब फुले तयार करून इराला दिले आहेत. इराने याचे काही फोटो आणि व्हिडीओ इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत आणि शेअर करताना लिहिले आहे की, तो माझ्यासाठी करत आहे. (Ira Khan Celebrate a romantic Valentine with a boyfriend Did)

ira khan 1

एका फोटोमध्ये नुपूर फुले तयार करताना देखील दिसत आहे. नुपूरने देखील इरासोबतचा एक फोटो शेअर करत व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या. फोटो शेअर करताना लिहिले की, हॅप्पी व्हॅलेंटाईन डे माय लव्ह. इराने प्रामिस डे निमित्त नुपूरसोबतचे अनेक फोटो शेअर केले होते आणि लिहिले आहे की, ‘माय व्हॅलेंटाईन’ इराने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, तुझ्यासोबत प्रामिस डे साजरा करताना मला अभिमान आहे.

View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

इराच्या या पोस्टला उत्तर म्हणून नुपूर शिखरेने इराला ‘आय लव यू’ म्हटंले होते. काही दिवसांपूर्वी इराच्या चुलत भावाचे लग्न होते. त्यावेळी इराने लग्नाच्या फंक्शनचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यात नुपूर शिखरे देखील तिच्यासोबत दिसत होता. नुपूर आणि इरा यांची नावे बर्‍याच काळापासून चर्चेत राहिली होती. काही दिवसांपूर्वी नुपूर आणि इरा आमिरच्या फार्म हाऊसवर सुट्ट्यांचा आनंद लुटत होते.

या ट्रीपचे फोटोसुद्धा त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. इराने एक व्हिडिओ शेअर केला होता आणि म्हटले होते की, ती लैंगिक अत्याचाराची शिकार झाली होती. इरा म्हणाली होती, “मी 14 वर्षांची असताना माझ्यावर लैंगिक अत्याचार केले गेले.” मला त्यावेळी नेमके काय घडले ते कळाले नव्हते. परंतु जेव्हा मला कळले तेव्हा मी त्यापासून दूर गेले होते.

काही दिवसांपूर्वीच ‘जागतिक मानसिक स्वास्थ्य दिना’च्या निमित्ताने इराने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यावेळी तिने आपण डिप्रेशनमध्ये असल्याचे सांगितले होते. तेव्हापासून इरा खान चर्चेत आहे. दरम्यान, इराने शेअर केलेल्या नव्या व्हीडिओत तिने आपल्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. मी डिप्रेशनमध्ये जावे, असे काहीच माझ्या आयुष्यात घडले नव्हते. मात्र, तरीही मला नैराश्य आले.

संबंधित बातम्या : 

तुमचे बलिदान विसरणे अशक्य; अक्षय कुमारचं पुलवामातील शहिदांना अभिवादन 

प्रभासकडून चाहत्यांना व्हॅलेंटाईन डे गिफ्ट, ‘राधे श्याम’चे टीझर केले शेअर!

व्हॅलेंटाईन डेचं धुमशान; अंकिता लोखंडे आणि विकी जैन शिमलामध्ये!

(Ira Khan Celebrate a romantic Valentine with a boyfriend Did)

Published On - 5:21 pm, Sun, 14 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI