AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिळवली वाहवा, इरफान खानचा शेवटचा चित्रपट 4 वर्षांपासून प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत!

आपल्या शानदार अभिनयातून लोकांच्या मनात स्थान मिळवणारे दिग्गज अभिनेते इरफान खान (Irrfan Khan) यांचा शेवटचा चित्रपट 4 वर्षांपासून प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. 2017मध्ये या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाकडून कौतुकाची थाप मिळाली होती.

आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिळवली वाहवा, इरफान खानचा शेवटचा चित्रपट 4 वर्षांपासून प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत!
द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स’
| Edited By: | Updated on: May 27, 2021 | 9:59 AM
Share

मुंबई : आपल्या शानदार अभिनयातून लोकांच्या मनात स्थान मिळवणारे दिग्गज अभिनेते इरफान खान (Irrfan Khan) यांचा शेवटचा चित्रपट 4 वर्षांपासून प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. 2017मध्ये या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाकडून कौतुकाची थाप मिळाली होती. इरफान खानने आपल्या 30 वर्षांच्या कारकीर्दीत तब्बल दोन डझनहून अधिक चित्रपट पुरस्कार जिंकले आहेत. गेल्या वर्षी 29 एप्रिलला इरफान खान यांचे कर्करोगाने निधन झाले होते (Irrfan Khan Last movie the song of scorpions waiting for release from last 4 years).

राजस्थानात जन्म, अभ्यास आणि क्रिकेट

इरफान खानचे वडील एक छोटे व्यापारी होते. इरफानच जन्म राजस्थानच्या टोंक शहरात 7 जानेवारी 1967 रोजी झाला होता. इरफान खानने टोंकमधील सुरुवातीचे शिक्षण संपवल्यानंतर त्यांना क्रिकेटचे वेड लागले होते. मीडिया रिपोर्टनुसार, इरफानची बीसीसीआयच्या प्रथम श्रेणी स्पर्धेच्या सीके नायडू ट्रॉफीसाठी अंडर-23 प्रकारात निवड झाली होती. तथापि, प्रवास आणि क्रिकेट किट इत्यादी खर्चीक बाबींमुळे त्यांनी या स्पर्धेत भाग घेतला नाही.

जोधपूरमध्ये पहिले अभिनेता होण्याचे स्वप्न

इरफान खान आपल्या थिएटर कलाकार काकासमवेत जोधपूरला गेले. येथूनच इरफानचे चित्रपटांमध्ये अभिनय करण्याचे स्वप्न वाढू लागले. त्यांनी जयपूर येथून मास्टर्स पूर्ण केले आणि 1984मध्ये दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे प्रवेश घेतला. चित्रपटांत काम करण्यासाठी दिल्लीहून मुंबईत दाखल झालेल्या इरफानला बराच संघर्ष करावा लागला. 1987 मध्ये मीरा नायर यांच्या ‘सलाम बॉम्बे’ या चित्रपटातून त्यांना अभिनयाची पहिली संधी मिळाली. सुरुवातीला लहान-लहान भूमिका साकारणाऱ्या इरफान खानने बॉलिवूड ते हॉलिवूडसह अनेक भाषांमध्ये शेकडो चित्रपट आणि अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले (Irrfan Khan Last movie the song of scorpions waiting for release from last 4 years).

शेवटचा चित्रपट 4 वर्ष रिलीजच्या प्रतीक्षेत

इरफान खान शेवट मोठ्या पडद्यावर 2020 मध्ये ‘इंग्लिश मीडियम’ या चित्रपटामध्ये करीना कपूर, दीपक डोब्रियाल यांच्यासह दिसला होता. मात्र, इरफान खानचा चित्रपट ‘द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स’ (The Song Of Scorpions) गेल्या 4 वर्षांपासून प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. या चित्रपटाचा प्रीमियर 2017मध्ये स्वित्झर्लंडमधील लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवला गेला होता. जिथे त्याचे प्रचंड कौतुक झाले होते. चित्रपटाचे निर्माते अभिषेक पाठक आणि ज्ञान शर्मा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, इरफान खानचा हा शेवटचा चित्रपट 2021मध्ये प्रदर्शित होईल.

इरफानच्या शेवटच्या चित्रपटाची कहाणी…

2015मध्ये चित्रीकरण सुरू झालेल्या ‘द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन’ या चित्रपटाची कथा राजस्थानच्या वाळवंटातील एक उंट व्यापारी आदम आणि विंचूचे विष उतरवणारी मुलगी नुरां यांच्याभोवती फिरते. यातील उंट व्यापाऱ्याची भूमिका इरफान खानने साकारली आहे, जो आदिवासी महिलेच्या प्रेमात पडतो आणि तिला लग्नाची मागणी घालतो. चित्रपटाची कहाणी या दोघांचे प्रेम आणि समाजाचे टोमणे या भोवती फिरते. अनूप सिंग यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात इरफान खान यांच्यासह इराणी अभिनेत्री गोलशिफ्तेह फरहानी, वहीदा रहमान, तिलोत्तमा शोमे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

पाहा ‘या’ चित्रपटाचा ट्रेलर

(Irrfan Khan Last movie the song of scorpions waiting for release from last 4 years)

हेही वाचा :

‘मर्डर’मधील बोल्ड दृश्यानंतर लोकांची माझ्याकडे बघण्याची दृष्टी बदलली, मल्लिका शेरावतने व्यक्त केलं दुःख!

Photo : ‘The Family Man’चा अत्यंत खतरनाक दहशतवादी मूसा रहमान कोण?; वाचा सविस्तर

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.